भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला अंतिम सामन्यामध्ये पराभूत करुन ट्राॅफी नावावर केली आहे. त्यानंतर भारतामध्ये त्याचबरोबर खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. संपूर्ण देश सध्या जल्लोष साजरा करत आहे आता ट्राॅफी जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी खास अंदाजात शेअर केले काही खास फोटो.
भारताच्या संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर जल्लोषात साजरा केला आनंद. फोटो सौजन्य - इंस्टाग्राम

भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने सोशल मिडियावर फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती टीम इंडियाने जिंकलेली ट्राॅफीला मिठी मारुन झोपलेली दिसत आहे, एवढेच नव्हे तर तीने घातलेल्या टी-शर्टवर लिहीले आहे की ‘Cricket is a everyone's game’. फोटो सौजन्य - इंस्टाग्राम

भारताची उपकर्णधार स्मृती मानधना हीने तिच्या इंस्टाग्राम एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये जेमिमा रोड्रिग्ज आणि स्मृती दोघीही ट्राॅफीला मिठी मारताना दिसत आहेत. यामध्ये तिने लिहीले आहे की शुभ प्रभात जग. जेमिमा रोड्रिग्ज आणि स्मृती या दोघीनीही या स्पर्धेमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. फोटो सौजन्य - इंस्टाग्राम

भारतीय संघातील बेस्ट फिल्डर आणि गोलंदाज राधा यादवने तिच्या सोशल मिडियावर फोटो शेअर केला आहे, यामध्ये तिने लिहीले आहे की, एखाद्या गोष्टीला मनापासून मागितले तर संपूर्ण विश्व त्याच्यासाठी लढत असतं, हा फोटो सध्या सोशल मिडियावर फार व्हायरल होत आहे. फोटो सौजन्य - इंस्टाग्राम

रमनप्रीत कौरने स्टेजवर जाताना भांगडा सादर करून आपला आनंद व्यक्त केला. तिने जय शाहपर्यंत नाच केला. तिने त्यांचे पाय स्पर्श करण्याचा प्रयत्नही केला, पण त्यांना तेथून दूर करण्यात आले. ३६ वर्षे आणि २३९ दिवसांच्या वयात, हरमनप्रीत कौर ही महिला विश्वचषक जिंकणारी सर्वात वयस्कर कर्णधार आहे.

स्मृती मानधना, अरुधती रेड्डी, राधा यादव आणि जेमिमा रोड्रिग्ज यांनी एक पोस्ट सोशल मिडियावर केली आहे. यामध्ये त्या तिघीही ट्राॅफीला मिठी मारताना दिसत आहेत. याचा हा फोटो सध्या सोशल मिडीयवर व्हायरल होत आहे. फोटो सौजन्य - इंस्टाग्राम

हरमनप्रीत कौर ही क्रिकेट विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला कर्णधार ठरली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विश्वचषक जिंकणारी ती चौथी भारतीय आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. फोटो सौजन्य - इंस्टाग्राम






