Who is the best average king in the T20 Asia Cup! Know the statistics of these 6 batsmen
Batsmen with the best averages in the T20 Asia Cup : ९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ च्या स्पर्धाला सुरुवात होत आहे. ही स्पर्धा यावेळी टी २० स्वरूपात खेळवण्यात येत आहे. भारतीय संघ टीम १० सप्टेंबरला यूएईविरुद्ध खेळून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. तसेच १४ सप्टेंबर रोजी आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करणार आहे. यावेळी होणार आशिया कप टी २० स्वरूपात असून यामध्ये फलंदाजांची चलती दिसून येणार सल्याच बोलले जात आहे. टी२० सामन्यांमध्ये अशाच सहा फलदाजांची आपण माहिती घेऊ ज्यांनी आशिया कप टी२० स्वरूपात आपल्या सर्वोत्तम सरासरीने फलंदाजी केली आहे. या यादीमध्ये भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे नाव अव्वल स्थानी आहे. माहितीसाठी विराट कोहली यापूर्वीच टी २० स्वरूपातून निवृत्ती घेतली आहे.
हेही वाचा : ‘त्याचा काही स्वार्थी हेतू असेल…’, ‘त्या’ व्हिडीओनंतर हरभजन सिंगने ललित मोदींवर साधला निशाणा
१) विराट कोहली
टी२० स्वरूपात आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली अव्वल स्थानी विराजमान आहे. कोहली आशिया कपच्या टी २० स्वरूपामध्ये एकूण १० सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याने ८५.८० च्या सरासरीने नऊ डावांमध्ये खेळताना ४२९ धावा फटकावल्या आहेत. या दरम्यान, विराट कोहलीने एक शतक आणि तीन अर्धशतकं झळकवली आहेत. टी-२० स्वरूपात आशिया कपमध्ये कोहलीने ४० चौकार आणि ११ षटकार देखील लगावले आहे.
आशिया कपमध्ये विराट कोहलीने ८ सप्टेंबर २०२२ रोजी अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात १२२ धावांची नाबाद खेळी साकारली होती. या खेळीत कोहलीने ६१ चेंडूंमध्ये १२२ धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने ६ षटकार आणि १२ चौकार लगावले होते. विराटच्या खेळीच्या जोरावर भारताने २१२/२ धावा काढल्या होत्या आणि १०१ धावांनी विजय मिळवला होता. हाँगकाँगच्या बाबर हयातनेही आशिया कपच्या टी २० स्वरूपात त्याच १९ फेब्रुवारी २०१६ रोजी ओमानविरुद्ध ६० चेंडूत १२२ धावांची खेळी केली होती.
२)इब्राहिम झद्रान,
आशिया कपमध्ये टी२० स्वरूपात दुसऱ्या स्थानावर अफगाणिस्तानचा इब्राहिम झद्रानचे नाव घ्यावे लागते. ज्याने पाच सामन्यांमध्ये ६५.३३ च्या सरासरीने १९६ धावा फटकावल्या आहेत.
३)शोएब मलिक
सर्वोत्तम सरासरीच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा शोएब मलिक विराजमाने आहे. ज्याने चार सामन्यांमध्ये ६०.५० च्या सरासरीने १२१ धावा फटकावल्या आहेत.
४)सरफराज अहमद
पाकिस्तानचा सरफराज अहमदने देखील त्याच संख्येच्या सामन्यांमध्ये त्याच सरासरीने आशिया कपमध्ये फलंदाजी केलेली आहे.
५) महमुदुल्लाह रियाद
आशिया कपच्या टी २० स्वरूपात बांगलादेशचा मोहम्मद महमुदुल्लाह रियाद सर्वोत्तम सरासरी असणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे, ज्याने सात सामन्यांमध्ये ५७.६६ च्या सरासरीने एकूण १७३ धावा काढल्या आहेत.
६ ) मोहम्मद रिझवान
आशिया कपच्या टी २० स्वरूपात सर्वोत्तम सरासरीच्या यादीत सहाव्या स्थानी पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान आहे. त्याने ५० पेक्षा जास्त सरासरीने फलंदाजी केली आहे. त्याने सहा सामन्यांमध्ये ५६.२० च्या सरासरीने २८१ धावा फटकावल्या आहेत.