
India's richest Ganpati Mandal GSB Seva Mandal's record insurance of Rs 474 crores
Mumbai Richest Ganesh Mandal : मुंबई म्हटले की गणेशोत्सवाची धामधूम आपोआप डोळ्यांसमोर उभी राहते. लालबागचा राजा, अंधेरीचा गणेश, गिरगावचा गणपती… असे कितीतरी मानाचे मंडळे आहेत. पण या सगळ्यांमध्ये एक विशेष नाव घेतले जाते माटुंग्याच्या किंग्ज सर्कलमधील जीएसबी सेवा मंडळ. दरवर्षी इथे गणेशोत्सवाची भक्तीभाव आणि परंपरांची अद्भुत सांगड पाहायला मिळते. पण यंदा या मंडळाने केलेला विक्रम सगळ्यांचे लक्ष वेधून घेतोय. 474.46 कोटी रुपयांचा विमा हा आकडा ऐकूनच आश्चर्य वाटते. भारतातील कोणत्याही गणेश मंडळाचा इतका मोठा विमा आतापर्यंत काढला गेला नव्हता. हा विक्रम आता जीएसबी सेवा मंडळाच्या नावावर जमा झाला आहे.
गेल्या काही वर्षांपासून या मंडळाचा विमा सतत वाढत चालला आहे.
वाढत्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या किमती, वाढलेले स्वयंसेवक, पुजारी व सुरक्षारक्षक, तसेच भाविकांची वाढती गर्दी – या सगळ्यांमुळे विम्याची रक्कम झपाट्याने वाढली आहे. हा विमा न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत घेतला गेला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Minneapolis school shooting : अमेरिकेतील शाळेत पुन्हा एकदा गोळीबार; मिनियापोलिस येथील हृदयद्रावक घटनेने देश हादरला
यंदा गणपती बाप्पा ६६ किलो सोने आणि ३३६ किलो चांदीच्या दागिन्यांनी सजले जाणार आहेत.
जीएसबी सेवा मंडळ फक्त सोन्या-चांदीसाठीच प्रसिद्ध नाही. या मंडळाची खरी ताकद म्हणजे परंपरा आणि भक्तिभाव.
जीएसबी मंडळाच्या काही अनोख्या परंपरा भाविकांना नेहमीच आकर्षित करतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia-Ukraine War : रशिया-युक्रेनच्या पुढील बैठकीबाबत सस्पेन्स कायम; पुतिनच्या खास माणसाने दिली मोठी खबर
जरी गणेशोत्सव महाराष्ट्रभर मोठ्या थाटामाटात साजरा केला जात असला तरी मुंबईतील उत्सवाला एक वेगळेच स्थान आहे. असे मानले जाते की आधुनिक सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवातही मुंबईतून झाली. बॉलिवूडपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सगळ्यांच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. पण जीएसबी सेवा मंडळाचा उत्सव केवळ श्रीमंतीतच नाही, तर श्रद्धा आणि परंपरेतही समृद्ध आहे.
आजच्या काळात जिथे अनेकदा पैशाची चमक अधोरेखित केली जाते, तिथे जीएसबी सेवा मंडळ आपल्याला सांगते की खरा उत्सव हा भक्तिभाव, परंपरा आणि सामाजिक एकात्मतेत आहे. विम्याचा आकडा आपल्याला थक्क करतो, पण मंडळाची खरी ताकद आहे – भक्तांची निष्ठा आणि गणेशभक्तीची परंपरा.