Happy birthday to Indian-American astronaut Sunita Williams
सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर आहेत. त्यांनी केलेल्या शोध मोहिम आणि अवकाश मोहिमेमुळे सुनीता विल्यम्स या नेहमी चर्चेत राहिल्या आहेत. त्यांनी अंतराळात एकूण ६०८ दिवस आणि २० मिनिटांचे वास्तव्य केले आहे. तसेच, त्यांनी नऊ वेळा अंतराळ चाल (स्पेसवॉक) केल्या, ज्याचा एकूण वेळ ६२ तास आणि ६ मिनिटे आहे. हा वेळ महिलांमध्ये सर्वाधिक आणि एकूण चौथा क्रमांक आहे. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी हे जेमतेम आठ दिवसांसाठी बोईंग स्टारलायनरच्या चाचणी मोहिमेसाठी, आंतरराष्ट्रीय आंतराळ केंद्र म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये (ISS) येथे गेले होते. परंतु, तिथे जाऊन ते अंतराळामध्ये अडकले. तब्बल नऊ महिन्यांच्या अंतराळातील वास्तव्यानंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या. आजच्या दिवशी 1965 साली त्यांचा जन्म अमेरिकेतील ओहायो राज्यातील युक्लिड सिटी (क्लीव्हलँडमध्ये स्थित) येथे झाला होता.
19 सप्टेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
19 सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
19 सप्टेंबर रोजी मृत्यू दिनविशेष