Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Swarnagiri Venkateswara Temple : देव भेटतो तिथे!’असा’ अलौकिक चमत्कारातून झाला जन्म पृथ्वीवरील स्वर्ग असलेल्या स्वर्णगिरी मंदिराचा

Swarnagiri Venkateswara Temple : स्वर्णगिरी वेंकटेश्वर स्वामी मंदिर, ज्याला यदाद्री तिरुमला देवस्थानम म्हणूनही ओळखले जाते, हे हैदराबादपासून सुमारे 47 किमी अंतरावर भुवनगिरी येथील मानेपल्ली टेकड्यांवर आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 23, 2025 | 08:37 AM
Swarnagiri Venkateswara Temple The Modern Tirumala

Swarnagiri Venkateswara Temple The Modern Tirumala

Follow Us
Close
Follow Us:
  • हैदराबादपासून फक्त ४७ किमीवर बांधलेले भव्य स्वर्णगिरी वेंकटेश्वर मंदिर, आर्किटेक्चर, भव्य मूर्ती आणि आध्यात्मिक अनुभवासाठी प्रसिद्ध.
  • मंदिरामागे एका चमत्कारिक उपचाराची सत्यकथा, ज्यामुळे हे मंदिर बांधण्याचा निर्णय झाला.
  • मंदिरात १२ फूट उंच मूर्ती, ४० फूट एकाश्म हनुमान प्रतिमा आणि १.५ टनाची घंटा हे प्रमुख आकर्षण.

Swarnagiri Venkateswara Temple : हैदराबादजवळील(Hyderabad) भुवनगिरी येथे उभे असलेले स्वर्णगिरी वेंकटेश्वर स्वामी मंदिर (Swarnagiri Venkateswara Swamy Temple) म्हणजे केवळ एक देवस्थान नाही, तर आधुनिक भारतातील स्थापत्यकलेचा प्रतीकात्मक चमत्कार आहे. याला यदाद्री तिरुमला देवस्थानम म्हणूनही ओळखले जाते. २२ एकरांवर पसरलेले हे देवस्थान पाहताच पहिली भावना एकच “हे मंदिर जणू स्वर्गातून पृथ्वीवर उतरले आहे!”

मंदिराची रचना : प्राचीन साम्राज्यांचा जिवंत वारसा

मंदिराचे सौंदर्य दूरूनच डोळे खिळवते. चोल, पल्लव, चालुक्य आणि विजयनगर स्थापत्यशैलीचे मिश्रण या मंदिराला अत्यंत अद्वितीय ओळख देतात. मंदिराच्या चारही बाजूंना भव्य राजगोपुरम असून आत जाताच विशाल मंडप, आकर्षक कोरीवकाम आणि दिव्य वातावरण हा अनुभव अविस्मरणीय बनवतो. गर्भगृहातील भगवान वेंकटेश्वराची १२ फूट उंच भव्य प्रतिमा ही तेलंगणातील सर्वात मोठी मानली जाते. त्याच्यावर उभारलेले पाच मजली विमान गोपुरम हा या जागेचा आध्यात्मिक मुकुटच जणू.

हे देखील वाचा : Shrinathji Temple : राजस्थानातील नाथद्वारातील श्रीनाथजी मंदिराचा इतिहास अत्यंत प्राचीन; जाणून घ्या यामागील रंजक लोककथा

चमत्कारातून मंदिराचा जन्म

या मंदिरामागील सर्वात भावनिक घटना म्हणजे याचे संस्थापक उद्योगपती मानेपल्ली रामा राव आणि त्यांच्या पत्नी विजयलक्ष्मी यांच्या आयुष्यात घडलेला वैद्यकीय चमत्कार. गंभीर अपघातानंतर त्यांच्या पत्नी कोमात गेल्या होत्या आणि डॉक्टरांनी आशा सोडली होती. मात्र तिरुपतीहून आलेल्या पवित्र जलानंतर त्यांची प्रकृती चमत्कारिकरीत्या सुधारली. या अनुभवानंतर कृतज्ञतेने त्यांनी स्वतःच्या भूमीवर भव्य मंदिर उभारण्याचा संकल्प केला  आणि सात वर्षांत स्वर्णगिरी मंदिराची उभारणी पूर्ण झाली.

