Lokmanya Bal Gangadhar Tilak's death anniversary 01 August History marathi dinvishesh
स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये बहुमुल्य योगदान देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी आहे. लोकमान्य टिळक यांनी त्यांच्या लेखणीमधून ब्रिटीश सरकारची झोप उडवली होती. टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते मानले जातात. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” या स्वराज्य घोषणेने सर्वामध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. त्याचबरोबर केसरी या त्यांच्या वृत्तपत्रामधून लेख लिहून ब्रिटीश सरकारला अनेकदा चपराक लगावली होती. आजच्या दिवशी 1920 साली लोकमान्य टिळक यांनी जगाचा निरोप घेतला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा