Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इच्छाशक्तीला वयाचे बंधन नसते! वयाच्या १०५ व्या वर्षी चौथ्या इयत्तेची परीक्षा देऊन भागीरथी अम्मांनी रचला शिक्षणाचा नवा इतिहास

वयाच्या १०५ व्या वर्षी हातात पाटी-पेन्सिल धरून शिक्षणाची नवी सुरुवात करणाऱ्या केरळच्या एका आजींनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. लहानपणी सुटलेले स्वप्न पूर्ण करत त्यांनी रचलेला हा अद्भूत इतिहास नेमका कसा घडला आणि त्यांनी कोणता नवा आदर्श निर्माण केला, हे जाणून घेणे नक्कीच प्रेरणादायी ठरेल!

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 17, 2026 | 09:00 AM
इच्छाशक्तीला वयाचे बंधन नसते! वयाच्या १०५ व्या वर्षी चौथ्या इयत्तेची परीक्षा देऊन भागीरथी अम्मांनी रचला शिक्षणाचा नवा इतिहास
Follow Us
Follow Us:
  • लहानपणी सुटलेले शिक्षण नऊ दशकांनंतर सुरू करत वयाच्या १०५ व्या वर्षी इयत्ता चौथीची परीक्षा उत्तीर्ण.
  • गणितात १०० पैकी १०० गुण मिळवून ‘नारी शक्ती पुरस्कार’ आणि पंतप्रधानांकडून ‘मन की बात’मध्ये कौतुक.
  • वयाची सर्व बंधने मोडून साक्षरतेचा आणि जिद्दीचा संपूर्ण जगासमोर एक अनोखा आदर्श निर्माण केला.

शिक्षणासाठी कोणतेही वय नसते आणि शिकण्याची तीव्र इच्छा असेल तर कोणतीही अडचण आपल्याला रोखू शकत नाही, हे केरळच्या भागीरथी अम्मा यांनी वयाच्या १०५ व्या वर्षी सिद्ध करून दाखवले होते. लहानपणी कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे सुटलेले शिक्षण तब्बल नव्वद वर्षानंतर पूर्ण करत त्यांनी संपूर्ण देशासमोर साक्षरता आणि इच्छाशक्तीचा एक अद्वितीय आदर्श निर्माण केला.

अडचणींनी भरलेला सुरुवातीचा प्रवास

केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील प्राकुलम गावात राहणाऱ्या भागीरथी अम्मांना लहानपणापासूनच शिकण्याची प्रचंड आवड होती. मात्र, वयाच्या अवघ्या नऊ वर्षांच्या असताना त्यांच्या आईचे निधन झाले. लहान भावंडांना सांभाळत आणि घराची जबाबदारी अंगावर आल्याने त्यांना तिसरीनंतर शिक्षण सोडावे लागले. त्यानंतर वयाच्या ३० व्या वर्षी पतीचे निधन झाल्याने ६ मुलांचे संगोपन करण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली. आयुष्यभर संकटांचा सामना करताना त्यांचे शिक्षणाचे स्वप्न अधुरेच राहिले होते.

Travel : परदेशात कशाला जायचं? भारताच्या या ठिकाणी मिळतो Venice चा फिल, कुठे आहे ते जाणून घ्या

१०५ व्या वर्षी परीक्षेचा पराक्रम

शिक्षणाची ही अपूर्ण राहिलेली जिद्द अखेर केरळ राज्य साक्षरता मिशनच्या माध्यमातून पूर्ण झाली. वयाच्या १०५ व्या वर्षी त्यांनी इयत्ता चौथीची परीक्षा दिली.त्यांनी मल्याळम, पर्यावरण शास्त्र आणि गणित या विषयांची परीक्षा अतिशय उत्साहाने दिली. ५ फेब्रुवारी २०२० रोजी एकूण २७५ गुणांपैकी २०९ गुण (७५% पेक्षा जास्त) मिळवून त्या अभूतपूर्व यशाने उत्तीर्ण झाल्या. गणित विषयात तर त्यांना १०० पैकी १०० गुण मिळाले, जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

राष्ट्रीय सन्मान आणि जागतिक ओळख

त्यांच्या या अतुलनीय जिद्दीची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात घेतली आणि त्यांचे कौतुक केले. भारत सरकारने त्यांना महिला सक्षमीकरणासाठी दिला जाणारा सर्वोच्च ‘नारी शक्ती पुरस्कार’ देऊन सन्मानित केले.

केरळचा पारंपरिक पदार्थ: फास्ट फूड खाण्याऐवजी आहारात करा पंकांजीचे सेवन, उन्हाळ्यात शरीराला होतील फायदे

शिक्षणाची अखंड ज्योत

भागीरथी अम्मांचा हा प्रवास केवळ एका परीक्षेपुरता मर्यादित नव्हता, तर तो निरक्षरतेविरुद्ध आणि वाढत्या वयाच्या मर्यादांवर मिळवलेला मोठा विजय होता. दृष्टी आणि ऐकण्याची क्षमता कमी झालेली असतानाही त्यांनी दाखवलेली अभ्यासाची चिकाटी आजच्या युवा पिढीसाठी एक मोठा धडा आहे. वय हे ज्ञानाच्या मार्गात कधीही अडसर ठरू शकत नाही, हे भागीरथी अम्मांनी आपल्या कृतीतून जगाला दाखवून दिले. २२ जुलै २०२१ रोजी वयाच्या १०७ व्या वर्षी भागीरथी अम्मांनी वयाच्या कारणाने जगातून निरोप घेतला.

Web Title: Kerala oldest student bhageerathi amma education story inspiring story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • education
  • Kerala

संबंधित बातम्या

India’s High Paying Jobs: नोकरी शोधताय? ‘या’ क्षेत्रात आहे बक्कळ पैसा
1

India’s High Paying Jobs: नोकरी शोधताय? ‘या’ क्षेत्रात आहे बक्कळ पैसा

कोटा पोलिसांची धडक कारवाई: अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार करणारे शूटर १५ मिनिटांत जेरबंद; जाणून घ्या IPS तेजस्विनी गौतमबद्दल
2

कोटा पोलिसांची धडक कारवाई: अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार करणारे शूटर १५ मिनिटांत जेरबंद; जाणून घ्या IPS तेजस्विनी गौतमबद्दल

Psychology: करिअरच्या दृष्टीने एक युनिक आणि उत्तम विषय
3

Psychology: करिअरच्या दृष्टीने एक युनिक आणि उत्तम विषय

DU PhD Admission 2026: मास्टर्सशिवाय थेट PhD ची संधी, ४ वर्षांच्या ग्रॅज्युएशन असणाऱ्यांसाठी या आहेत अटी
4

DU PhD Admission 2026: मास्टर्सशिवाय थेट PhD ची संधी, ४ वर्षांच्या ग्रॅज्युएशन असणाऱ्यांसाठी या आहेत अटी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.