Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

…म्हणून टीम इंडिया नेहमी ब्ल्यू जर्सीमध्ये खेळताना दिसते, ‘जाणून घ्या या ब्ल्यू रंगामागची कहाणी’

म्हणून टीम इंडिया नेहमी निळ्या जर्सीमध्ये खेळताना दिसते! जाणून घ्या या रंगामागची कहाणी:-

  • By Dilip Bane
Updated On: Nov 03, 2025 | 05:35 PM
Indian cricket Jersey, cricket jersey

Indian cricket Jersey, cricket jersey

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय क्रिकेट संघाची निळी जर्सी म्हणजे आज फक्त एक ओळख नाही, तर ती भारतीय चाहत्यांसाठी एक भावना आहे. “मेन इन ब्ल्यू” म्हणून ओळखले जाणारे हे खेळाडू जेव्हा मैदानात उतरतात, तेव्हा संपूर्ण देश त्यांच्यासोबत उभा राहतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का ?… नेमकं हा निळा रंगच का?

ही कहाणी आहे 1980 च्या दशकातील. त्या काळी वनडे क्रिकेट अजून नवीन होतं आणि सर्व संघ पांढऱ्या कपड्यांमध्येच खेळायचे. पण 1980 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या Benson & Hedges World Series Cup मध्ये पहिल्यांदाच रंगीत कपडे, पांढऱ्या चेंडू आणि काळे sight screen वापरण्याचा प्रयोग झाला. या तिन्ही गोष्टींनी क्रिकेटचा चेहरामोहरा कायमचा बदलला.

चॅम्पियन संघ…चॅम्पियन खेळाडूंनी खास अंदाजात घालवली रात्र!

त्या काळात कोणत्याही संघाचे अधिकृत किट स्पॉन्सर नव्हते. त्यामुळे आयोजक म्हणजे ऑस्ट्रेलियालाच सर्व संघांना कपडे पुरवावे लागत होते. ऑस्ट्रेलियाने आपला पारंपरिक पिवळा रंग निवडला. न्यूझीलंडला क्रीम आणि चॉकलेटी रंगाचे कपडे दिले गेले. आणि भारतासाठी निवड झाली लाईट ब्लू आणि पिवळ्या रंगाच्या कॉम्बिनेशनची. हा रंग ना बीसीसीआयने निवडला होता, ना खेळाडूंनी. तो केवळ आयोजकांनी ठरवला होता.

मात्र जेव्हा भारतीय खेळाडू या निळ्या कपड्यांमध्ये मैदानावर उतरले, तेव्हा तो रंग इतका उठून दिसला की पुढे भारताने तोच रंग आपली ओळख म्हणून कायम ठेवला. 1980 नंतर टीम इंडियाची जर्सी वेळोवेळी बदलत गेली.1992 च्या वर्ल्डकपमध्ये गडद नेव्ही ब्ल्यू, 1996 मध्ये तिरंगी पट्ट्यांसह डिझाईन, 2003 मध्ये हलका आकाशी रंग, तर 2011 च्या वर्ल्डकपमध्ये तेजस्वी इलेक्ट्रिक ब्लू रंग दिसला.

आजही प्रत्येक वर्ल्डकपमध्ये किंवा द्विपक्षीय मालिकेत बीसीसीआय आणि किंवा सध्याचे स्पॉन्सर नवीन डिझाईन सादर करतात, पण रंग मात्र बदलत नाही, निळाच!
काहीजण म्हणतात हा रंग अशोक चक्र आणि बीसीसीआयच्या लोगोतील निळ्या रंगावरून प्रेरित आहे. निळा रंग शांततेचं, स्थिरतेचं आणि विश्वासाचं प्रतीक मानला जातो. म्हणूनच तो भारतीय क्रिकेटच्या आत्म्याशी जुळतो.

महिला विश्वचषक विजेत्या भारतीय संघासाठी BCCI ने उघडली तिजोरी

1990 च्या दशकात जेव्हा सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे सारखे दिग्गज खेळाडू चमकू लागले, तेव्हा “Men in Blue” ही संज्ञा लोकप्रिय झाली. ती केवळ जर्सीची नाही, तर एका पिढीच्या भावना व्यक्त करणारी ओळख बनली.
आज जेव्हा टीम इंडिया मैदानात निळ्या जर्सीत उतरते, तेव्हा ती जर्सी फक्त एक कपडा नसते, ती 40 वर्षांची परंपरा, अभिमान आणि असंख्य विजयांची साक्ष असते.

Web Title: Why team india always wears blue the story behind the iconic jersey

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 05:34 PM

Topics:  

  • bcci
  • Indian Cricketer
  • indian team

संबंधित बातम्या

Team India Victory Parade : भारतीय महिला संघ मुंबईत साजरा करणार का विक्ट्री परेड? BCCI सचिवांनी योजना झाली उघड
1

Team India Victory Parade : भारतीय महिला संघ मुंबईत साजरा करणार का विक्ट्री परेड? BCCI सचिवांनी योजना झाली उघड

भारताचे ट्रम्प कार्ड झालं यशस्वी! भारतीय संघाचा काॅल आला आणि भाग्य उघडलं, वाचा शेफाली वर्माची खास कहाणी
2

भारताचे ट्रम्प कार्ड झालं यशस्वी! भारतीय संघाचा काॅल आला आणि भाग्य उघडलं, वाचा शेफाली वर्माची खास कहाणी

IND W vs SA W Final Match Live :गंभीर आणि सूर्याकडून भारतीय महिला संघावर शुभेच्छांचा वर्षाव; दिला खास मंत्र; पाहा Video
3

IND W vs SA W Final Match Live :गंभीर आणि सूर्याकडून भारतीय महिला संघावर शुभेच्छांचा वर्षाव; दिला खास मंत्र; पाहा Video

IND W vs SA W: महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीला बॉलिवूडची फोडणी! मैदानात ‘या’ गायिकेचा घुमणार आवाज 
4

IND W vs SA W: महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीला बॉलिवूडची फोडणी! मैदानात ‘या’ गायिकेचा घुमणार आवाज 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.