Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

४५ मिनिटांचा प्रवास आता २० मिनिटांत! जेव्हीपीडी उड्डाणपुलाचे काम वेगात, २०२७ मध्ये वाहतुकीसाठी खुला होणार

मुंबईच्या पश्चिम उपनगरांमधील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने जेव्हीपीडी उड्डाणपुलाचे काम वेगाने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या पुलामुळे अंधेरी, जुहू आणि विलेपार्ले परिसरातील प्रवास अधिक जलद होण्याची अपेक्षा आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 15, 2026 | 10:25 AM
४५ मिनिटांचा प्रवास आता २० मिनिटांत! जेव्हीपीडी उड्डाणपुलाचे काम वेगात, २०२७ मध्ये वाहतुकीसाठी खुला होणार

४५ मिनिटांचा प्रवास आता २० मिनिटांत! जेव्हीपीडी उड्डाणपुलाचे काम वेगात, २०२७ मध्ये वाहतुकीसाठी खुला होणार

Follow Us
Follow Us:
  • जेव्हीपीडी उड्डाणपूल ३१ डिसेंबर २०२७ पर्यंत सुरू करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट.
  • सुमारे १.७५ किलोमीटर लांबीचा पूल; प्रवासाचा वेळ ४५ मिनिटांवरून २० मिनिटांपर्यंत येण्याची अपेक्षा.
  • जुहू, अंधेरी आणि विलेपार्ले परिसरातील पाच प्रमुख जंक्शनवरील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत.
पश्चिम उपनगरांमधील तीव्र वाहतूककोंडीतून वाहनचालकांची सुटका करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेतर्फे उभारण्यात येणारा जेव्हीपीडी (जुहू-विलेपार्ले डेव्हलपमेंट स्कीम) उड्डाणपूल निर्धारित मुदतीपूर्वी, म्हणजेच ३१ डिसेंबर २०२७ पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे. या पुलामुळे गर्दीच्या वेळेत होणारा सुमारे ४५ मिनिटांचा प्रवास अवघ्या २० मिनिटांवर येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी नुकतीच या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा सविस्तर आढावा घेतला.

Mumbai News: मलजल प्रक्रिया केंद्राचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करा! काम न झाल्यास दंडात्मक कारवाई; महापालिकेने दिला इशारा

जलद देलासा मळणार

अंधेरी पश्चिम येथील सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाच्या टोकापासून ते जुहु-वेसावे जोड रस्त्यापर्यंत १ हजार ७५० मीटर (१.७५ किमी) लांबीचा आणि १५.१० मीटर रुंदीचा हा उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. प्रकल्पाची मूळ अंतिम मुदत ३१ मार्च २०२८ असली, तरी नागरिकांना जलद दिलासा मिळावा यासाठी कामे जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश बांगर यांनी दिले आहेत.

अभियांत्रिकी आव्हाने आणि मेट्रोशी समन्वय

या प्रकल्पाच्या मार्गात भूगर्भातील महत्वाच्या पायाभूत सुविधांचे स्थलांतर करणे आणि मेट्रो मार्गिका २ बीच्या कामांशी ताळमेळ राखणे है मोठे आव्हान आहे. यामध्ये ६०० व ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांचे ४०० मीटरपर्यंत स्थलांतर, १२०० मिमी व्यासाच्या मलवाहिनीचे ‘मायक्रोटनेलिंग’ तंत्रज्ञानाद्वारे स्थलांतर आणि मैट्रो स्थानकाखाली आडव्या दिशेने गर्डर सरकवणे यांसारख्या गुंतागुंतीच्या कामाचा समावेश आहे. तसेच, ९० फूट जंक्शनवर ७मीटर लांबीचा कमानी पूल आणि जुहू सर्कल येथे कमी खांबांवर मोठे स्पॅन उभारले जाणा-आहेत. ही कामे विहित वेळेत पूर्ण होण्यासाठी संपूर्ण प्रकल्पाची तीन टप्प्यांत विभागणी करून स्वतंत्र चमूंमार्फत समांतर पद्धतीने काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Mumbai: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ८४८ एकर जमिनीचा प्रश्न मार्गी लागणार? राज्यमंत्री योगेश कदम ॲक्शन मोडमध्ये

पाच चौकांतील कोंडीतून नागरिकांची सुटका

उड्डाणपुलामुळे जुहू सर्कलसह परिसरातील पाच प्रमुख वाहतूक जंक्शनवरील ताण पूर्णपणे दूर होणार आहे. प्रस्तावित वेसावे-वांद्रे सागरी सेतू आणि मुंबई किनारा रस्ता (उत्तर) यांच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना याचा मोठा फायदा होईल, जुहू, विलेपार्ले पश्चिम, अंधेरी पश्चिम आणि वसौंवा परिसरातील अंतर्गत रस्ते वाहतूक गतिमान होण्यास मोठी मदत होणार आहे, असे पालिकेकडून सांगण्यात आले.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Jvpd flyover mumbai juhu andheri vile parle traffic congestion relief december 2027 nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • Flyover
  • Mumbai News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Exclusive Navarashtra-Navadurga: चेहरा जळाला, पण स्वप्नं नाही! शरीरावर भाजल्याचे व्रण असतानाही मिताली बनली सुपरमॉडेल
1

Exclusive Navarashtra-Navadurga: चेहरा जळाला, पण स्वप्नं नाही! शरीरावर भाजल्याचे व्रण असतानाही मिताली बनली सुपरमॉडेल

Mumbai News: मलजल प्रक्रिया केंद्राचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करा! काम न झाल्यास दंडात्मक कारवाई; महापालिकेने दिला इशारा
2

Mumbai News: मलजल प्रक्रिया केंद्राचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करा! काम न झाल्यास दंडात्मक कारवाई; महापालिकेने दिला इशारा

आता प्रवास एकदम आरामदायी होणार! बोरघाटात Vande Bharat Sleeper ची बाजी; वेग चाचणी यशस्वी
3

आता प्रवास एकदम आरामदायी होणार! बोरघाटात Vande Bharat Sleeper ची बाजी; वेग चाचणी यशस्वी

च्युइंग गम मिठाई नाही! गुजरात हायकोर्टाचा मोठा निर्णय, १२.५% व्हॅट आकारणीचा निर्णय कायम
4

च्युइंग गम मिठाई नाही! गुजरात हायकोर्टाचा मोठा निर्णय, १२.५% व्हॅट आकारणीचा निर्णय कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.