National DNA Day 2025: दरवर्षी २५ एप्रिलला जगभर राष्ट्रीय डीएनए दिवस साजरा केला जातो. विद्यार्थी, शिक्षक, संशोधक आणि सामान्य लोकांना हा दिवस अनुवंशशास्त्र क्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीवर चिंतन करण्यासाठी एकत्र आणतो.
राष्ट्रीय डीएनए दिवसाचे महत्व काय आहे?
राष्ट्रीय डीएनए दिवशी अनुवंशशास्त्र आणि जीनोमिक्समध्ये मिळालेल्या कामगिरीचा उत्सव साजरा केला जातो. सध्या वैद्यकीयशास्त्रात झालेल्या प्रगतीमुळे डीएनएमधून मानवी शरीराचे आरोग्य, रोग आजार सोबतच यावरचे उपाय शोधण्यास शक्य होते. एखाद्या व्यक्तीच्या जीनोमचे अनुक्रमण करण्याची क्षमता असल्याने, डॉक्टर आता कर्करोग, हृदयरोग आणि अनुवांशिक विकारांसह विशिष्ट आजारांच्या जोखमीचा अंदाज लावू शकतात.
२५ एप्रिलला राष्ट्रीय डीएनए दिवस का साजरा केला जातो?
या दिवशी २००३ मध्ये मानव म्हणून आपण कोण आहोत हे परिभाषित करणाऱ्या जीन्सचा संपूर्ण संच करत मानवी जिनोम प्रकल्प राष्ट्रीय मानवी जीनोम संशोधन संस्थेने यशस्वीरित्या पूर्ण केला. यामुळे २००३ पासून राष्ट्रीय डीएनए दिन साजरा केला जातो. परंतु या आधीही डीएनए बाबत १९५३ साली जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक यांनी एक अभूतपूर्व शोध लावला. त्यांनी डीएनएची रचना दुहेरी हेलिक्स म्हणून ओळखली. हा शोध अनुवांशिक माहिती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कशी जाते हे समजून घेण्यासाठी महत्त्वाचा होता.
राष्ट्रीय डीएनए दिवशी काय केले जाते?
विद्यार्थी, शिक्षक आणि जनतेला अनुवंशशास्त्र आणि जीनोमिक्सबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. नवीन झालेल्या संशोधनबद्दल चर्चा करण्यात येते. डीएनए आणि त्याच्या शोधाबद्दल पुस्तके वाचली जातात. सोशल मीडियावर #NationalDNAday वापरून विद्यार्थी डॉक्टर संशोधक आपले विचार व्यक्त करतात.
कर्करोगावर मात करण्यासाठीची गुरुकिल्ली तुमच्या डीएनएमध्ये तर दडलेली नाही ना?
मानवी आरोग्य समजण्यास डीएनएची भूमिका डीएनएमुळे मानवी आरोग्य समजण्यास मदत होते. याचा अनुवंशिक आजार, रोग प्रतिबंधकतेसाठी अनुवांशिक चाचणी, जीन थेरपी आणि उपचार, कर्करोगाचे जीनोमिक्स,वैयक्तिकृत औषधोपचार या सर्व घटकांमध्ये उपयोग होतो. डीएनए मानवी जीवनाची रचना करतो. जो मानवी शरीराला आकार देतो त्या घटका बद्दल माहित असणे आवश्यक आहे.
२५ एप्रिल दिवशी जागतिक मलेरिया दिवसही साजरा केला जातो. जागतिक मलेरिया दिनाची स्थापना मे २००७ मध्ये जागतिक आरोग्य सभेने राष्ट्रीय मलेरिया नियंत्रण धोरणांना शिक्षित करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी केली. या दिवसाचा उद्देश मलेरिया नियंत्रण आणि प्रतिबंध बाबतीत जगारूकता व्हावी हे आहे. हा दिवस देशांना मलेरिया नियंत्रणासाठी निधी वाढवण्यास प्रोत्साहित करतो.आरोग्य संस्थांना औषधे आणि साधनांची उपलब्धता सुधारण्याची आठवण करून देतो. समुदायांना जागरूकता प्रतिबंधात्मक प्रयत्नांमध्ये सहभागी होण्यास प्रेरित करतो. रोगाशी लढण्यासाठी कठीण परिस्थितीत काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करतो. लस, नवीन औषधे आणि चांगले निदान यासारख्या नवकल्पनांना प्रोत्साहन देतो.