Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Natal Indian Congress: आज नॅटल इंडियन कॉंग्रेसचा स्थापना दिवस; जाणून घ्या २२ ऑगस्टचा इतिहास..

Natal Indian Congress: आजच्या दिवशी १८९४ मध्ये महात्मा गांधींनी नॅटल इंडियन काँग्रेसची स्थापना केली. दक्षिण आफ्रिकेत वास्तव्य करणाऱ्या भारतीय नागरिक आणि व्यापाऱ्यांवर होणाऱ्या कायदेशीर व वर्णद्वेषी अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हा या संघटनेचा उद्देश होता.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 22, 2026 | 09:11 AM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Follow Us:

Natal Indian Congress : नॅटल इंडियन काँग्रेसची स्थापना आज म्हणजेच २२ ऑगस्ट १८९४ रोजी महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेतील नॅटल प्रांतात केली. दक्षिण आफ्रिकेत वास्तव्य करणाऱ्या भारतीय नागरिक आणि व्यापाऱ्यांवर होणाऱ्या कायदेशीर व वर्णद्वेषी अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हा या संघटनेचा मुख्य उद्देश होता. या संघटनेच्या माध्यमातून महात्मा गांधींनी विभक्त व विखुरलेल्या भारतीय समुदायाला एकत्र आणले आणि त्यांच्या हक्कासाठी ब्रिटिश सरकार व प्रशासनाकडे कायदेशीर मार्गाने लढा दिला. पुढे जाऊन या संघटनेने दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषाविरोधात आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. दक्षिण आफ्रिकेच्या इतिहासात भारतीयांच्या हक्कासाठी स्थापन झालेली ही पहिलीच राजकीय व सामाजिक संघटना मानली जाते.

२२ ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1639 : ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने मद्रास (आताचे चेन्नई) शहराची स्थापना केली.
  • 1848 : अमेरिकेने न्यू मेक्सिको हा प्रांत ताब्यात घेतला.
  • 1894 :- महात्मा गांधींनी नतालमधील भारतीय व्यापाऱ्यांविरुद्ध भेदभावाचा सामना करण्यासाठी नॅटल इंडियन काँग्रेस ची स्थापना केली.
  • 1902 : कॅडिलॅक मोटर कंपनीची स्थापना.
  • 1902 : थिओडोर रुझवेल्ट मोटार वाहनात स्वार होणारे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले.
  • 1941 : दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्याने लेनिनग्राडला वेढा घातला.
  • 1942 : दुसरे महायुद्ध – ब्राझीलने जर्मनी आणि इटलीविरुद्ध युद्ध पुकारले.
  • 1944 : दुसरे महायुद्ध – सोव्हिएत युनियनने रोमानिया जिंकला.
  • 1962 : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स डी गॉल यांच्या हत्येचा कट उधळून लावला.
  • 1972 : वर्णभेद धोरणांमुळे झिम्बाब्वेला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतून बाहेर काढण्यात आले.

२२ ऑगस्ट रोजी जन्म दिनविशेष

  • 1647 : ‘डेनिस पेपिन’ – प्रेशर कुकर चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 26 ऑगस्ट 1713)
  • 1848 : ‘मेलविले एलिया स्टोन’ – शिकागो डेली न्यूज चे स्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 15 फेब्रुवारी 1929)
  • 1893 : ‘डोरोथी पार्कर’ – अमेरिकन लेखक यांचा जन्म.
  • 1904 : ‘डेंग जियाओ पिंग’ – सुधारणावादी चिनी नेते यांचा जन्म. (मृत्यू : 19 फेब्रुवारी 1997)
  • 1915 : ‘शंभू मित्रा’ – बंगाली नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 19 मे 1997)
  • 1915 : ‘जेम्स हिलियर’ – इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे रचनाकार यांचा जन्म. (मृत्यू : 15 जानेवारी 2007)
  • 1919 : ‘गिरिजाकुमार माथूर’ – हिंदी कवी यांचा जन्म. (मृत्यू : 10 जानेवारी 1994)
  • 1918 : ‘डॉ. बानू कोयाजी’ – सामाजिक कार्यकर्त्या यांचा जन्म. (मृत्यू : 15 जुलै 2004)
  • 1920 : ‘डॉ. डेंटन कुली’ – हृदयरोपण शस्त्रक्रियेचा पाया घालणारे अमेरिकन शल्यविशारद यांचा जन्म.
  • 1935 : ‘पंडित गोपीकृष्ण’ – कथ्थक शैलीचे नर्तक अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 18 फेब्रुवारी 1994)
  • 1955 : ‘चिरंजीवी’ – अभिनेते आणि केंद्रीय मंत्री यांचा जन्म.
  • 1964 : ‘मॅट्स विलँडर’ – स्वीडीश टेनिस खेळाडू यांचा जन्म.
  • 1996 : ‘नेहल चुडासामा’ – 2018 ची मिस दिवा मिस युनिव्हर्स यांचा जन्म.
Supreme Court : कोण आहेत कोस्ट गार्डच्या साहसी अधिकारी प्रियंका त्यागी? ज्यांच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला जाब विचारला!

