Navarashtra Woman Awards
पंढरपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महिला जिल्हा अध्यक्ष पदाच्या कारकीर्दीत विकास कामाच्या जोरावर जिल्ह्यातील महिलांना न्याय मिळवून देणाऱ्या आणि महिलांना ओळख मिळवून देणाऱ्या वाखरी गावच्या वर्षाराणी रमेश शिंदे यांना दैनिक नवभारत नवराष्ट्रच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श समाज सेविका पुरस्कार मिळाला आहे. वर्षाराणी शिंदे यांनी महिला अध्यक्षपदाच्या माध्यमातून सन २०२० ते २०२५ पर्यंत केलेल्या कामाचा गौरव म्हणून हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे.
पुणे येथे शनिवारी २६ एप्रिल रोजी दैनिक नवभारत नवराष्ट्र पुरस्कार २०२५ या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण सुनंदा पवार व सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वर्षांराणी रमेश शिंदे यांच्यासह त्यांचे पती उद्योजक रमेश शिंदे व कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
महिलां अध्यक्ष वर्षांराणी रमेश शिंदे यांनी अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये जिल्ह्यातील महिलांना संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रकाश झोतात आणले. अगदी कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी केलेल्या भरीव अशा कामामुळे संपूर्ण पंढरपूर तालुक्यात प्रसिद्धी मिळवली होती. यासोबतच सातत्याने पाठपुरावा करत महिलांसाठी कोट्यावधी रुपयांची विकास कामे, यासारखी अनेक कामे त्यांनी आपल्या कालावधीत मंजूर करून आणली. त्यांनी राजकीय क्षेत्रात आपली छाप सोडली आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरांमधून त्यांचे कौतुक होत आहे.