ॲमेझॉनच्या काळजात काय दडलंय? हजारो वर्षे जगापासून लपलेल्या 'त्या' जमातीचा उलगडा
ॲमेझॉनचे जंगल हे पृथ्वावरील सर्वात गूढ आणि धोकादायक जंगल मानले जाते. मानवी संस्कृतीपासून दूर, आधुनिक जगाच्या स्पर्शाविना अनेक वनस्पती, पशुपक्षी, आदिवासी जमातींचे वास्तव या घनदाट जंगलात पाहायला मिळते. सध्या एक जगापासून हजारो दशकांपासून अलिप्त असलेल्या जमातीचा शोध लागला आहे. पर्यावरण प्रेमी आणि लेखक पॉल रोसोलिए यांनी प्रसिद्ध पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅन यांच्या पॉडकास्टमध्ये एक अत्यंत दुर्मिळ जमाती मारको पिरोचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. पॉल गेल्या दोन दशकांपासून ॲमेझॉनमध्ये संशोधन करत होते. यावेळी त्यांना या मारको पिरो या अलिप्त जमातीच्या लोक पाहायला मिळाले.,
अमेझॉनच्या जंगलातील ‘ते’ रहस्य कुणालाच ठाऊक नाहीत! ऐकाल तर व्हाल आवक्
पॉल यांनी पॉडकास्टमध्ये शेअर केलेल्या व्हिडिओत मारको पिरो जमातीचे लोक नदीकाठी धनुष्य-बाण, भाले आणि आणखी पारंपारिक शस्त्रे घेऊन उभे असल्याचे त्यांना दिसून आले. तसेच त्यांच्या भोवती रंगीबेरंगी उडणारी फुलपाखरेही होती. हे दृश्य एकाच वेळी अद्भुत, मोहक आणि चिंताजनक असे होते. याचा दृश्याचा व्हिडिओ ड्रोन आणि कॅमेराच्या मदतीने टिपला आहे.
पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारको पिरो ही जमाती अत्यंत आक्रमक मानली जाते. ही जमात आपली शस्त्रे खाली ठेवून नदीतील बोटीतून देण्यात आलेले अन्न स्वीकारते. तज्ज्ञांच्या मते, या जमातीचे दिसणे हे अत्यंत दुर्मिळ आहे. पण हा शोध जितका रोमांचक आहे, तितकाच चिंताजनक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
गेल्या काही काळात ही जमात नदीकाठी वारंवार दिसून येत आहे. यामागचे कारण म्हणजे त्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होत चालला आहे. अनेक लाकूड कंपन्यांनी जंगलाची तोड केली आहे, या ठिकाणी 200 किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे रस्ते बांधण्यात आले आहेत. तसेच अमंली पदार्थांची तस्करी देखील या भागांमध्ये वाढली आहे. ज्यामुळे या जमातींच्या अधिवासात घुसखोरी वाढली असून त्यांना त्यांच्या हक्काच्या निवासातून बाहेर यावे लागले आहे.
पण ही जमात बाहेर आल्यास त्यांना सर्वात मोठा धोका आहे. त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क झाल्यास साधा सर्दी-ताप, फ्लूसारखा आजारांमुळे देखील प्राणघातक ठरू शकतात.कारण त्यांची प्रतिकार शक्ती ही मानवी संस्कृतीशी, आधुनिक रोगांशी अनुकूल नसून, जंगलातील परिस्थितीशी अनुकूल आहे. माशको पिरो ही जमात जगातली सर्वा अलिप्त आदिवासी गटांपैकी असून आजही ही जमात शिकार, जंगल आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारित आहे.
20 शतका मानवावरील अत्याचारांपासून बचावासाठी या जमातीने जंगलात लपून राहणे पसंत केले होते. परंतु आज या जमातीचे घर उद्ध्वस्त केले जात असल्याने त्यांना बाहेर पडावे लागत आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींनी सरकारकडे या जमातीसाठी काही क्षेत्र राखील ठेवण्याची मागणी केली आहे. तसेच जंगलतोड थांबवण्याची मागणी केली आहे. या जमातीचे अस्तित्व हे हजारो वर्षांची मानवी संस्कृती जपून ठेवण्यासाठी आहे.