२२ ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1350 : ‘फिलिप (सहावा)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन.
  • 1607 : ‘बर्थलॉम्व गोस्नेल’ – लंडन कंपनीची स्थापक यांचे निधन.
  • 1818 : ‘वॉरन हेस्टिंग्ज’ – भारताचे पहिले गव्हर्नर जनरल यांचे निधन. (जन्म : 6 डिसेंबर 1732)
  • 1967 : ‘ग्रेगरी गुडविन पिंटस’ – जन्म नियंत्रण गोळीचे निर्मिते यांचे निधन. (जन्म : 9 एप्रिल 1903)
  • 1978 : ‘जोमोके न्याटा’ – केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 20 ऑक्टोबर 1893)
  • 1980 : ‘किशोर साहू’ – चित्रपट अभिनेते, निर्माते दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म : 22 नोव्हेंबर 1915)
  • 1980 : ‘जेम्स स्मिथ मॅकडोनेल’ – मॅकडोनेल विमानाचे निर्माते यांचे निधन. (जन्म : 9 एप्रिल 1899)
  • 1982 : ‘एकनाथ रानडे’ – क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार यांचे निधन. (जन्म : 19 नोव्हेंबर 1914)
  • 1989 : ‘पं. कृष्णराव शंकर पंडित’ – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक यांचे निधन. (जन्म : 26 जुलै 1893)
  • 1995 : ‘पं. रामप्रसाद शर्मा’ – संगीतकार, ट्रम्पेट व्हायोलिनवादक यांचे निधन.
  • 1999 : ‘सूर्यकांत मांढरे’ – मराठी चित्रपट रंगभूमीवरील अभिनेते यांचे निधन.
  • 2014 : ‘यू. ए. अनंतमूर्ती’ – भारतीय लेखक, कवी आणि नाटककार यांचे निधन. (जन्म : 21 डिसेंबर 1932)
IIT Bombay : टेक प्रोफेशनल्ससाठी खूशखबर! IIT बॉम्बेकडून ‘हा’ नवीन डिप्लोमा कोर्स सुरू..

Web Title: Natal indian congress foundation history mahatma gandhi marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 09:11 AM

Topics:  

  • day history
  • dinvishesh

संबंधित बातम्या

World Senior Citizen Day : अनुभवाचा अनमोल ठेवा! जाणून घ्या 21 ऑगस्टलाच का साजरा केला जातो ‘हा’ खास दिवस??
1

World Senior Citizen Day : अनुभवाचा अनमोल ठेवा! जाणून घ्या 21 ऑगस्टलाच का साजरा केला जातो ‘हा’ खास दिवस??

Poets Day: मराठी काव्याचा समृद्ध वारसा, भावनांचा उत्सव अन् समाजाचा आरसा; कवी दिनानिमित्त दिग्गज साहित्यिकांच्या आठवणींना उजाळा
2

Poets Day: मराठी काव्याचा समृद्ध वारसा, भावनांचा उत्सव अन् समाजाचा आरसा; कवी दिनानिमित्त दिग्गज साहित्यिकांच्या आठवणींना उजाळा

World Mosquito Day: सर रोनाल्ड रोस यांचा तो ऐतिहासिक शोध! 20 ऑगस्ट आणि ‘जागतिक डास दिना’चा काय आहे खास संबंध?
3

World Mosquito Day: सर रोनाल्ड रोस यांचा तो ऐतिहासिक शोध! 20 ऑगस्ट आणि ‘जागतिक डास दिना’चा काय आहे खास संबंध?

National Radio Day 2026: का 20 ऑगस्टलाच साजरा केला जातो राष्ट्रीय रेडिओ दिन? जाणून घ्या ऑल इंडिया रेडिओचा इतिहास आणि महत्त्व
4

National Radio Day 2026: का 20 ऑगस्टलाच साजरा केला जातो राष्ट्रीय रेडिओ दिन? जाणून घ्या ऑल इंडिया रेडिओचा इतिहास आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.