video credit : social media and @karbharibhau

मंदिरातील प्रमुख आकर्षण

  • ४० फूट उंच एकाश्म हनुमान मूर्ती : भारतातील दुर्मीळ शिल्पकलेचे उदाहरण
  • १.५ टनाची कांस्य घंटा : दिव्य नाद वातावरण भारावून टाकतो
  • जल नारायण सन्निधी : पाण्याने भरलेल्या गर्भगृहाचे प्रकाशित दर्शन मंत्रमुग्ध करते

हे देखील वाचा : देवालाही थंडी वाजते….पुण्यातील या मंदिरात हिवाळ्यात गणपतीला घातले जातात कपडे, गोंडस रूप पाहूनच मन मोहित होईल

दर्शन आणि आरती वेळा

प्रकार वेळ
मंदिर उघडण्याची वेळ सकाळी ५:००
अभिषेक व भूपाली ५:०० ते ६:३०
दुपार विश्रांती १२:३० ते १:३०
महाप्रसाद व नैवेद्य १:३० ते २:३०
शेजारती रात्री ९:००

तिथे कसे पोहोचाल?

  • विमानाने: जवळचे विमानतळ : हैदराबाद (७६ किमी)
  • रेल्वेने: भोंगीर जंक्शन सर्वात जवळचे
  • रस्त्याने: हैदराबादहून सरळ बस किंवा खाजगी वाहन

 भेट देण्याचा सर्वोत्तम काळ

पावसाळा व हिवाळा कारण पावसाळ्यात हिरवीगार टेकडी मंदिराभोवती स्वर्गीय दृश्य निर्माण करते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्वर्णगिरी मंदिर कुठे आहे?

    Ans: हे मंदिर भुवनगिरी, तेलंगणा येथे आहे, हैदराबादपासून ४७ किमीवर.

  • Que: दर्शनासाठी तिकीट आवश्यक आहे का?

    Ans: सामान्य दर्शन मोफत आहे, परंतु विशेष दर्शनासाठी तिकिटे उपलब्ध.

  • Que: मंदिर कधी भेट द्यावे?

    Ans: पावसाळा आणि हिवाळा हा सर्वोत्तम काळ.

Web Title: Swarnagiri venkateswara temple the modern tirumala

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 08:37 AM

Topics:  

  • Lord Vishnu
  • navarashtra special story
  • temple

संबंधित बातम्या

Earth Orbit Day 2026: पृथ्वीला इतकी घाई कशाची? दिवसाचे 24 तास आता अपुरे; शास्त्रज्ञांनी दिला ‘निगेटिव्ह लीप सेकंद’चा इशारा
1

Earth Orbit Day 2026: पृथ्वीला इतकी घाई कशाची? दिवसाचे 24 तास आता अपुरे; शास्त्रज्ञांनी दिला ‘निगेटिव्ह लीप सेकंद’चा इशारा

जगातील सर्वात रहस्यमय मंदिर : पद्मनाभस्वामी मंदिराच्या न उघडलेल्या सातव्या दरवाजाचे रहस्य काय? 
2

जगातील सर्वात रहस्यमय मंदिर : पद्मनाभस्वामी मंदिराच्या न उघडलेल्या सातव्या दरवाजाचे रहस्य काय? 

Old Rock Day 2026: खडक नाही, तर पृथ्वीचा जिवंत इतिहास! 7 जानेवारी ‘ओल्ड रॉक डे’ निमित्त उलगडलं 4 अब्ज वर्षे जुन्या खडकांचं रहस्य
3

Old Rock Day 2026: खडक नाही, तर पृथ्वीचा जिवंत इतिहास! 7 जानेवारी ‘ओल्ड रॉक डे’ निमित्त उलगडलं 4 अब्ज वर्षे जुन्या खडकांचं रहस्य

व्हेनेझुएलावर हल्ला, Maduro अटकेचा भारत-अमेरिकेच्या संबंधांवर परिणाम; काय म्हणाले डॉ. शैलेंद्र देवळाणकर?
4

व्हेनेझुएलावर हल्ला, Maduro अटकेचा भारत-अमेरिकेच्या संबंधांवर परिणाम; काय म्हणाले डॉ. शैलेंद्र देवळाणकर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.