Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wieliczka Salt Mine: पोलंडमधील 700 वर्षे जुन्या मिठाच्या खाणीत जमिनीखाली वसलेले अद्भूत जग; गर्दी सांभाळण्यासाठी आता AI चा वापर

पोलंडमधील ७०० वर्षे जुनी विएलिच्का मिठाची खाण दरवर्षी विक्रमी संख्येने पर्यटकांना आकर्षित करत आहे. पर्यटकांच्या या वाढत्या संख्येला प्रतिसाद म्हणून, पोलंडने गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू केला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 31, 2026 | 08:04 PM
poland wieliczka salt mine underground city ai tourists record marathi news

poland wieliczka salt mine underground city ai tourists record marathi news

Follow Us
Follow Us:
  • १९ लाखांहून अधिक पर्यटकांचा नवा विक्रम
  • जमिनीखाली ३०० मीटर खोल अद्भुत जग
  • गर्दी नियंत्रणासाठी AI एआय तंत्रज्ञानाचा वापर

जगाच्या पाठीवर अशा अनेक वास्तू आणि नैसर्गिक आश्चर्ये आहेत, जी मानवाला भुरळ पाडतात. परंतु, पोलंडमधील ‘विएलिच्का मिठाची खाण’ (Wieliczka Salt Mine) हे एक असे स्थळ आहे, जिथे जमिनीखाली शेकडो फूट खोल एका नव्या कलात्मक जगाची निर्मिती झाली आहे. १३ व्या शतकापासून ते २० व्या शतकापर्यंत सातत्याने मीठ उत्खनन केलेल्या या ऐतिहासिक खाणीने आता जगभरातील पर्यटकांना आकर्षित केले आहे. २०२५ या वर्षात तब्बल १९.१ लाख पर्यटकांनी या भूगर्भातील अद्भूत नगरीला भेट देऊन नवा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित (UNESCO) केला आहे. पर्यटकांच्या या अलोट गर्दीचे नियोजन करण्यासाठी आता थेट कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर केला जात आहे.

क्राकोव (Krakow) शहरापासून अवघ्या १६ किलोमीटर अंतरावर असलेली ही मिठाची खाण केवळ ऐतिहासिक वारसा नसून मानवी कलाकुसर आणि अभियांत्रिकीचा एक अद्वितीय नमुना मानली जाते. ही खाण जमिनीखाली सुमारे ३२७ मीटर (अंदाजे १,०७२ फूट) खोल पसरलेली आहे. ९ वेगवेगळ्या स्तरांवर (Levels) पसरलेल्या या खाणीत तब्बल २४५ किलोमीटर लांबीचे बोगदे तयार झाले आहेत. यात २,००० हून अधिक विशाल खोल्या असून, त्यातील भूमिगत तलाव, विशाल प्रार्थनास्थळे (Chapels) आणि मिठाच्या खडकांत कोरलेली भव्य शिल्पे पर्यटकांचे भान हरपून टाकतात.

मिठापासून बनवलेले भव्य मंदिर आणि कलाकृती

विएलिच्का मिठाच्या खाणीतील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ‘सेंट किंगा प्रार्थनास्थळ’ (Chapel of St. Kinga). जमिनीखाली १०० मीटरपेक्षा जास्त खोलीवर वसलेल्या या संपूर्ण मंदिराची निर्मिती खाणकामगारांनी आणि कलाकारांनी केवळ मिठाच्या खडकांपासून केली आहे. या प्रार्थनास्थळातील खांब, जमिनीवरील फरशी, भिंतीवरील कोरीव काम, प्रसिद्ध ‘द लास्ट सपर’ चित्राची मिठातील प्रतिकृती आणि छताला टांगलेली नयनरम्य झुंबरे (Chandeliers) – हे सर्व काही अस्सल मिठापासून बनवलेले आहे. येथील झुंबरांमधील स्फटिकसुद्धा शुद्ध मिठाचेच आहेत, जे दिव्यांच्या प्रकाशात दैवी तेज निर्माण करतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iceberg Project: जेव्हा सौदी राजकुमाराने अंटार्क्टिकाचा बर्फ आणला वाळवंटात; 1977 मधील ‘जगातील सर्वात महागड्या हिमनगाची’ रंजक कथा

