
ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (Australia Vs Newziland) मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना आज पारपडला. केर्न्स येथील कॅजेली स्टेडियमवर हा सामना खेळवला जात असून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने (Aron Finch) या फॉरमॅटमधील कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला आहे. अॅरॉन फिंचने एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला आहे. शेवटच्या एक दिवसीय सामन्यात त्याला मोठी खेळी खेळता आली नाही. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊदीने त्याला बोल्ड केले.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने सलामीला आला. शेवटच्या एक दिवसीय सामन्यात फिंचला मोठी खेळी करता आली नाही. तो फक्त ५ धावा करून टीम साऊदीच्या गोलंदाजीवर बाद झाला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये फिंचची विकेट दाखवण्यात आली आहे. तो बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतत असताना स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी आपल्या जागेवरून उभे राहून टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. फिंचनेही बॅट उंचावून त्याला अभिवादन केले.
अॅरॉन फिंचची कारकीर्द :
अॅरॉन फिंचने आपल्या कारकिर्दीत १४६ एकदिवसीय सामने खेळले आणि एकूण ५४०६ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने एकूण १७ शतके आणि ३० अर्धशतके केली आहेत. त्याची सरासरी ३९. १३ होती. मात्र तो ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात संघाचे नेतृत्व करणार आहे.