Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ज्याचा पास मिळवायला भांडलो, तिथंच…’! कृष्णकुमार गोयल यांचा ‘नवराष्ट्र’शी खास संवाद

मी गेले काही वर्षे ‘पुणे फेस्टिव्हल’चा उपाध्यक्ष आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नियोजनात माझा सहभाग असतोच. कलमाडी साहेबांसोबत काम करतानाही मजा यायची, असे कृष्णकुमार गोयल म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 26, 2026 | 02:35 AM
‘ज्याचा पास मिळवायला भांडलो, तिथंच…’! कृष्णकुमार गोयल यांचा ‘नवराष्ट्र’शी खास संवाद
Follow Us
Follow Us:

‘पुणे फेस्टिव्हल’च्या अध्यक्षपदी कृष्णकुमार गोयल यांची निवड
फेस्टिव्हलला पुन्हा पूर्वीचे वैभव मिळवून देण्याचा गोयल यांनी व्यक्त केला निर्धार
कृष्णकुमार गोयल यांनी साधला नवराष्ट्रशी संवाद

पुणे/गायत्री पवळे: गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक ठरलेल्या आणि माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात नावलौकिक मिळवलेल्या ‘पुणे फेस्टिव्हल’च्या अध्यक्षपदी उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्ते कृष्णकुमार गोयल यांची नुकतीच निवड झाली आहे. आर्थिक आव्हानांवर मात करत फेस्टिव्हलला पुन्हा पूर्वीचे वैभव मिळवून देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. ज्याचा पास मिळवायला भांडलो, तिथंच अध्यक्ष झालो!, सुरेश कलमाडी यांच्यासोबतचा अनुभव, फेस्टिव्हलच्या आठवणी आणि भविष्यातील नियोजन याविषयी ‘नवराष्ट्र’शी साधलेला हा विशेष संवाद.

१) ‘पुणे फेस्टिव्हल’च्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यावर पहिली भावना काय आहे?
– अर्थातच आनंदाची भावना आहे. मात्र, माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या काळात गाजलेल्या ‘पुणे फेस्टिव्हल’ला गेल्या काही वर्षांत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्या स्थितीत फेस्टिव्हलचे अध्यक्षपद येणे, ही तारेवरची कसरत आहे. मात्र, हा फेस्टिव्हल पुण्याची शान आहे, वैभवशाली परंपरा आहे. त्यामुळे त्याला पुन्हा तसेच वैभव मिळवून देणे हे माझे पहिले ध्येय आहे.

पुणेकरांनो लक्ष द्या ! पुणे आणि परिसरासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा

२) माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्यासोबतही आपण पुणे फेस्टिव्हलचे काम पाहिले आहे. त्याबाबत काय सांगाल?
– अर्थातच… मी गेले काही वर्षे ‘पुणे फेस्टिव्हल’चा उपाध्यक्ष आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नियोजनात माझा सहभाग असतोच. कलमाडी साहेबांसोबत काम करतानाही मजा यायची. सर्वच गोष्टींचे बारकाईने नियोजन करणे त्यांना अभिप्रेत असायचे. त्यामुळेच ‘पुणे फेस्टिव्हल’ गणेशोत्सवाचा अविभाज्य भाग बनला आणि राष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहोचला.

३) ‘पुणे फेस्टिव्हल’बाबत तुमची एखादी अविस्मरणीय आठवण सांगाल?
– खूपच अविस्मरणीय आहे. एक काळ होता, जेव्हा पुणे फेस्टिव्हल सुरू झाला होता. त्यानंतर काही वर्षांतच राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांमुळे तो अल्पावधीत चर्चेत आला. त्याचे पास मिळवण्यासाठी झुंबड उडायची. मलाही एका वर्षी खूप प्रयत्न करूनही पास मिळाला नाही. त्यासाठी भांडलोही. मात्र, काहीही उपयोग झाला नाही. तेव्हाच मी ठरवलं की आपण पुणे फेस्टिव्हलच्या संयोजनातच जायचं आणि अध्यक्षच व्हायचं. कदाचित त्याच निर्धारामुळं मी आज अध्यक्षपदावर आहे.

पीएमपीएमएल ठेकेदाराच्या फायद्यासाठी? नगरसेवकांचा उपरोधिक सवाल; प्रशासनावर जोरदार टीका

४) सध्या मोबाइलवरच अनेक कार्यक्रम लाइव्ह दिसतात. असे असताना नवी पिढी ‘पुणे फेस्टिव्हल’ला येईल असे वाटते?
– मोबाइलचे आव्हान सध्या सर्वच कार्यक्रमांपुढे आहे. मात्र, पुण्यात ‘पुणे फेस्टिव्हल’चे स्थान वेगळे आहे. त्यातील कार्यक्रमांना लोक नक्की येतात. शिवाय आम्ही यंदापासून काही नव्या योजना आणतो आहोत. कालांतराने त्या लोकांपुढे येतीलच. मला हा फेस्टिव्हल एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवायचा आहे. माझ्या स्वप्नातला फेस्टिव्हल करायचा आहे.

Web Title: President of the pune festival krushnkumar goyal special inteview with navarashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Ganesh Festival
  • navarashtra special
  • pune news

संबंधित बातम्या

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले
1

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले

म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा संधी; 4462 सदनिकांसाठी अर्जाची मुदत वाढली, आता सोडत 26 नोव्हेंबरला
2

म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा संधी; 4462 सदनिकांसाठी अर्जाची मुदत वाढली, आता सोडत 26 नोव्हेंबरला

कलाकारांना कौतुकाची थाप आवश्यक, हेमा मालिनी यांचे प्रतिपादन; ‘सुरेश कलमाडी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित
3

कलाकारांना कौतुकाची थाप आवश्यक, हेमा मालिनी यांचे प्रतिपादन; ‘सुरेश कलमाडी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित

RPF Raising Day : कोट्यवधी प्रवाशांचे सुरक्षा कवच! जाणून घ्या ‘रेल्वे संरक्षण दल’ स्थापना दिनाचा इतिहास, महत्त्व आणि विशेष मोहिमा
4

RPF Raising Day : कोट्यवधी प्रवाशांचे सुरक्षा कवच! जाणून घ्या ‘रेल्वे संरक्षण दल’ स्थापना दिनाचा इतिहास, महत्त्व आणि विशेष मोहिमा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.