भारत विरुद्ध न्यूझीलंड (फोटो- सोशल मीडिया)
भारतीय क्रिकेट संघासाठी न्यूझीलंडमधील ऑकलंड येथील ऐतिहासिक ईडन पार्क हे लाभदायक असल्याचे म्हटले जाते. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या मैदानावर भारतीय संघाने आपली विजयी परंपरा कायम राखली आहे. येथे भारताने जेवढे सामने खेळले आहेत, त्यात भारताचा शानदार विजय झाला आहे.
IND vs NZ: T20 सिरीजमध्ये भारताकडून पराभव, डोक्याचा ताप कमीच होईना! खेळाडू आता दुखापतीमुळे बाहेर
भारतीय संघ ऑकलंड येथील इडन पार्क स्टेडियमवर आतापर्यंत तब्बल तीन टी 20 सामने खेळले आहेत. या तीनही सामन्यांमध्ये भारताने न्यूझीलंडचा पराभव केला आहे. त्यामुळे या स्टेडियमवर भारताचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. भारताने २०१९ मध्ये ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानावर आपला पहिला टी-२० सामना खेळला होता. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा भारताने 7 विकेट्स राखून पराभव केला होता.
उद्या म्हणजेच शुक्रवारी ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानावर रंगणाऱ्या चौथ्या टी-२० सामन्यासाठी क्रिकेट रसिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. या मैदानावर भारतीय संघाने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आतापर्यंत शंभर टक्के विजयाची परंपरा राखली आहे. त्यामुळे हा विजयी रथ कायम ठेवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. ऑकलंडच्या या ऐतिहासिक मैदानाची क्षमता ४० हजार प्रेक्षकांची आहे. उद्याच्या सामन्यासाठी सर्व तिकिटे काही वेळातच विकली गेली आहेत.
IND Vs NZ: न्यूझीलंड मायदेशात लाज राखणार? अभिषेक शर्मा अन् वैभव सूर्यवंशी…; चौथा सामना कधी?
भारत-न्यूझीलंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने भारताला 199 रन्सचे टार्गेट दिले होते. मात्र अभिषेक शर्माने वादळी शतक पूर्ण करत भारताला सहज विजय मिळवून दिला. अभिषेक शर्माने 38 बॉलमध्ये 113 रन्सची आक्रमक खेळी केली. तर वैभव सूर्यवंशीने देखील 45 रन्सची खेळी केली. न्यूझीलंडकडून डेरिल मिचेलने आक्रमक खेळी करत भारताला 199 रन्सचे टार्गेट दिले होते.
Ans: भारत अन् न्यूझीलंडमध्ये चौथा टी 20 सामना शुक्रवारी होणार आहे.
Ans: ऑकलंडच्या स्टेडियम भारताने अद्याप एकही सामना गमावला नाही.