या खाणीचा इतिहास सुमारे १३.५ दशलक्ष वर्षांपूर्वीचा मानला जातो. जेव्हा लाखो वर्षांपूर्वी टेक्टॉनिक प्लेट्सच्या हालचालींमुळे या भागातून समुद्र मागे हटला, तेव्हा कार्पेथियन पर्वतरांगांच्या परिसरात हॅलाइट म्हणजेच मिठाचे अजस्त्र साठे तयार झाले. या खडकांमध्ये ९० ते ९५ टक्के शुद्ध मीठ असते आणि विविध खनिजांच्या मिश्रणामुळे या मिठाचा रंग पांढरा नसून नैसर्गिक राखाडी किंवा काळा दिसतो. १३ व्या शतकापासून सलग सात शतके येथून मीठ काढण्यात येत होते; परंतु १९९६ मध्ये औद्योगिक उत्खनन पूर्णपणे थांबवण्यात आले आणि या जागेचे एका प्रेक्षणीय वारसा स्थळात रूपांतर झाले. युनेस्कोने (UNESCO) १९७८ मध्ये जाहीर केलेल्या पहिल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत या मिठाच्या खाणीचा समावेश करण्यात आला होता.

पर्यटकांच्या विक्रमी ओघासाठी AI चॅटबॉट्सचे साहाय्य

कोरोना महामारी आणि युक्रेन युद्धाच्या संकटानंतर या पर्यटन स्थळाने पुन्हा एकदा अभूतपूर्व उभारी घेतली आहे. २०२५ मध्ये आलेल्या १.९१ दशलक्ष पर्यटकांपैकी ७० टक्क्यांहून अधिक पर्यटक हे ब्रिटन, इटली, फ्रान्स आणि अमेरिकेसारख्या परदेशातून आले होते. दरवर्षी वाढणाऱ्या पर्यटकांमुळे होणारी वाहतूक, तिकीट बुकिंगची गर्दी आणि माहिती विचारणाऱ्या प्रवाशांची संख्या हाताळण्यासाठी पोलंड प्रशासनाने क्राकोव-स्थित ‘चॅटलॅब’ (ChatLab) कंपनीच्या सहकार्याने अत्याधुनिक एआय चॅटबॉट्स (AI Chatbots) तैनात केले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Saudi Arabia : दुपारीच होणार रात्र! सौदी अरेबियात 2 ऑगस्ट 2027 ला घडणार 21 व्या शतकातील सर्वात दुर्मिळ चमत्कार

हे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित व्हर्च्युअल असिस्टंट्स तब्बल २० विविध भाषांमध्ये पर्यटकांशी संवाद साधू शकतात. पर्यटकांच्या १७ टक्क्यांहून अधिक ऑनलाईन चौकशा आणि तिकीट नियोजनाची कामे हे AI चॅटबॉट्स अगदी सहज हाताळत आहेत. यामुळे मानवी कर्मचाऱ्यांवरील ताण कमी झाला असून पर्यटकांना २४ तास त्वरित माहिती मिळणे शक्य झाले आहे.

जमिनीखालील शुद्ध आणि खनिजयुक्त हवेमुळे येथे श्वसनविकारांवर उपचार करणारे एक भूमिगत आरोग्य केंद्रही (Sanatorium/Spa) चालवले जाते. इतिहास, निसर्गाचे आश्चर्य, मानवी कला आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा हा संगम पाहण्यासाठी आज संपूर्ण जगातून लोक पोलंडच्या या मिठाच्या जगात हजेरी लावत आहेत.

Web Title: Poland wieliczka salt mine underground city ai tourists record marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 08:04 PM

Topics:  

  • UNESCO
  • World Heritage Site
  • World news

संबंधित बातम्या

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
1

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
2

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.