Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

38th National Games : जिम्नॉस्टिक्समध्ये सुवर्णपदकांचा षटकार; पदकतक्त्यात महाराष्ट्र दुसर्‍या स्थानी, अक्रोबॅटिकमध्ये सुवर्ण चौकार

38th National Games : 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र संघाने जिम्नॅस्टिक्समध्ये सुवर्ण पदकांचा षटकार ठोकला आहे. पदतक्त्यात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर पोहचून अक्रोबॅटिकमध्ये सुवर्ण चौकारासह एक रौप्य पदक पटकावले

  • By युवराज भगत
Updated On: Feb 11, 2025 | 04:50 PM
38th National Games : जिम्नॉस्टिक्समध्ये सुवर्णपदकांचा षटकार; पदकतक्त्यात महाराष्ट्र दुसर्‍या स्थानावर, अक्रोबॅटिकमध्ये सुवर्ण चौकार

38th National Games : जिम्नॉस्टिक्समध्ये सुवर्णपदकांचा षटकार; पदकतक्त्यात महाराष्ट्र दुसर्‍या स्थानावर, अक्रोबॅटिकमध्ये सुवर्ण चौकार

Follow Us
Close
Follow Us:

देहरादून : जिम्नॉस्टिक्समध्ये सुवर्णपदकांचा षटकार झळकवित महाराष्ट्राने 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील 15वा दिवस गाजविला.अक्रोबॅटिक प्रकारात तालबद्ध, सुरबद्ध आणि अचंबित करणार्‍या रचना सादर करुन चार सुवर्णपदकांसह एक रौप्य अशी पाच पदकांची लयलूट करीत केली. पाठोपाठ रिदमिक्समध्ये सांघिक सुवर्ण व ट्रॅम्पोलिन वैयक्तिक प्रकारात एक सुवर्ण आणि एका रौप्य पदकाची कमाई केली. जिम्नॉस्टिक्समधील यशाने 38 सुवर्ण पदकांसह पदकतक्यात महाराष्ट्र दुसर्‍या स्थानावर आहे.

अक्रोबॅटिकमध्ये महाराष्ट्र संघाचा सुवर्ण चौकार
भागीरथी क्रीडा संकुलात सुरू असलेल्या स्पर्धेत महाराष्ट्राचा बोलबाला दिसून आला. अक्रोबॅटिकमध्ये महाराष्ट्राने महिला दुहेरी, मिश्र दुहेरी, पुरुष सांघिक गट व महिला तिहेरी या चार गटात सुवर्णपदके जिंकले. मात्र, या प्रकाराच्या पुरुष दुहेरीत महाराष्ट्राच्या जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. रिदमिक्स प्रकारात महाराष्ट्राने सांघिक गटात नेत्रदीपक आणि अचंबित करणार्‍या रचना सादर करुन सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. संयुक्ता काळे, किमया कार्ले, परिणा मदनपोत्रा व शुभश्री मोरे या महिला चौकडीने एकूण 239.05 गुणांची कमाई करीत महाराष्ट्राला हे सोनेरी यश मिळवून दिले.

एक सुवर्ण आणि एका रौप्य पदकाची कमाई
ट्रॅम्पोलिन प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वैयक्तिक प्रकारात एक सुवर्ण आणि एका रौप्य पदकाची कमाई केली. पुरुषांच्या वैयक्तिक गटात छत्रपती संभाजीनगरच्या आयुष मुळे याने सर्वाधिक 48.74 गुणांची कमाई करीत महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले. गतवर्षी या स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागलेल्या आयुषने या वेळी सुवर्णपदकाला गवसणी घातली. सर्व पदक विजेत्यांचे पथकप्रमुख संजय शेटे, उप पथकप्रमुख स्मिता शिरोळे यांनी क्रीडा संकुलात उपस्थित राहून अभिनंदन केले. जिम्नॉस्टिक्समधील या यशाने अव्वल स्थानाकडे महाराष्ट्राची वाटचाल सुरू झाली असल्याचे पथकप्रमुख संजय शेटे यांनी सांगितले.

हातचे पदक गेल्याने मैदानावरच अश्रू
प्रशिक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने हे यश मिळविले. ही तर फक्त माझी सुरुवात आहे. या स्पर्धेत देशासाठी पदक जिंकणे हेच माझे मुख्य लक्ष होय, असे आयुषने सांगितले. महिलांच्या वैयक्तीत गटात डोंबिवलीच्या चैत्राली सोनवणे हिने 39.28 गुणांसह रौप्यपदक जिंकले. दहावीत शिकणारी चैत्राली देखील संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. या प्रकारात सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार असलेली रिया पाखरे आपली कला सादर करताना खाली पडली अन् तिचे सुवर्ण पदकाचे स्वप्न एका क्षणात भंगले. हातचे पदक गेल्याने तिला मैदानावरच अश्रू आणि हुंदके अनावर झाले होते.

