Shrinathji Temple : राजस्थानातील नाथद्वारातील श्रीनाथजी मंदिराचा इतिहास अत्यंत प्राचीन; जाणून घ्या यामागील रंजक लोककथा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Nathdwara Shrinathji Temple : राजस्थान (Rajasthan) म्हणजे किल्ले, राजघराणे आणि इतिहासाची परंपरा पण या भूमीत एक असे स्थान आहे जिथे केवळ दगडी रचना नसून श्रद्धेचा जिवंत श्वास आहे नाथद्वारातील श्रीनाथजी मंदिर(Shrinathji Temple). राजसमंद जिल्ह्यात वसलेले हे मंदिर भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाला समर्पित आहे, जिथे ते प्रेमाने आणि आदराने ‘श्रीनाथजी’ म्हणून पूजले जातात. दरवर्षी लाखो श्रद्धाळू येथे दर्शनासाठी येतात आणि भक्तीभावाने नतमस्तक होतात.
या मंदिराचा इतिहास केवळ धार्मिक नाही तर सांस्कृतिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा आहे. श्रद्धेनुसार, श्रीनाथजींची मूर्ती मूळतः वृंदावनातील गोवर्धन पर्वतावर प्रकट झाली होती. नंतर औरंगजेबाच्या कारकिर्दीत हिंदू मंदिरांवर होणाऱ्या अत्याचारांपासून बचाव करण्यासाठी मूर्ती गुप्तपणे वृंदावनातून राजस्थानात आणली गेली. प्रवासादरम्यान एक अद्भुत घटना घडली नाथद्वाराजवळील सिंगार गावात श्रीनाथजींच्या रथाचे चाक अचानक थांबले आणि हलवूनही पुढे गेले नाही. हे दैवी संकेत मानून येथेच मंदिर बांधले गेले. आजही स्थानिक लोक आणि पुरोहित या घटनेला दिव्य आज्ञा म्हणतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Regional Conflict : दक्षिण आशियात युद्धाची चाहूल, काबूल होणार रणांगण; पाकिस्तानचा ‘या’ मुस्लिम देशांना अंतिम संदेश
नाथद्वारातील सर्वात प्रसिद्ध परंपरा म्हणजे छप्पन भोग. पुराणकथेनुसार, कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून सात दिवस इंद्राच्या कोपापासून गावकऱ्यांचे संरक्षण केले. सात दिवस उपाशी राहिलेल्या कृष्णासाठी यशोदामाईने ५६ पदार्थ बनवले. हाच वारसा आजही मंदिरात प्रेम आणि भक्तीने साजरा केला जातो. जनमाष्टमी, नंद महोत्सव आणि अन्नकूट येथे अत्यंत भव्य पद्धतीने साजरे केले जातात.
नाथद्वारात अनेक धर्मशाळा, लॉज आणि आधुनिक हॉटेल्स आहेत. बजेटनुसार ₹४० ते ₹४०० पर्यंत धर्मशाळेत तर प्रीमियम हॉटेल्सही उपलब्ध आहेत. मंदिर व्यवस्थापनाकडून ऑनलाईन बुकिंगची सुविधाही दिली जाते. येथे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते मार्च असा मानला जातो, कारण या काळात हवामान आनंददायी आणि पर्यटनास अनुकूल असते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Gaza Tunnel : शब्दांत न सांगता येणारी युद्धरचना! इस्रायलला गाझामध्ये सापडला रहस्यमय बोगदा, VIDEO VIRAL
नाथद्वारातील श्रीनाथजी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर इतिहास, आध्यात्म आणि परंपरांचा जिवंत वारसा आहे. श्रीकृष्णाच्या बालरूपातील निरागसता आणि श्रद्धेची ताकद येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनाला स्पर्श करते.
Ans: येथे कृष्णाचे बालरूप विराजमान आहे आणि छप्पन भोग परंपरा प्रसिद्ध आहे.
Ans: ऑक्टोबर ते मार्च हा काळ उत्तम मानला जातो.
Ans: राजस्थानातील नाथद्वारा, राजसमंद जिल्ह्यात.






