World Radio Day A timeless medium offering talent fame and fortune even today
नवी दिल्ली : एक काळ असा होता जेव्हा टीव्ही आणि स्मार्टफोनसारखी उपकरणे अस्तित्वात नव्हती. त्यावेळी रेडिओ हेच मनोरंजनाचे आणि माहिती देण्याचे सर्वांत प्रभावी माध्यम होते. आज डिजिटल युगात असूनही रेडिओची जादू कायम आहे. याच रेडिओच्या वारशाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी १३ फेब्रुवारी हा दिवस जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो. युनेस्कोने २०११ मध्ये हा दिवस घोषित केला आणि तो १३ फेब्रुवारी १९४६ रोजी स्थापन झालेल्या युनायटेड नेशन्स रेडिओच्या स्मरणार्थ निवडण्यात आला.
रेडिओची अमिट छाप आणि त्याचे वैशिष्ट्य
रेडिओचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो अगदी दुर्गम भागातही पोहोचतो, जिथे इंटरनेट किंवा टेलिव्हिजन पोहोचणे कठीण असते. भारतासारख्या विस्तीर्ण आणि बहुभाषिक देशात रेडिओ संवादाचे एक महत्त्वपूर्ण साधन आहे. हिमालयातील बर्फाच्छादित प्रदेश असो वा वर्दळीची महानगरे, रेडिओचा आवाज सगळीकडे ऐकू येतो.
रेडिओच्या माध्यमातून केवळ मनोरंजनच नाही तर शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, सरकारी उपक्रम आणि सामाजिक संदेशही लोकांपर्यंत पोहोचवले जातात. विविध एफएम चॅनेल्स आणि डिजिटल रेडिओ सेवांमुळे ते आजच्या काळातही प्रचंड लोकप्रिय आहे.
रेडिओ क्षेत्रात करिअर घडवण्याच्या संधी
रेडिओ हा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नाही तर त्यात नाव, प्रसिद्धी आणि पैसाही आहे. तुम्ही जर उत्तम संभाषणकलेचे धनी असाल, तुमचा आवाज प्रभावी असेल आणि लोकांशी संवाद साधण्याची तुमची कला असेल, तर रेडिओ जॉकी (RJ) म्हणून करिअर घडवता येते.
याशिवाय, खालील क्षेत्रांमध्येही रेडिओत संधी उपलब्ध आहेत:
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PM Modi France Visit: मोदीजी करणार फ्रान्सच्या आण्विक साइटची पाहणी; जाणून घ्या याचा भारताला काय फायदा
रेडिओमधील करिअरसाठी कोणते अभ्यासक्रम उपलब्ध आहेत?
रेडिओ क्षेत्रात करीअर करू इच्छिणाऱ्यांसाठी विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत:
रेडिओ क्षेत्रातील कमाई आणि संधी
या कोर्सेस पूर्ण केल्यानंतर विविध रेडिओ स्टेशन्स, एफएम चॅनेल्स आणि सरकारी ब्रॉडकास्टिंग कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकते. सुरुवातीला रेडिओ जॉकीसाठी १५,००० ते ३०,००० रुपये प्रति महिना पगार मिळतो. अनुभव वाढला की हा पगार लाखोंपर्यंत जाऊ शकतो. लोकप्रिय RJ आणि प्रसारण तज्ज्ञांना जाहिरात कंपन्या आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांकडूनही मोठ्या संधी मिळतात.
रेडिओमधील नोकरीच्या संधी
सध्या भारतात सरकारी आणि खाजगी रेडिओ चॅनेल्स मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. ऑल इंडिया रेडिओ (AIR), विविध खाजगी एफएम चॅनेल्स (रेडिओ मिर्ची, रेड एफएम, बिग एफएम, एफएम गोल्ड), आणि डिजिटल पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स यामध्ये रेडिओ प्रोफेशनल्ससाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत.
याशिवाय, जाहिरात एजन्सी, सरकारी माहिती प्रसारण खाते आणि ऑनलाइन मीडिया कंपन्यांमध्येही रेडिओ क्षेत्रातील तज्ज्ञांना मागणी आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताविरोधात बांगलादेश रचतोय मोठे षडयंत्र; चीनला हाताशी धरून करणार थेट देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर वार?
रेडिओचे भविष्य आणि नव्या संधी
डिजिटल युगातही रेडिओची गरज संपलेली नाही. उलट पॉडकास्टिंग, इंटरनेट रेडिओ आणि ऑन-डिमांड ऑडिओ सेवांमुळे रेडिओला नवीन संजीवनी मिळाली आहे. म्हणूनच, जागतिक रेडिओ दिनाच्या निमित्ताने आपण या माध्यमाची महती ओळखून त्याच्या विकासासाठी योगदान द्यायला हवे.
आजच्या तरुणांसाठी रेडिओ हे करिअरचे उत्तम क्षेत्र आहे, जिथे कला, नाव, प्रसिद्धी आणि पैसा यांचा मिलाफ आहे. त्यामुळे, जर तुम्हाला तुमच्या आवाजाची जादू लोकांपर्यंत पोहोचवायची असेल, तर रेडिओ हा तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकतो!