Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navarashtra special: तापमानवाढ, गारपीट, पूर..; ‘या’ संकटांमागे वाढते कार्बन फूटप्रिंट

आपल्या जीवनशैलीतील अनेक कृती जसे की वाहनांचा वापर, विजेचा- पाण्याचा अपव्यय, प्लास्टिकचा वापर, अन्न आणि वस्तूंचा अपव्यय यांमुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कार्बन उत्सर्जन वाढते.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 08, 2025 | 07:45 PM

पुणे/वैष्णवी सुळके: हवामान बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी कार्बन फूटप्रिंट कमी करणे अत्यावश्यक आहे. निसर्गावर होत असलेला मानवी हस्तक्षेप, वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि ऊर्जेचा अमर्याद वापर यामुळे वातावरणातील हरितगृह वायूंचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.

कार्बन फूटप्रिंट म्हणजे एखाद्या व्यक्ती, संस्था किंवा देशाच्या दैनंदिन उपभोगातून वातावरणात सोडले जाणारे कार्बन डायऑक्साइड आणि इतर हरितगृह वायूंचे एकूण प्रमाण. आपल्या जीवनशैलीतील अनेक कृती जसे की वाहनांचा वापर, विजेचा- पाण्याचा अपव्यय, प्लास्टिकचा वापर, अन्न आणि वस्तूंचा अपव्यय यांमुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कार्बन उत्सर्जन वाढते. हे उत्सर्जन वातावरणात साचत राहते आणि त्यातून हवामान बदलाचे संकट अधिकच गंभीर बनते.

त्याचेच परिणाम म्हणजे हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होऊन तापमान वाढ, समुद्राची वाढती पातळी, पूर, दुष्काळ, गारपीट, वादळे आणि जैवविविधतेचा नाश यांसारख्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. हे संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी आता प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक आहे.

सध्या संपूर्ण जग हवामान बदलाच्या दुष्परिणामांना सामोरे जात आहे. एकीकडे तापमानवाढ, तर दुसरीकडे अनियमित पावसाळा, पूर, दुष्काळ, वादळे आणि समुद्राची वाढती पातळी यांसारख्या समस्या मानवी जीवनावर मोठा परिणाम घडवून आणत आहेत. महाराष्ट्र आणि भारतातही या बदलांची तीव्रता वाढत आहे.

यावर्षीच्या उन्हाळ्यात अनेक भागात तापमानाने विक्रमी उच्चांक गाठला. पुण्यात एप्रिल महिन्यातच ४० अंश सेल्सिअसपर्यंत उष्णता जाणवली. एकीकडे हे तापमानवाढीचे चित्र, तर दुसरीकडे महाराष्ट्रात अनेक भागांत अनपेक्षित अवकाळी पाऊस व गारपीट झाली. ही दोन्ही टोकाची स्थिती म्हणजेच हवामान बदलाचे स्पष्ट लक्षण आहे. याचा थेट संबंध येतो तो कार्बन फूटप्रिंट या संकल्पनेशी.

वाढती कार्बन फूटप्रिंट म्हणजे अधिक प्रमाणात तापमानवाढ, बर्फ वितळणे, समुद्राची वाढती पातळी, अन्न उत्पादनावर परिणाम, वन्यजीवांचे अधिवास नष्ट होणे आणि शेवटी मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. उष्माघात, दमा, त्वचारोग, जलजन्य आजार यांचे प्रमाण वाढते. हवामानातील हे टोकाचे बदल समाजातील आर्थिक आणि सामाजिक असमतोल अधिक वाढवतात.

शहरांमध्ये लोकसंख्या अधिक असल्यामुळे वाहनांची संख्या, इमारतींचा विस्तार, वीजेचा अपव्यय, कचऱ्याचे वाढते प्रमाण, प्लास्टिकचा वापर हे सर्व घटक कार्बन उत्सर्जनात मोठी भर घालतात. मात्र, यासाठी उपाय शोधण्यास पुण्यातील काही गृहनिर्माण सोसायट्या पुढे आल्या आहेत. सौरऊर्जेचा वापर, सेंद्रिय कचऱ्यापासून खतनिर्मिती, सायकलचा वापर, ई-वाहनांची निवड ही काही सकारात्मक पावले उचलली जात आहेत.

शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनीही कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत. इलेक्ट्रिक वाहनांसाठी अनुदान योजना, ग्रीन बिल्डिंग्स धोरण, प्लास्टिक बंदी, पर्यावरण जनजागृती मोहीमा, हरित तंत्रज्ञानाला प्रोत्साहन या उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र, या यशस्वी होण्यासाठी केवळ शासन नव्हे, तर सामान्य नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे.

सध्या कार्बन फूटप्रिंटचे प्रमाण फार वाढत आहे. ते पाणी, हवा अशा विविध स्वरूपातून वाढते ज्यामुळे पर्यावरणास धोका निर्माण होतो. या संस्थेच्या माध्यमातून आम्ही वॉटर फूटप्रिंटसाठी काम करतो. यामध्ये नदी-नाल्यांमध्ये जाणारे सांडपाणी कमी करण्यासाठी त्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी काम करतो. तसेच ग्रीन बिल्डिंग्स वाढीसाठी प्रयत्न करत आहोत. मात्र, व्यक्तिगत पातळीवर यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. आपण गाड्यांचा वापर कमी करून मेट्रोचा वापर वाढवायला हवा. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग, घनकचरा वर्गीकरण केल्यास आपण कार्बन फूटप्रिंट कमी करू शकतो. सोसायटीच्या अवतीभोवती झाडे लावून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.

– सन्मान कुलकर्णी,
वॉटर सस्टेनिब्लीटी फाऊंडेशन

Close

Web Title: Reducing carbon footprint is essential to overcome the threat of climate change navarashtra special

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • navarashtra special
  • weather news

संबंधित बातम्या

मराठवाड्यात अद्यापही पावसाची प्रतीक्षाच; सरासरीही गाठली नाही, तर धाराशिवमध्ये…
1

Independence Day: ‘समर्पण, शौर्य अन् बलिदान’! भारतमातेच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वाच्या ठरल्या ‘या’ घटना
2

उजनी धरण 100 टक्के भरणार; वीजनिर्मिती प्रकल्पच केला गेला बंद
3

IMD Weather Update : उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पावसाचा जोर; उत्तराखंड राज्यासाठी हवामान विभागाकडून धोक्याची घंटा
4

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.