Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 18 सप्टेंबरचा इतिहास

लेखक शिवाजी सावंत यांनी कुरुक्षेत्रामध्ये राहून मृत्युंजय कादंबरी लिहिली. प्रदीर्घ संशोधन, चिंतनातून त्यांनी ’मृत्युंजय’नंतर सावंतांनी ’छावा’ ही ऐतिहासिक व ’युगंधर’ या कादंबरी लिहिल्या.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 18, 2025 | 10:49 AM
Mrityunjay marathi novelist Shivaji Sawant passes away on 18 September History dinvishesh

Mrityunjay marathi novelist Shivaji Sawant passes away on 18 September History dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

मराठी साहित्य विश्वामध्ये मृत्युंजयकार म्हणून ओळख असलेले शिवाजी सावंत यांनी त्यांच्या लेखनाने उत्कृष्ट साहित्यनिर्मिती केली. थेट कुरुक्षेत्रामध्ये मुक्काम करुन त्यांनी मृत्युंजय ही कादंबरी साकारली. प्रदीर्घ संशोधन, चिंतन आणि मनन यांतून रससंपन्न साहित्य लिहिले. ’मृत्युंजय’नंतर सावंतांनी ’छावा’ ही ऐतिहासिक व ’युगंधर’ ही पौराणिक विषयावरची कादंबरी लिहिली. त्यांच्या अनेक पुस्तकांचे इतर भाषांमध्ये भाषांतर देखील झाले आहे. आजच्या दिवशी 2002 साली त्यांनी जगाचा निरोप घेतला. पण त्यांच्या पुस्तकरुपी लेखणीतून शिवाजी सावंत हे कायम वाचकाच्या मनात जिवंत राहिले आहेत.

18 सप्टेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1502: ख्रिस्तोफर कोलंबस त्याच्या शेवटच्या प्रवासात होंडुरासला पोहोचला.
  • 1809: लंडनमधील रॉयल ऑपेरा हाऊस उघडले.
  • 1851: न्यूयॉर्क डेली टाइम्सचे पहिले प्रकाशन, जे नंतर न्यूयॉर्क टाइम्स बनले.
  • 1810: चिलीला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1850: यूएस काँग्रेसने 1850 चा फरारी गुलाम कायदा पास केला.
  • 1882: पॅसिफिक स्टॉक एक्सचेंज उघडले.
  • 1885: कॅनडातील माँट्रिअल शहरात कांजिण्यांची लस घेणे सक्तीचे केल्याने शहरात दंगली उसळल्या.
  • 1919: नेदरलँडमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.
  • 1924: गांधींनी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी 21 दिवसांचे उपोषण सुरू केले.
  • 1927: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना.
  • 1947: अमेरिकन गुप्तचर संघटना सी. आय. ए. (CIA) ची स्थापना झाली.
  • 1948: निजामाच्या सैन्याने पराभव स्वीकारल्यामुळे ऑपरेशन पोलो रद्द करण्यात आले.
  • 1960: फिडेल कॅस्ट्रो संयुक्त राष्ट्र संघात क्युबाच्या प्रतिनिधी मंडळाचे प्रमुख
  • 1962: बुरुंडी, जमैका, रवांडा, त्रिनिदाद आणि टोबॅगो संयुक्त राष्ट्रांमध्ये सामील झाले.
  • 1990 : लिकटेंस्टीन संयुक्त राष्ट्रांचा सदस्य झाला.
  • 1997: महाराष्ट्रात कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना.
  • 1999: लेखक व्यंकटेश माडगूळकर यांना कुसुमाग्रजा प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर.
  • 2002: दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
  • 2009: रेडिओवर सलग 15 वर्षे आणि टेलिव्हिजनवर सलग 72 वर्षे चाललेल्या द गाईडिंग लाइट मालिकेचा अंतिम भाग प्रसारित झाला.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

