गौतम गंभीर(फोटो-सोशल मीडिया)
Asia cup 2025 : आशिया कप स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच करून झाली आहे. १५ सदस्यीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे देण्यात आले आहेत. या स्पर्धेत भारतीय संघ हा विजेतेपदाचा प्रमुख दावेदार मानण्यात येत आहे. भारत आपल्या मोहिमेला १० सप्टेंबर रोजी यूएई विरुद्ध खेळून सुरुवात करणार आहे. यावेळी आशिया कप टी-२० स्वरूपात खेळवण्यात येणार आहे. ही स्पर्धा भारतीय खेळाडूंसह भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसाठी देखील महत्वाची असणार आहे. तो मुख्य प्रशिक्षक म्हणून पहिल्यांदाच या स्पर्धेला सामोरा जाणार आहे. गौतम गंभीरने तीन वेळा आशिया कप स्पर्धेत भाग घेतला आहे. या दरम्यान तो एकदा चॅम्पियन देखील बनला आहे.
हेही वाचा : निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराने आखले नवे प्लॅन! BCCI साठी पार पाडू शकतो ‘ही’ जबाबदारी
हेड कोच गौतम गंभीरने आशिया कपमध्ये फलंदाज म्हणून शानदार कामगिरी केली आहे. गंभीरने या स्पर्धेत ३ वेळा भाग घेतला आहे. तो पहिल्यांदा २००८ मध्ये आशिया कपमध्ये खेळला होता, जिथे त्याने ६ सामन्यांमध्ये ४३ पेक्षा अधिक सरासरीने २५९ धावा फटकावल्या होत्या. तथापि, त्याच्या दमदार कामगिरीने टीम इंडियाला ही स्पर्धा जिकवून देऊ शकला नाही. अंतिम सामन्यात, भारतीय संघ अजंता मेंडिसच्या गोलंदाजी समोर टिकू शकला नाही. परिणामी अंतिम सामन्यात भारताचा १०० धावांनी पराभव झाला.
त्यानंतर २०१० च्या आशिया कपमध्ये देखील गौतम गंभीरने अजून चांगली कामगिरी करून सर्वांना प्रभावित केले होते. त्याने ४ सामन्यांमध्ये ५० पेक्षा जास्त सरासरीने २०३ धावा काढल्या होत्या. अंतिम सामना श्रीलंकेविरुद्ध होता आणि टीम इंडियाने दांबुलामध्ये ८१ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. २०१२ च्या आशिया कपमध्ये मात्र गौतम गंभीरने ३ सामन्यांमध्ये १११ धावा काढून देखील पण संघ अंतिम फेरीतही पात्र ठरण्यास यशस्वी झाला नाही.
हेही वाचा : Duleep Trophy 2025 स्पर्धेत अनेक स्टार खेळाडूंचा लागणार कस! दमदार कामगिरीवर असणार भर
गौतम गंभीर २०१० मध्ये झालेल्या आशिया कपमध्ये एक खेळाडू म्हणून आशिया चषक विजेता ठरला होता. आता १५ वर्षांनंतर, गौतम गंभीर संघाचा प्रशिक्षक म्हणून आशिया कप जिंकणार का? याकडे सर्वांच्या नजरा असणार आहे. आशिया कप २०२५ चे सर्व सामने दुबईमध्ये खेळवले जाणार आहेत.