Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गायीच्या गोठ्यापासून ओटच्या शेतापर्यंत…; दुधाच्या बदलत्या कपाची ५ हजार वर्षांची रंजक कहाणी

सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी ब्राझीलमधून काजू गोव्यात आणल्यानंतर भारतीय पाककलेत काजूच्या पेस्टचा वापर वाढला. कोर्मा, मिठाई आणि विविध पदार्थांमधून या सांस्कृतिक संगमाची चव आजही टिकून आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 22, 2026 | 04:06 PM
गायीच्या गोठ्यापासून ओटच्या शेतापर्यंत...; दुधाच्या बदलत्या कपाची ५ हजार वर्षांची रंजक कहाणी

गायीच्या गोठ्यापासून ओटच्या शेतापर्यंत...; दुधाच्या बदलत्या कपाची ५ हजार वर्षांची रंजक कहाणी

Follow Us
Follow Us:

दुधाच्या बदलत्या कपाची रंजक कहाणी
आरोग्य, पर्यावरणामुळे वाढती पसंती
पाच हजार वर्षांची वनस्पतीजन्य दुधाची परंपरा पुन्हा ट्रेंडमध्ये

सुनयना सोनवणे / पुणे: आज कॉफीच्या कपात ‘ओट मिल्क’ आहे; काल मुघलांच्या प्याल्यात केशर-वेलचीचं बदाम दूध होतं आणि त्याही हजारो वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये टायगर नटपासून दुधासारखं पेय तयार होत होतं! वनस्पतींपासून ‘दूध’ तयार करण्याची कल्पना आधुनिक आरोग्य-जागरूकतेची देणगी नसून तब्बल पाच हजार वर्षांची खाद्यपरंपरा आहे. जागतिक वनस्पतीजन्य दूध दिनाच्या निमित्ताने (२२ऑगस्ट ) हीच जुनी परंपरा नव्या रूपात पुन्हा चर्चेत आली आहे.

इजिप्तमध्ये सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी टायगर नट भिजवून त्यापासून दुधासारखे पेय तयार केले जात होते. नारळाचे दूध प्रशांत महासागर आणि दक्षिण आशियातील पारंपरिक आहाराचा भाग राहिले, तर चीनमध्ये सुमारे दोन हजार वर्षांपासून सोया दुधाची परंपरा आहे.

भारतात बदाम दूध मुघलकालीन राजेशाही पाककलेचा महत्त्वाचा भाग होते. केशर, वेलची आणि गुलाबपाण्याने तयार होणारे हे पेय वैभवाचे प्रतीक मानले जात असे. सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी ब्राझीलमधून काजू गोव्यात आणल्यानंतर भारतीय पाककलेत काजूच्या पेस्टचा वापर वाढला. कोर्मा, मिठाई आणि विविध पदार्थांमधून या सांस्कृतिक संगमाची चव आजही टिकून आहे.

1947 Vs 2026 : पेट्रोल 25 पैसे, दूध 20 पैसे अन् सोनं फक्त… 1974 च्या किमती पाहून डोळे पांढरे होतील; महागाईचा 79 वर्षांचा प्रवास

आरोग्याच्या ‘कपात’ नवे पर्याय 
लॅक्टोज असहिष्णुता, वनस्पतीआधारित आहार, बदलती जीवनशैली आणि पर्यावरणाबाबत वाढती जागरूकता यामुळे प्लांट मिल्कला मागणी वाढत आहे. बदाम, सोया, ओट, काजू आणि नारळापासून तयार होणारे दूध आता घरांपासून कॅफेपर्यंत पोहोचले आहे. मात्र सर्व वनस्पतीजन्य दूध पोषणाच्या दृष्टीने सारखे नसते. सोया मिल्कमध्ये तुलनेने अधिक प्रथिने असतात; बदाम मिल्कमध्ये कॅलरी आणि प्रथिने कमी असू शकतात, तर ओट मिल्क चव आणि पोतमुळे कॉफीसाठी लोकप्रिय आहे. त्यामुळे प्लांट मिल्क निवडताना त्यातील साखर, प्रथिने, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वांचे प्रमाण तपासणे महत्त्वाचे आहे.

‘प्लांट मिल्क म्हणजे प्राणिजन्य दुधापेक्षा आपोआप अधिक आरोग्यदायी, असा निष्कर्ष काढता येत नाही. व्यक्तीची गरज आणि उत्पादनातील प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्वे व साखरेचे प्रमाण पाहून पर्याय निवडणे महत्त्वाचे आहे.’
– डॉ. अविनाश कोरे, आहारतज्ज्ञ

सकाळी की रात्री? दूध पिण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या आरोग्यदायी पर्याय

वनस्पतीजन्य दुधाचे प्रकार: काय खास?

प्रकार – वैशिष्ट्य

सोया मिल्क – तुलनेने अधिक प्रथिने; हृदयाच्या आरोग्यासाठी संभाव्य फायदे

बदाम मिल्क – तुलनेने कमी कॅलरी व प्रथिने; फोर्टिफाइड प्रकारातून कॅल्शियम व जीवनसत्त्व डी

ओट मिल्क – चव व पोतमुळे कॉफी आणि पेयांमध्ये लोकप्रिय
काजू मिल्क मलईदार पोत; पेये, मिठाई व स्वयंपाकात वापर

नारळाचे दूध – भारतीय व आग्नेय आशियाई पाककृतींचा पारंपरिक भाग; स्वतंत्र पोषणमूल्य

Web Title: Navarashtra special story plant based milk history 5000 oat almond tadition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 04:03 PM

Topics:  

  • coffee
  • milk
  • navarashtra special

संबंधित बातम्या

आता थांबायचं नाही! Olympic 2036 साठी भारताचा ‘मास्टर प्लॅन’; हॉकीचा चेहरामोहरा बदलणार
1

आता थांबायचं नाही! Olympic 2036 साठी भारताचा ‘मास्टर प्लॅन’; हॉकीचा चेहरामोहरा बदलणार

World Plant Milk Day 2026: हृदयरोग आणि अपचनावर मात! जाणून घ्या बदाम आणि सोया दूध पिण्याचे थक्क करणारे आरोग्यदायी फायदे
2

World Plant Milk Day 2026: हृदयरोग आणि अपचनावर मात! जाणून घ्या बदाम आणि सोया दूध पिण्याचे थक्क करणारे आरोग्यदायी फायदे

Madras Day: मद्रास दिनानिमित्त जाणून घ्या चेन्नईचा गौरवशाली इतिहास; 1639 चा करार, स्थापत्यकलेचे वैभव आणि आधुनिक शहराची खास गोष्ट
3

Madras Day: मद्रास दिनानिमित्त जाणून घ्या चेन्नईचा गौरवशाली इतिहास; 1639 चा करार, स्थापत्यकलेचे वैभव आणि आधुनिक शहराची खास गोष्ट

World Senior Citizen Day : अनुभवाचा अनमोल ठेवा! जाणून घ्या 21 ऑगस्टलाच का साजरा केला जातो ‘हा’ खास दिवस??
4

World Senior Citizen Day : अनुभवाचा अनमोल ठेवा! जाणून घ्या 21 ऑगस्टलाच का साजरा केला जातो ‘हा’ खास दिवस??

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.