18 सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष

  • 53ई.पूर्व : ‘ट्राजान’ – रोमन सम्राट यांचा जन्म. (मृत्यू: 9 ऑगस्ट 117)
  • 1709: ‘सॅम्युअल जॉन्सन’ – ब्रिटिश साहित्यिक, टीकाकार, व विचारवंत यांचा जन्म. (मृत्यू: 13 डिसेंबर 1784)
  • 1900: ‘शिवसागर रामगुलाम’ – मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री यांचा जन्म. (मृत्यू: 15 डिसेंबर 1985)
  • 1905: ‘ग्रेटा गार्बो’ – हॉलीवूड अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 15 एप्रिल 1990)
  • 1906: ‘प्रभूलाल गर्ग’ – हिन्दी हास्यकवी यांचा जन्म. (मृत्यू: 18 सप्टेंबर 1995 – हाथरस, उत्तर प्रदेश)
  • 1912: ‘राजा नेने’ – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू: 21 फेब्रुवारी 1975)
  • 1945: ‘जॉन मॅक्फि’ – मॅक्फि चे संस्थापक यांचा जन्म.
  • 1950: ‘शबाना आझमी’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1950: ‘विष्णुवर्धन’ – भारतीय अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू: 30 डिसेंबर 2009)
  • 1968: ‘उपेंद्र राव’ – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि राजकारणी यांचा जन्म.
  • 1971: ‘लान्स आर्मस्ट्राँग’ – अमेरिकन सायक्लिस्ट यांचा जन्म.
  • 1989: ‘अश्विनी पोनप्पा’ – भारतीय बॅडमिंटनपटू यांचा जन्म.

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा

18 सप्टेंबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1783: ‘लिओनार्ड ऑयलर’ – स्विस गणितज्ञ यांचे निधन. (जन्म: 15 एप्रिल 1707)
  • 1992: ‘मुहम्मद हिदायतुल्लाह’ – भारताचे सहावे उपराष्ट्रपती यांचे निधन. (जन्म: 17 डिसेंबर 1905 – लखनौ, उत्तर प्रदेश)
  • 1993: ‘असित सेन’ – विनोदी अभिनेते व दिग्दर्शक यांचे निधन.
  • 1995: ‘प्रभूलाल गर्ग’ – हिन्दी हास्यकवी, पद्मश्री यांचे निधन. (जन्म: 18 सप्टेंबर 1906)
  • 1999: ‘अरुण वासुदेव कर्नाटकी’ – मराठी चित्रपट दिग्दर्शक यांचे निधन.
  • 2002: ‘शिवाजी सावंत’ – साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 31 ऑगस्ट 1940)
  • 2004: ‘डॉ. भालचंद्र दिनकर फडके’ – दलित साहित्याचे समीक्षक यांचे निधन.
  • 2013: ‘वेलियाम भरगवण’ – भारतीय राजकारणी यांचे निधन.

Web Title: Mrityunjay marathi novelist shivaji sawant passes away on 18 september history dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2025 | 10:49 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस; जाणून घ्या 17 सप्टेंबरचा इतिहास
1

Dinvishesh : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस; जाणून घ्या 17 सप्टेंबरचा इतिहास

Dinvishesh : संयमी आणि अनुभवी राजकीय नेते पी. चिदंबरम यांचा जन्मदिन; जाणून घ्या 16 सप्टेंबरचा इतिहास
2

Dinvishesh : संयमी आणि अनुभवी राजकीय नेते पी. चिदंबरम यांचा जन्मदिन; जाणून घ्या 16 सप्टेंबरचा इतिहास

साहित्यसमीक्षक गंगाधर गाडगीळ यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 15 सप्टेंबर चा इतिहास
3

साहित्यसमीक्षक गंगाधर गाडगीळ यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 15 सप्टेंबर चा इतिहास

Dinvishesh : मराठी चित्रपटविश्वातील सुपरस्टार डॉ. काशीनाथ घाणेकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 14 सप्टेंबर इतिहास
4

Dinvishesh : मराठी चित्रपटविश्वातील सुपरस्टार डॉ. काशीनाथ घाणेकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 14 सप्टेंबर इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.