जगभरात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन का साजरा केला जातो?
जगभरात सगळीकडे २९ जुलैला आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो. हा दिवस नैसर्गिक समतोल राखण्यासाठी आणि वाघांच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी प्रामुख्याने साजरा करतात.जगभरात सगळीकडे वेगवेगळ्या रंगांचे आणि जातीचे वाघ पाहायला मिळतात. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. मात्र बऱ्याचदा अनेकांना वाघ, बिबट्या आणि चित्ता यांच्यातील फरकच समजून येत नाही. जगभरात हल्ली जंगलांची संख्या कमी झाल्यामुळे अनेक वन्य प्राणी मानवी वस्तींमध्ये किंवा रस्त्यावर फिरताना दिसून येतात. तसेच वाघांच्या संख्येत घट झाल्यामुळे यंदाच्या वर्षी वाघांच्या संरक्षणाच्या दृष्टीने ‘चला वाघ वाचवू’ ही संकल्पना राबवण्यात आली आहे. जगभरात सगळीकडे असणारे वाघांचे अस्तित्व कायम टिकवून ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. चला तर जाणून घेऊया आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन का साजरा केला जातो?याबद्दल सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
ब्रिटीशाविरोधांत राजकीय खेळी करणाऱ्या नेत्यांनी केली कॉंग्रेसची स्थापना; जाणून घ्या 28 जुलैचा इतिहास
रशियामधील सेंट पीटर्सबर्ग शहरात २०१० मध्ये जागतिक व्याघ्र परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर परिषदेमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार २९ जुलैला जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. परिषदेमध्ये भारताने आपल्या देशात वाघांची संख्या दुपट्ट करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निश्चित करण्यात आले होते.त्यानंतर भारताने देण्यात आलेल्या वेळेच्या आधीच अपेक्षित उद्दिष्ट पूर्ण केली, अशी माहिती राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य आणि वन्यजीव अभ्यासक यादव तरटे यांनी दिली आहे.
जगभरात चार हजारांच्या आसपास वाघांची संख्या आहे. त्यातील ७५ टक्के वाघ भारतामध्ये आहेत. भारतमध्ये एकूण ५८ व्याघ्र प्रकल्पांमध्ये एकूण २ हजार ९६५ वाघ आहेत. त्यातील सहा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात असून त्यांच्यामध्ये ४०० हून अधिक वाघांची संख्या आहे. सर्वाधिक वाघाची संख्या ताडोबाच्या जंगलात आहे. अमरावती जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ५५ ते ६० इतके वाघ आहेत. भारतानंतर रशिया, इंडोनेशिया, नेपाळ, थायलंड, मलेशिया, भूतान, बांगलादेश आणि चीन इत्यादी देशांमध्ये सुद्धा वाघ अस्तित्वात असल्याचे सांगण्यात आले आहे.
Dinvishesh : देशाचे सुरक्षा कवच असलेल्या CRPF झाले स्थापन; जाणून घ्या 27 जुलैचा इतिहास