जिभेवर ठेवताच विरघळून जातील रव्याचे चविष्ट लाडू
दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. दिवाळी उत्सवात सगळीकडे मोठा आनंद आणि उत्साह असतो. याशिवाय घरात साफसफाई करून फराळातील गोड पदार्थ बनवले जातात. करंजी, शंकरपाळी, चकली, लाडू इत्यादी अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यातील अनेकांना आवडणारा पदार्थ म्हणजे रव्याचे लाडू. रव्याचे लाडू चवीला अतिशय सुंदर लागतात. पण बऱ्याचदा लाडू कडक होऊन जातात. कारण रव्याचे लाडू बनवण्यासाठी साखरेच्या पाकचा वापर केला जातो. साखरेचा पाक व्यवस्थित न झाल्यामुळे लाडूची चव पूर्णपणे बिघडून जाते आणि लाडू खाण्याची अजिबात इच्छा होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये रव्याचे लाडू बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेल्या लाडूची चव चाखताच लाडू तोंडात सहज विरघळून जातील. याशिवाय चव सुद्धा सुंदर लागेल. याशिवाय रव्याचे लाडू बनवताना चुकीचे प्रमाण घेतल्यास लाडू लाडू व्यवस्थित होणार नाहीत. चला तर जाणून घेऊया रव्याचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)






