
barred spiral galaxy
आपल्यया पृथ्वीवर, आवकाशात अशी अनेक रहस्ये आहेत, ज्याचा अद्यापही शोध लागलेला नाही. यासाठी वैज्ञानिक, संशोधक सतत अभ्यास करत असतात. नुकतेच खगोलशास्त्रज्ञांनी एका अद्भुत रहस्याचा शोध लागला आहे. या संशोधकांनी ब्रह्मांडातील एक मोठे गुढ उलगडले आहे. खोगलशास्त्रज्ञांना आतापर्यंतची सर्वात जुनी आकाशगंगा सापडली आहे. ही आकाशगंगा Mily Way पेक्षाही जुनी आहे. यामुळे ताऱ्यांची गुंफण कशी होते हे समजण्यास मोठी मदत मिळणार आहे. नेमकं काय आहे हे जाणून घेऊयात.
ॲमेझॉनच्या काळजात काय दडलंय? हजारो वर्षे जगापासून लपलेल्या ‘त्या’ जमातीचा उलगडा
तर नासाच्या प्रगत जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या मदतीने खगोलशास्त्रज्ञांनी आतापर्यंतची सर्वात जुनी बार्ड स्पायरल (Barred Spiral) म्हणजेच आकाशगंगा शोधली आहे. या आकाशगंगेला ceers-74706 असे नाव देण्यात आले असून ही तब्बल ११.५ अब्ज वर्षीपूर्वीची असल्याचे खगोलशास्त्रज्ञांनी म्हटले आहे. या शोधामुळे मानवजातीने ब्रह्मांड समजून घेण्याच्या प्रवासात मोठे यश मिळवले आहे. यामुळे आकाशगंगेच्या उत्क्रांतीच्या सिद्धांताला एक नवी दिशा मिळाली आहे.
या ११.५ अब्ज जुन्या आकाशगंगेचा शोध युनिव्हर्सिटी ऑफ पिटस्बर्ग येथील संशोधकांनी लावला आहे. भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्राचे विद्यार्थी डॅनियल इवानोव्ह हे यांनी या अभ्यासाचे नेतृत्व केले आहे. त्यांनी जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने या आकाशगंगेचा शोध लावला. यानंतर त्यांनी Keck-I टेलिस्कोपवरील MOSFIRE तंत्रज्ञानाचा वापर करुन या आकाशगंगेची संरचना आणि वय निश्चित केले.
खगोलशास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, बहुतेक आकाशगंगा सुरुवातीला अनियमित आणि विस्कळीत स्वरुपाची असतात. कालांतराने या आकाशगंगेचा आकार एका चकतीसारखा होतो आणि यातून सर्पिलाकार आकार तयार होतो. या बार्ड स्पायरलच्या मध्यभागेत ताऱ्यांची एक सरळ रचना बनलेली असते. ही रचना बाहेरील वायु आतमध्ये खेचण्याचे काम करते. यामुळे सुपरमॅसिव्ह ब्लॅकहोलला इंधन पुरवठा मिळतो. ही संपूर्ण प्रक्रिया आकाशंगेतील ताऱ्यांच्या गुंफणासाठी होत असते. आपली Milky Way (मंदाकिनी) देखील अशीच एक बार्ड स्पायरल आकाशगंगा आहे.
हबल सिक्वेन्सनुसार, आकाशगंगाही लंबवर्तुळाकार, सर्पिलाकार आणि लेन्टिक्युलर आकारात आढळते. या आकाशगंगेचा उपयोग बार्ड सारख्या गुंतागुतंची रचना तयार करण्यास होतो. यामुळेच विश्व तयार होण्यासाठी अनेक दशकांचा कालवधी गेला असेल. परंतु सध्याच्या या नव्या आकाशगंगेच्या शोधामुळे या मागचे रहस्य आणखी लवकर उलगडेल. यामुळे हा शोध अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहेत.
दक्षिण-मध्य अमेरिकेला लॅटिन अमेरिका का म्हणतात? नेपोलियनने रचला होता ‘तो’ डाव, जाणून घ्या इतिहास