दक्षिण-मध्य अमेरिकेला लॅटिन अमेरिका का म्हणतात? यामागे दडलंय मोठं रहस्य, जाणून घ्या संपूर्ण इतिहास
सध्या जागतिक राजकाराणात मोठी खळबळ उडाली आहे. कारण दक्षिण अमेरिकेतली देश व्हेनेझुएला आणि अमेरिका यांच्या संघर्ष शिगेला पोहोचला आहे.अमेरिकेने Operation Midnight Hammer अंतर्गत व्हेनेझुएलावर हल्ला केला आणि या देशाच्या राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना कैद केले.यामुळे दक्षिण अमेरिका आणि मध्य अमेरिकेत संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या लॅटिन अमेरिका आणि त्याचा इतिहास पुन्हा चर्चेत आला आहे. दक्षिण अमेरिकेतील आणि मध्य अमेरिकेतील काही देशांना लॅटिन का म्हणतात, याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. तर यामागचे एक मोठं रहस्य दडलेलं आहे. याचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत.
Donald Trump Tariffs : टॅरिफ करतोय जगावर राज? डोनाल्ड ट्रम्पची 500 टक्क्यांचा दबाव
तुम्ही जगाच्या नकाशावर नजर टाकली तर तुम्हाला उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका असे दोन खंड दिसतील. परंतु यातील काही देशांचा लॅटिन अमेरिका असा एकत्रितपणे उल्लेख केला जातो.या देशांना हे विशिष्ट नाव पडण्यामागे एक मोठा इतिहास आहे. पण त्यापूर्वी आपण लॅटिन शब्दाचा नेमका अर्थ काय आहे जाणून घेऊयात.
तर लॅटिन शब्दाचा संबंध हा प्राचीन लॅटिन भाषेशी आहे. युरोपच्या रोम साम्राज्यात ही भाषा बोलली जात होती. परंतु काही काळाने १५ व्या शतकाच्या आसपास या भाषेतून फ्रेंच, स्पॅनिश, पोर्तुगीज, इटालियन, रोमानियन यांसारख्या भाषांची निर्मिती झाली होती.या भाषांना एकत्रितपणे रोमान्स लँग्वेजेस म्हटले जाते.
शिवाय याच काळात १५ व्या आणि १६ व्या शतकात अमेरिकन खंडावर आपले प्रभुत्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली होती. यावेळी दक्षिण आणि मध्य अमेरिकेत स्पेन, पोर्तुगाल या देशांनी वसाहती स्थापन केल्या. या देशांच्या स्पॅनिश आणि पोर्तुगीज या भाषांमधूनच लॅटिन भाषेचा उमग झाला. येथून लॅटिन हा शब्द प्रचलित झाला.
आता दक्षिण अमेरिका देशांना लॅटिन का म्हटले जाते, हे जाणून घेऊयात? या यामागे फ्रेंच सम्राट नेपोलियन तिसरा यांचा मोठा हात आहे. १९ व्या शतकामध्ये फ्रेंच निपोलियन तिसरा याला या प्रदेशांमध्ये आपला प्रभाव वाढवायचा होता. यावेळी स्पॅनिश आणि पोर्तुगीजांप्रमाणेच फ्रेंच भाषाही लॅटिन भाषेवर आधारित होती. यामुळे सम्राट नेपोलियन तिसाऱ्याने पोर्तुगीज, स्पॅनिश या देशांशी सांस्कृतिक संबंध जोडण्यासाठी लॅटिन अमेरिका म्हणून संबोधले तेव्हापासूनच दक्षिण अमेरिका आणि मध्य अमेरिकेतील काही देशांना लॅटिन अमेरिका म्हटले जाऊ लागले.
दक्षिण अमेरिकेतील ब्राझील, अर्जेंटिना, चिली, कोलंबिया, तर मध्य अमेरिकेतील ग्वाटेमाला, होंडुरास, पनामा या देशांना लॅटिन अमेरिका म्हणून ओळखले जाते. तसेच उत्तर अमेरिकेतील मेक्सिकोला, आणि कॅरिबियने बेटे क्युबा, डॉमिनिकन रिपब्लिक यांनीही लॅटिन अमेरिका म्हणून ओळखतात.
डोनाल्ड ट्रम्पचा अहंकार येतो नेहमी आडवा; अमेरिकेनेही वाचावा भारताच्या कुटनीतीचा पाढा






