Idli-Sambhar History: दक्षिण भारतातील प्रसिद्ध असा इडली-सांबार हा पदार्थ भारतीयांचा अविभाज्य घटक बनला आहे. आज देशभरातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समधील मेनू, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर, ते दक्षिण भारतीय डिश म्हणून उल्लेख केला जातो. पण जर आम्ही तुम्हाला सांगितले की इडली आणि सांबार हे दक्षिण भारतीय पदार्थच नाही नाहीत, तर तुम्हाला धक्का बसेल. पण हे खरं आहे बर का. इडली आपल्या देशातील नाही आणि सांबारचा शोध दक्षिण भारतात लागला नव्हता.
राजघराण्यांना राहिला नाही मान; नावापुढे लावता येणार नाही राजा अन् राणी
इडली इंडोनेशियातून भारतात आली. भारतात ७ व्या ते १२ व्या शतकादरम्यान इंडोनेशियामध्ये हा पदार्थ बनवण्यास आणि खाण्यास सुरूवात झाली. इंडोनेशियात इडलीला “केडली” किंवा “केदारी” या नावाने ओळखले जाते. इतिहासकारांच्या मते, इंडोनेशियात हिंदू राजांच्या कार्यकाळात, ते जेव्हा भारतात येत असत, तेव्हा ते त्यांच्या स्वयंपाकींसोबत केडली देखील आणत असत.
पण दुसरीकडे इडलीचा संबंध अरब व्यापाऱ्यांशी जोडला जातो. ज्यांनी भारताला तांदळाच्या गोळ्या बनवण्याची ओळख करून दिली, तिचेच रुपांतर नंतर इडलीमध्ये झाले. भारतात, १० व्या शतकातील कन्नड ग्रंथांमध्ये या पदार्थाचा उल्लेख करण्यात आला आहे. स्थानिक घटकांनुसार इडली सांबार हा पदार्थ विकसित करण्यात आला. दक्षिण भारतीय पाककृतीमध्ये इडलीचा मोठा इतिहास आहे. शिवकोटी आचार्य यांनी लिहिलेल्या कन्नड ग्रंथात, ही डिश केवळ उडीद डाळीच्या पीठाच्या आंबण्यापासून बनवली जात असे, असा उल्लेख आहे.
जिभेवर ठेवताच विरघळून जातील रव्याचे चविष्ट लाडू, नोट करून घ्या मऊसूत लाडू बनवण्याची सोपी रेसिपी
सांबर हा भाज्या आणि मसाल्यांच्या मिश्रणातून बनवलेला पदार्थ आहे, ज्याचा उगम १७व्या शतकातील तंजावरमध्ये झाला. त्या काळी तंजावर मराठ्यांच्या राज्याखाली होता. कथेनुसार, छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराज जेव्हा तंजावरला गेले होते, तेव्हा त्यांना शाही स्वयंपाकघरात बनवलेली एक अनोखा पदार्थ वाढण्यात आला होता. जेव्हा आचारी हा पदार्थ बनवत होता, तेव्हा त्याने कोकम संपल्यामुळे त्याने मूगाची डाळ ऐवजी तूर डाळ वापरली आणि कोकम ऐवजी चिंचेचा उपयोग केला. संभाजीं महाराजांना हा पदार्थ खूप आवडला. आणि त्यांच्या नावावरून या नवीन पदार्थाला “सांबार” असे नाव ठेवण्यात आले. त्यानंतर पासून ही डिश दक्षिण भारतात अत्यंत लोकप्रिय झाली.
इतिहासातील काही पुरावे सांबरच्या उगमाचा ऐतिहासिक पाया दाखवतात. चालुक्य राजा सोमेश्वर तिसरा यांनी १२व्या शतकात लिहिलेल्या संस्कृत ग्रंथ विक्रमांक अभिदय मध्ये सांबरचा उल्लेख आढळतो. या ग्रंथात सांबरचे वर्णन हिंग, हळद, काळी मिरी, धणे यासारख्या मसाल्यांच्या मिश्रणासह केले आहे, जे मसूर, भाज्या आणि मांसामध्ये वापरले जात होते. हा उल्लेख सांबरच्या शोधाचा आणि त्याच्या प्राचीन पाककलेतील इतिहासाचा एक महत्त्वाचा पुरावा आहे, जो मराठा काळातील ऐतिहासिक कथांशी जोडतो.