Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

HCL आणि SRFI चा मोठा धमाका! आंतरराष्ट्रीय Squash ची रणधुमाळी; विजेत्याला १५,००० अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस

एचसीएल ग्रुपचे स्‍ट्रॅटेजीचे प्रेसिडन्ट सुंदर महालिंगम म्हणाले, "एचसीएलमध्ये आमचे मुख्य लक्ष आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या माध्यमातून भारतातील स्कॉश टॅलेंटसाठी शाश्वत मार्ग तयार करण्यावर राहिले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 26, 2026 | 08:24 PM
HCL आणि SRFI चा मोठा धमाका! आंतरराष्ट्रीय Squash ची रणधुमाळी; विजेत्याला १५,००० अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस
Follow Us
Follow Us:

विजेत्याला मिळणार प्रत्येकी १५,००० अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस
जुहू जिमखाना क्लब येथे करण्यात आले स्पर्धेचे आयोजन
२९ जून रोजी दुपारी १२:०० वाजल्यापासून होणार सुरुवात

मुंबई: एचसीएल ग्रुप या अग्रगण्य जागतिक समूहाने स्कॉश रॅकेट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसआरएफआय) सोबत सहयोगाने २९ जून ते ३ जुलै दरम्यान मुंबईतील जुहू जिमखाना क्लब (Sports) येथे पुढील पीएसए पातळीवरील स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत १५ देशांतील ४८ आघाडीचे स्कॉश खेळाडू एकत्र येणार आहेत. २९ जून रोजी दुपारी १२:०० वाजल्यापासून पहिल्या फेरीच्या सामन्यांनी या स्पर्धेची सुरुवात होईल, ज्यामुळे मुंबई पुढील पाच दिवस जागतिक दर्जाच्या स्कॉश मोहिमेचे केंद्र बनेल. या टूर्नामेंटमध्‍ये पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र पीएसए चॅलेंजर स्पर्धा असतील, ज्यामध्ये प्रत्येकी १५,००० अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस दिले जाईल.

एचसीएल स्कॉश टूर ही प्रोफेशनल स्कॉश असोसिएशन (पीएसए) द्वारे प्रमाणित असलेली आणि अनेक शहरांमध्ये आयोजित केली जाणारी पीएसए चॅलेंजर टूर आहे, जी खेळाडूंना महत्त्वपूर्ण जागतिक रँकिंग मिळवण्याची संधी देते. या स्पर्धा भारतातील खेळाडूंना मायदेशात जगातील सर्वोत्तम स्कॉश टॅलेंटशी स्पर्धा करण्याची सुवर्णसंधी देखील उपलब्ध करून देतात.

चाहत्यांच्या भावनांचा अपमान? पहिल्या सामन्यात Vaibhav Sooryvanshi ला संघात स्थान नाही, कारण काय?

एचसीएल ग्रुपचे स्‍ट्रॅटेजीचे प्रेसिडन्ट सुंदर महालिंगम म्हणाले, “एचसीएलमध्ये आमचे मुख्य लक्ष आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या माध्यमातून भारतातील स्कॉश टॅलेंटसाठी शाश्वत मार्ग तयार करण्यावर राहिले आहे. गेल्या काही वर्षांत आम्ही दिल्ली-एनसीआर, चेन्नई, जयपूर आणि मुंबईसह अनेक शहरांमध्ये पीएसए स्पर्धांचे आयोजन केले आहे, ज्यातून जागतिक दर्जाची स्पर्धा भारतातील खेळाडूंच्या जवळ आली आहे. या प्रवासातील मुंबई टप्पा हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे, ज्यामुळे खेळाडूंना मायदेशात आंतरराष्ट्रीय प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध खेळण्याचा उत्तम अनुभव मिळेल.”

स्कॉश रॅकेट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे (एसआरएफआय) सेक्रेटरी जनरल सायरस पोंचा म्हणाले, “भारतातील स्कॉशमध्ये एक खेळाडू, प्रशिक्षक आणि प्रशासक म्हणून तीन दशकांहून अधिक काळ घालवल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव कशा प्रकारे एखाद्या खेळाडूची प्रगती आणि त्याचा आत्मविश्वास घडवू शकतो, हे मी जवळून पाहिले आहे. मुंबई चॅलेंजर स्पर्धा उदयोन्मुख खेळाडूंना रँकिंग पॉईंट्स मिळवण्याची, १५ देशांतील अनुभवी आंतरराष्ट्रीय व्यावसायिक खेळाडूंविरुद्ध स्वतःची परीक्षा घेण्याची आणि महत्त्वाचा स्पर्धात्मक अनुभव घेण्याची एक मोलाची संधी देते. हा अनुभव त्यांना ज्युनियर पातळीवरील यशापासून ते व्यावसायिक स्‍तरावरील सातत्यपूर्ण कामगिरीमधील अंतर भरून काढण्यास मदत करेल. भारतामधील पुढील पिढीतील स्कॉश टॅलेंटसाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही एचसीएल आणि एसएआयचे त्यांच्या स्थिर पाठिंब्यासाठी आभारी आहोत.”

‘बापू’ घालणार धुमाकूळ! Ireland विरुद्ध 3 विकेट्स घेताच Axar Patel च्या नावावर होणार ‘हा’ महारेकॉर्ड

मुंबईमध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या स्पर्धेत भारताचे अव्वल मानांकित स्कॉश खेळाडू सहभागी होणार आहेत, ज्यामध्ये वेलावन सेंथिलकुमार (रँक ५०), माजी आशियाई क्रीडा स्पर्धा पदक विजेती जोश्ना चिनप्पा (रँक ७१) आणि तन्वी खन्‍ना (रँक ७५) यांचा समावेश आहे. या स्पर्धेत देशातील आघाडीच्या ज्युनियर खेळाडूंच्या रूपाने उदयोन्मुख टॅलेंट देखील पाहायला मिळेल. ही स्पर्धा वर्ल्ड स्कॉश फेडरेशनच्या (डब्‍ल्‍यूएसएफ) अद्ययावत नियमांनुसार खेळवली जाईल, तर मुंबईतील जिमखाना क्लब खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देईल. या स्पर्धेचा समारोप ३ जुलै २०२६ रोजी अंतिम सामने आणि पारितोषिक वितरण समारंभाने होईल, ज्यामुळे क्रीडाप्रेमींना एक रोमांचक थरार अनुभवता येईल.

Web Title: 48 international squash players from 15 countries ready for hcl srfi psa challenger tournament in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 08:24 PM

Topics:  

  • Mumbai News
  • Sports News
  • Squash

संबंधित बातम्या

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा
1

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा

Football: अर्णव कोरेचा डबल धमाका! ध्रुव ग्लोबलने कल्याणी स्कूलला ४-१ ने नमवत लोयोला कपमध्ये मिळवला विजय
2

Football: अर्णव कोरेचा डबल धमाका! ध्रुव ग्लोबलने कल्याणी स्कूलला ४-१ ने नमवत लोयोला कपमध्ये मिळवला विजय

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
3

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

हीरा है यह हीरा! गुलवीर सिंहची पदकांची हॅट्ट्रिक; तब्बल 38 वर्षांनी रचला ‘हा’ इतिहास, Asian Games मध्ये…
4

हीरा है यह हीरा! गुलवीर सिंहची पदकांची हॅट्ट्रिक; तब्बल 38 वर्षांनी रचला ‘हा’ इतिहास, Asian Games मध्ये…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.