
सहकारनगर येथील शाहू कॉलेज क्रिकेट मैदानावर स्पर्धेचे आयोजन
सहकारनगर येथील शाहू कॉलेज क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्रथम फलंदाजी करताना डीव्हीसीए संघाने ४५ षटकात ८ बाद ३०३ धावाचे आव्हान उभे केले. सलामीचे फलंदाज झटपट बाद झाल्याने डीव्हीसीए संघ ४.३ षटकात ३ बाद २७ धावा असा अडचणीत सापडला. त्यानंतर राज गादियाने १०४ चेंडूत १० चौकार व ४ षटकाराच्या १०३ धावांची संयमी खेळी केली.
Cricket News: हरी सावंतने मारलं मैदान! 3 विकेट्स अन्…; PCMC करंडकवर ‘विन टेंपल’ने कोरले नाव
योगेश पवारने ७१ चेंडूत १० चौकार व २ षटकारांसह ८२ धावा काढून साथ दिली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी १०३ चेंडूत १३० धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. त्यानंतर अवनीश कुलकर्णी नाबाद ३६, संतोष राठोड २६ यांनी धावा काढून संघाला ३०३ धावांचा टप्पा गाठून दिला. क्रिकबेसिक्स संघाकडून श्रेयस(३-३२),वेणुगोपाल व्यास(३-५६), नैतिक जाधव(१-२४) यांनी अचूक गोलंदाजीचा प्रयत्न केला.
या आव्हानाच पाठलाग करताना क्रिकबेसिक्स संघाचे खेळ २८.५ षटकांत सर्वबाद १३२ धावांत संपुष्टात आला. यात कृष्णा पालवे ३०, विश्वास कुकरेजा २५, श्रेयस १४, वेणुगोपाल व्यास १२ यांनी थोडासा प्रतिकार केला. डीव्हीसीए संघाकडून संतोष राठोड (३-११), जय गोंदकर(२-११), प्रज्योत गुंडाळे(२-१५), अथर्व काळे(२-१९) यांनी भेदक गोलंदाजकेली. शतकी खेळी करणारा राज गादिया सामन्याचा मानकरी ठरला.
डीव्हीसीए: 45 षटकात 8बाद 303धावा(राज गादिया 103(104,10×4,4×6), योगेश पवार 82(71,10×4,2×6),अवनीश कुलकर्णी नाबाद 36, संतोष राठोड 26, श्रेयस 3-32,वेणुगोपाल व्यास 3-56, नैतिक जाधव 1-24) वि.वि. क्रिकबेसिक्स: 28.5 षटकात सर्वबाद 132धावा(कृष्णा पालवे 30(24,4×4), विश्वास कुकरेजा 25, श्रेयस 14, वेणुगोपाल व्यास 12; संतोष राठोड 3-11, जय गोंदकर 2-11, प्रज्योत गुंडाळे 2-15, अथर्व काळे 2-19); सामनावीर – राज गादिया
Ans: डीव्हीसीए संघाकडून राज गादियाने १०३ धावांची शतकी खेळी केली, तर योगेश पवारने ८२ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
Ans: १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात डीव्हीसीए संघाने क्रिकबेसिक्स संघाचा १७१ धावांनी पराभव केला.