Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रणधुमाळी Hokcey स्पर्धेची! पुण्यनगरीत रंगला थरार; झारखंड, हरियाणा यांची दमदार सुरुवात अन्…

गट ‘ब’मधील सामन्यात हॉकी हरियाणाने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत हॉकी बंगालवर १०-१ असा मोठा विजय मिळवला. हा स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वाधिक गोलफरकाचा विजय ठरला.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 17, 2026 | 04:42 PM
hockey competition pune 2026

hockey competition pune 2026

Follow Us
Follow Us:
  • झारखंड, हरियाणा यांची दमदार सुरुवात
  • उत्तर प्रदेश-मणिपूर सामना १-१ बरोबरीत
  • झारखंडचा ६-०, तर हरियाणाचा १०-१ असा मोठा विजय
पुणे: १६व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये विभाग ‘अ’च्या पहिल्या दिवशी हॉकी झारखंड आणि हॉकी हरियाणा यांनी आपापल्या गटात दमदार विजय नोंदवत आघाडी घेतली. गट ‘अ’मध्ये हॉकी झारखंडने हॉकी चंदीगडचा ६-० असा एकतर्फी पराभव केला, तर गट ‘ब’मध्ये हॉकी हरियाणाने हॉकी बंगालवर १०-१ असा दणदणीत विजय मिळवला. दरम्यान, गट ‘क’मध्ये उत्तर प्रदेश हॉकी आणि मणिपूर हॉकी यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत सुटल्याने (Pune) दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुणावर समाधान मानावे लागले. ही स्पर्धा नेहरूनगर, पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर सुरू असून, हॉकी महाराष्ट्राच्या यजमानपदाखाली आणि हॉकी इंडियाच्या मार्गदर्शनाखाली तिचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील सामने विभाग ‘अ’ आणि विभाग ‘ब’ अशा दोन विभागांमध्ये खेळवले जात आहेत.

विभाग ‘अ’मधील गट ‘अ’च्या सामन्यात हॉकी झारखंडने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखत हॉकी चंदीगडचा ६-० असा पराभव केला. झारखंडकडून पुष्पा डांग हिने २०व्या आणि ४४व्या मिनिटाला दोन गोल करत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. याशिवाय होरो एस्तेरने ३९व्या, मुंदरी सरोजने ४०व्या, जमुना कुमारीने ५१व्या आणि संगीता कुमारीने ५४व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल नोंदवला. चंदीगडच्या संघाला संपूर्ण सामन्यात गोल नोंदवता आला नाही. या विजयासह हॉकी झारखंडने गटात विजयी सुरुवात करत आपली आघाडी मजबूत केली.

Hockey World Cup 2026: टीम इंडियाची विजयी गर्जना! वेल्सला नमवत वर्ल्ड कपमध्ये शानदार सुरुवात

हरियाणाचा बंगालवर १०-१ असा दणदणीत विजय

गट ‘ब’मधील सामन्यात हॉकी हरियाणाने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत हॉकी बंगालवर १०-१ असा मोठा विजय मिळवला. हा स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वाधिक गोलफरकाचा विजय ठरला. हरियाणाकडून कौर सुखप्रीत हिने २ऱ्या आणि २१व्या मिनिटाला दोन गोल केले. अंजनी हिने ६व्या, ४९व्या आणि ५७व्या मिनिटाला गोल करत हॅट्ट्रिक नोंदवली. खासा शशी हिने १४व्या आणि ४७व्या मिनिटाला दोन गोल केले. भाव्या आणि खुशी यांनी २९व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल नोंदवला, तर दीक्षाने ५२व्या मिनिटाला गोल करत हरियाणाच्या मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले. हॉकी बंगालकडून जाडिया साल्मी हिने १७व्या मिनिटाला संघाचा एकमेव गोल केला.

उत्तर प्रदेश-मणिपूर सामना बरोबरीत

गट ‘क’मध्ये उत्तर प्रदेश हॉकी आणि मणिपूर हॉकी यांच्यातील लढत अत्यंत चुरशीची झाली. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गोल करता आल्याने सामना १-१ असा बरोबरीत सुटला. उत्तर प्रदेश हॉकीकडून पटेल वंदना हिने २०व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र, त्याच २०व्या मिनिटात मणिपूर हॉकीच्या हुड्रोम बिद्यालक्स्मी देवी हिने गोल करत सामना पुन्हा बरोबरीत आणला. त्यानंतर दोन्ही संघांना आणखी गोल करण्यात यश आले नाही. परिणामी, दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.

Hockey World Cup 2026: टीम इंडियाच्या वर्ल्ड कप अभियानाला सुरुवात; कधी अन् कुठे पाहाल LIVE सामने? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

गुणतालिकेत कर्नाटक आघाडीवर

रविवारच्या सामन्यांनंतर विभाग ‘ब’च्या गट ‘ब’मध्ये हॉकी कर्नाटक ३ सामन्यांत ९ गुणांसह आघाडीवर आहे. हॉकी उत्तराखंड ४ सामन्यांत ७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून, हॉकी बिहार ३ सामन्यांत ४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.हॉकी तामिळनाडू ३ सामन्यांत ३ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. गोअन्स हॉकीला स्पर्धेतील सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

Web Title: 16th hockey india junior womens national championship 2026 jharkhand and haryana a strong start pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • Hockey
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

सुपरक्रॉस रेसिंगचा धुमाकूळ! ४ रेसिंग गटांत २१ देशांतील रायडर्स दाखवणार ताकद; नोंदणी प्रक्रिया यशस्वी
1

सुपरक्रॉस रेसिंगचा धुमाकूळ! ४ रेसिंग गटांत २१ देशांतील रायडर्स दाखवणार ताकद; नोंदणी प्रक्रिया यशस्वी

बालपणीचं स्वप्न, ऐतिहासिक मैदान! दिल्लीच्या ‘होम कोर्स’वर पुन्हा चमकण्यासाठी शुभंकर शर्मा उत्सुक
2

बालपणीचं स्वप्न, ऐतिहासिक मैदान! दिल्लीच्या ‘होम कोर्स’वर पुन्हा चमकण्यासाठी शुभंकर शर्मा उत्सुक

जेलीफिशचा दंश, हाताला दुखापत! भारतमातेसाठी जिद्दीला पेटली अन्…; जलतरणपटू गीताने रचला ‘हा’ रेकॉर्ड
3

जेलीफिशचा दंश, हाताला दुखापत! भारतमातेसाठी जिद्दीला पेटली अन्…; जलतरणपटू गीताने रचला ‘हा’ रेकॉर्ड

Asian Games 2026: इंडियन आर्मीचा नाद करायचा नाही! पुण्यातील खेळाडूंनी जिंकली तब्बल…,
4

Asian Games 2026: इंडियन आर्मीचा नाद करायचा नाही! पुण्यातील खेळाडूंनी जिंकली तब्बल…,

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.