Din Vishesh
मराठी सिनेसृष्टीतील बहुआयामी कलाकार म्हणून ओळखले जाणारे सनिच पिळगावकर यांचा आज जन्मदिवस. त्यांनी बालकलाकार म्हणून आपल्या करियला सुरुवात केली. त्यांनी अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि दूरदर्शन कार्यक्रम संचालक म्हणून काम केले आहे. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. “अशी ही बनवा बनवी” , “गीत गात चल”, “सिंहासन”, “गणपतीपुळे” यांसारख्या मराठी चित्रपटांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. त्यांच्या दिग्दर्शनातूनही अनेक उत्कृष्ट चित्रपट लोकांना पाहायला मिळाले आहेत. तसेच “शोले” या हिंदी चित्रपटामध्ये अमिताभ बच्चनसोबतही त्यांंनी काम केले आहे. आजही हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नवराष्ट्रा विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा