World Paper Bag Day 2025 Say Goodbye to plastic use paper bags consciously in these 11 unique ways
World Paper Bag Day 2025 : दरवर्षी १२ जुलै रोजी ‘जागतिक कागद पिशवी दिन’ (World Paper Bag Day) साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश आहे प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक पर्याय निवडण्याची सशक्त जाणीव निर्माण करणे. प्लास्टिकने पर्यावरणाला दिलेली हानी आता सर्वांनाच ठाऊक झाली आहे, आणि अशा वेळी कागदी बॅग्जचा वापर ही काळाची गरज बनली आहे.
प्लास्टिकपेक्षा कागदी पिशव्या केवळ सुरक्षितच नाहीत, तर त्या जमिनीतही सहज विरघळतात. या बॅग्ज पर्यावरणासाठी हानिकारक नसतात, कारण त्या जैविकदृष्ट्या विघटनशील (biodegradable) असतात. त्यामुळे कागदाच्या पिशव्या वापरणे ही एक जबाबदारीने भरलेली निवड ठरते.
इतिहास थोडक्यात
सन १८५२ मध्ये फ्रान्सिस वूली यांनी प्रथम कागदाच्या पिशव्या बनवणारे यंत्र शोधले. पुढे १८७० मध्ये मार्गारेट एलोइस नाइट यांनी फ्लॅट बॉटम असलेल्या पिशव्या डिझाइन केल्या आणि त्यांना ‘आई ऑफ द ग्रॉसरी बॅग’ असेही म्हणण्यात आले.
सध्याची गरज आणि वापर:
आज अनेक नामांकित ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स जसे ब्लिंकिट, मायन्ट्रा, झेप्टो प्लास्टिकऐवजी कागदी बॅग्जचा वापर करत आहेत. यामुळे घराघरांत पेपर बॅग्जचा ढीग जमा झालेला दिसतो. पण या बॅग्ज तुम्ही केवळ फेकून देण्याऐवजी उपयुक्त कामांसाठी वापरू शकता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : संयुक्त राष्ट्रांचा मोठा निर्णय! वाळू व धूळ वादळांशी लढण्यासाठी 2025-2034 हे दशक घोषित
‘या’ ११ स्मार्ट आणि पर्यावरणपूरक आयडिया घरातल्या पेपर बॅग्जचा वापर कसा कराल?
गिफ्ट रॅपर म्हणून वापर:
सुंदर डिझाइन असलेल्या कागदी बॅग्ज गिफ्ट रॅपिंगसाठी वापरा. एक वेगळाच आणि इको-फ्रेंडली टच मिळेल.
कांदे-लसूण स्टोरेज:
स्वयंपाकघरात कांदे, लसूण, आलं ठेवण्यासाठी या बॅग्ज वापरा. हवेचा प्रवाहही चांगला राहतो.
लहान गिफ्ट बॅग्ज बनवा:
फाटलेल्या किंवा आकारहीन बॅग्जपासून DIY गिफ्ट बॅग्ज तयार करा.
ड्रॉवर/कपाटात वापरा:
मसाले ठेवण्यासाठी ड्रॉवरमध्ये पेपर बॅग पसरवा. वर्तमानपत्रांपेक्षा स्वच्छ आणि बिनकटकटीचा उपाय.
डस्टबिनमध्ये वापरा:
कोरड्या कचऱ्यासाठी डस्टबिनच्या तळाशी पेपर बॅग ठेवा. सहज डिस्पोज करता येते.
कंपोस्टिंगसाठी वापर:
कागदी बॅग्जचे लहान तुकडे करून गार्डनमधील कंपोस्टमध्ये टाका.
पुस्तकांचे कव्हर:
पेपर बॅग कट करून पुस्तकांना कव्हर करा. पानं खराब होणार नाहीत.
आर्ट अँड क्राफ्ट:
डिझाइन असलेल्या बॅग्जपासून DIY डेकोर, फ्रेमिंग, किंवा जर्नलिंग करा.
कागदी दागिने व खेळणी:
ओरिगामी, फुलं, खेळणी आणि साधे दागिने तयार करा. मुलांसाठी क्रिएटिव्ह अॅक्टिविटी.
ऑफिसमध्ये टिफिनसाठी:
मजबूत कागदी बॅग्ज ऑफिसला जेवण नेण्यासाठी वापरू शकता.
मुलांसाठी रंगकामाचा कॅनव्हास:
जुन्या बॅग्जच्या मागे मुले रंगवू शकतात. हे त्यांच्या सर्जनशीलतेला चालना देते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : म्यानमारच्या युद्धाचा जागतिक परिणाम; चीनच्या धमकीने पृथ्वीच्या आतील दुर्मिळ खजिन्यावर गडद सावट
संकल्प करूया: पर्यावरण बचावासाठी छोटा बदल मोठा परिणाम!
प्लास्टिकला दूर ठेऊन आपण जर कागदी पिशव्यांचा सजग वापर सुरू केला, तर नक्कीच पृथ्वी थोडीशी तरी सुखावेल. पेपर बॅग्ज फक्त ‘शॉपिंगसाठी’ नसतात, तर त्या जगण्याच्या शैलीचा एक भागही बनू शकतात. या ‘वर्ल्ड पेपर बॅग डे’ च्या निमित्ताने एक पाऊल पुढे टाका जुन्या बॅग्ज पुन्हा वापरा, इतरांनाही प्रेरणा द्या, आणि पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारा.