अभिषेक शर्मा (फोटो- ians)
पहिल्या सामन्यातील धमाकेदार विजयानंतर भारतीय संघ या सामन्यात सिरीजवर कब्जा करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. या सामन्यात पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा भारताचा युवा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा याच्यावर खिळल्या आहेत. पहिल्या टी-20 सामन्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची धुळधाण उडवत अभिषेकने अवघ्या 32 चेंडूंत 82 धावांची वादळी खेळी केली होती. या तुफानी खेळीत त्याने 7 सिक्स आणि 7 फोर मारले होते.
आजच्या सामन्यात अभिषेक शर्माला भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा एक मोठा आंतरराष्ट्रीय टी-20 विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी आहे. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सामन्यांच्या बाबतीत सर्वात वेगवान 50 सिक्स मारण्याचा विक्रम सध्या रोहित शर्माच्या नावावर आहे. तो रेकॉर्ड मोडण्याची संधी अभिषेक शर्माकडे असणार आहे. अभिषेक शर्मा सध्या तुफानी फॉर्ममध्ये खेळत आहे, त्यानुसार आजच्या सामन्यात काही सिक्स मारताच तो रोहित शर्माच्या रेकॉर्डला मागे टाकण्याची शक्यता आहे.
पहिल्या सामन्यात मिळालेल्या दणदणीत विजयानंतर भारतीय संघ सध्या सिरिजमध्ये 1-0 ने पुढे आहे. आजचा सामना जिंकून सिरिज खिशात घालण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे. तर दुसरीकडे, अफगाणिस्तानचा संघ पुनरागमन करून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसेल. दिल्लीची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त मानली जात असल्याने आज पुन्हा एकदा सिक्स आणि फोर यांची आतषबाजी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
अफगाणिस्तान – इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमानुल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सेदिकुल्ला अटल, दरविश रसूली, अझमतुल्ला उमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, रशीद खान, मुजीब उर रहमान/नवीन-उल-हक, नूर अहमद, फजलहक फारुकी.
IND vs AFG: आज वैभव सूर्यवंशीला मिळणार का संधी? वरूण चक्रवर्तीऐवजी कोणाची होणार एंट्री
भारत- अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, रवी बिश्नोई.






