'His career is great but..', Aakash Chopra's comment on Ravichandran Ashwin's retirement from IPL is in the news..
Aakash Chopra’s comments on R Ashwin’s IPL retirement : भारतीय माजी दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने नुकतीच आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. अश्विनने निवृत्तवेळी म्हटले आहे की, तो परदेशी लीगमध्ये खेळणार आहे. तो इंग्लंडमध्ये ‘द हंड्रेड’ फॉरमॅटमध्ये खेळणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू बनण्याची शक्यता आहे. अश्विनच्या या विधानावर आता भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने एक प्रश्न उपस्थित केला आहे. चोप्रा म्हणाला की इतर भारतीय क्रिकेटपटू देखील आता परदेशी टी-२० लीग खेळू शकतील का? या विधानाची चर्चा होऊ लागली आहे.
हेही वाचा : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर कुटुंबासह ‘शिवतीर्थ’ वर; राज ठाकरेंसह केली बाप्पाची पूजा
आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर आश्विनच्या आयपीएल निवृत्तीवर भाष्य केले आहे. चोप्राने म्हटले आहे की, “आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर रविचंद्रन अश्विनने म्हटले की, तो जगभरातील विविध लीगमध्ये खेळणार आहे. तो एक नवीन मार्ग तयार करत आहे. त्याच्या या निर्णयामुळे इतर भारतीय क्रिकेटपटूंना देखील जगातील इतर क्रिकेट लीगमध्ये खेळण्यासाठीचा मार्ग मोकळा होणारआहे का?” चोप्रा पुढे म्हणाला की, “अश्विनची आयपीएल कारकीर्द खूप उत्तम राहिली आहे आणि त्याला ज्या लीगमध्ये खेळायचे आहे, त्याची निवड केली जाणार आणि आणि तो तिथेही खूप चांगले प्रदर्शन करणार.”
माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा म्हणाला की, “आयपीएलचे नावीन्य आणि आकर्षण जपून ठेवण्यासाठी, बीसीसीआयकडून हा नियम करण्यात आला आहे की भारतीय क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती घ्यावी लागणार” तथापि, अश्विनच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर, त्याचा भारतीय क्रिकेटवर नेमका काय परिणाम होईल हे पाहणे खूप रंजक असणार आहे? परंतु या निर्णयामुळे त्या वृद्ध क्रिकेटपटूंच्या डोळ्यात निश्चितच एक स्वप्न निर्माण झाले आहे. जे देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी असून देखील टीम इंडियाच्या दाव्यापासून मैल दूर आहेत आणि त्याच वेळी कोणत्याही आयपीएल फ्रँचायझी संघाने त्यांना खरेदी केले नाही.”
आर. अश्विनने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर अशी चर्चा होऊ लागली आहे की तो पुढील वर्षी ‘द हंड्रेड’मध्ये खेळताना दिसण्याची शक्यता आहे. अंबाती रायुडू सीपीएलमध्ये आणि दिनेश कार्तिक दक्षिण आफ्रिका २० लीगमध्ये खेळताना दिसला आहे. आयपीएलमध्ये, अश्विन २००८ ते २०२५ दरम्यान चेन्नई सुपर किंग्ज, रायझिंग पुणे सुपर जायंट्स, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स आयपीएल संघाकडून खेळला आहे.
आर. अश्विन आतापर्यंत एकूण २२० आयपीएल सामन्यात खेळला आहे. या दरम्यान अश्विनने १८७ बळी घेतले आहेत. त्याच वेळी, या लीगमध्ये त्याची सरासरी ३०.२२ आहे तर इकॉनॉमी ७.२ इतकी राहिली आहे. याशिवाय, अश्विनने आयपीएलच्या एकूण २१७ डावांमध्ये ८३३ धावा देखील केल्या आहेत.