महाराष्ट्राच्या जोडीचा जबरदस्त बॅलन्स
अक्रोबॅटिकमध्ये महिला दुहेरीत ऋतुजा जगदाळे व निक्षिता खिल्लारे या महाराष्ट्राच्या जोडीने जबरदस्त बॅलन्स आणि अचंबित करणार्‍या रचना सादर करून 51.250 गुणांची कमाई करीत सुवर्णपदक खेचून आणले. प. बंगालला 44.700 गुणांसह रौप्य व केरळने 43.500 गुणांसह कांस्यपदक जिंकले. ऋतुजा आणि निक्षिता दोघीही मुंबईच्या असून, राहुल ससाणे व प्रवीण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील श्री नारायणराव आचार्य विद्या निकेतन शाळा, चेंबूर येथे सराव करतात. ऋतुजाचे राष्ट्रीय स्पर्धेतील हे दुसरे सुवर्णपदक असून, निक्षिताचे हे पहिलेच पदक होय.

छत्रपती संभाजीनगरच्या जोडीने सर्वाधिक 52.250 गुणांची कमाई

मिश्र दुहेरीत शुभम सरकटे व रिद्धी जैस्वाल या छत्रपती संभाजीनगरच्या जोडीने सर्वाधिक 52.250 गुणांची कमाई करीत सुवर्णपदक जिंकले. केरळने 47.720 गुणांसह रौप्य, तर कर्नाटकने 46.839 गुणांसह कांस्यपदक जिंकले. शुभम व रिद्धी या महाराष्ट्राच्या जोडीचे राष्ट्रीय स्पर्धेतील हे पहिलेच सुवर्णपदक होय. दोघेही प्रशिक्षक प्रवीण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर येथील केआरएस स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये सराव करतात. पुरुष सांघिक गटात प्रशांत गोरे, नमन महावर, रितेश बोराडे, यज्ञेश भोस्तेकर या मुंबईच्या चौकडीने 64.650 गुणांची कमाई करीत महाराष्ट्राला तिसरे सुवर्णपदक जिंकून दिले.

कर्नाटकने 53.740 गुणांसह कांस्य पदक जिंकले

केरळने 61.210 गुणांसह रौप्य, तर कर्नाटकने 53.740 गुणांसह कांस्य पदक जिंकले. प्रशिक्षक राहुल ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या पुरुष संघाने हे सोनेरी यश संपादन केले. त्यानंतर महिला सांघिकमध्येही अक्षता ढोकळे, अर्ना पाटील व सोनाली बोराटे या त्रिमूर्तीनी 61.730 गुणांची कमाई करीत महाराष्ट्राला अक्रोबॅटिकमधील चौथे सुवर्ण पदक जिंकून दिले. प बंगालने 51.540 गुणांसह रौप्य, तर कर्नाटकला 42.750 गुणांसह कांस्यपदक जिंकले. राहुल ससाणे यांच्याच मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या महिला संघाने सोनेरी यश मिळाले, हे विशेष. या प्रकारात फक्त महाराष्ट्राला पुरुष दुहेरीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. गणेश पवार व आदित्य काळकुंद्रे या मुंबईच्या जोडीने 61.020 गुणांसह हे रूपेरी यश मिळविले. या प्रकारात कर्नाटकने 62.050 गुणांसह सुवर्ण, तर हरयाणाने 59.840 गुणांसह कांस्यपदक जिंकले.

रिदमिक्स प्रकारात महाराष्ट्राने सांघिक गटात नेत्रदीपक आणि अचंबित करणार्‍या रचना सादर करुन सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. संयुक्ता काळे, किमया कार्ले, परिणा मदनपोत्रा व शुभश्री मोरे या महिला चौकडीने एकूण 239.05 गुणांची कमाई करीत महाराष्ट्राला हे सोनेरी यश मिळवून दिले. जम्मू काश्मीर संघाला 231.65 गुणांसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले, तर 192.60 गुणांसह हरयाणाने कांस्यपदक जिंकले. प्रशिक्षक मानसी गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राने हे अव्वल यश संपादन केले. या चारही मुली ठाण्याच्या असून त्या ठाण्यातच द फिनिक्स जिमनॅस्टिक्स अकादमी येथे सराव करतात.

 

Web Title: 38th national games 2024 25 six gold medals in gymnastics maharashtra second in medal table one silver medal with four gold medals in acrobatics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2025 | 04:50 PM

Topics:  

  • 38th National Games 2025
  • gold medal
  • gymnastics
  • maharashtra
  • Silver Medal

संबंधित बातम्या

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप
1

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
2

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
3

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Local Body Election :  ‘Gen-Z’ लादेखील राजकारणाचे आकर्षण! नोकरी सोडून राजकारणात प्रवेश
4

Maharashtra Local Body Election : ‘Gen-Z’ लादेखील राजकारणाचे आकर्षण! नोकरी सोडून राजकारणात प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.