फोटो सौजन्य - BCCI women सोशल मीडिया
अंडर-19 महिला T20 विश्वचषक 2025 बक्षीस रक्कम : २०२३ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या अंडर-१९ महिला T२० विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडचा पराभव करून विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाने दोन वर्षांनंतरही विजेतेपद राखले. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा महिला अंडर-१९ टी-२० विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंडर-१९ महिला T२० विश्वचषक २०२५ बक्षीस रक्कम विश्वविजेत्या टीम इंडियावर पैशांचा पाऊस पाडला आहे. भारताच्या महिला संघाने संपूर्ण स्पर्धेमध्ये एकही सामना न गमावता फायनलमध्ये प्रवेश करून जेतेपद दुसऱ्यांदा नावावर केले आहे.
खरेतर, निक्की प्रसादच्या नेतृत्वाखालील संघाने स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पराभव करून विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली आणि स्पर्धेचा शेवटही विजयाने केला. संपूर्ण टूर्नामेंटमध्ये टीम इंडिया चॅम्पियन टीमप्रमाणे खेळली, ज्याला हरवणं कोणत्याही टीमला शक्य वाटत नव्हतं. आता अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय मुलींना बीसीसीआयकडून बक्षीस मिळाले आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच BCCI ने निक्की प्रसादच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या विजयावर आनंद व्यक्त केला आणि त्याच्यासाठी बक्षीस जाहीर केले.
BCCI Congratulates #TeamIndia Women’s U19 Team for Back-to-Back T20 World Cup Triumphs, announces a cash reward of INR 5 Crore for the victorious squad and support staff, led by Head Coach Nooshin Al Khadeer.#U19WorldCup
Details 🔽
— BCCI (@BCCI) February 2, 2025
ट्विटरवर ही माहिती देताना बीसीसीआयने जेतेपद पटकावणाऱ्या टीम इंडियाला ५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. संघातील सर्व १५ खेळाडू, मुख्य प्रशिक्षक नूशीन अल खादीर आणि उर्वरित सपोर्ट स्टाफमध्ये हे बक्षीस वितरित केले जाणार आहे. नूशीन यांच्या प्रशिक्षणाखाली भारताने २०२३ मध्ये याच स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीचे विजेतेपद पटकावले होते.
From Sachin Tendulkar to Mithali Raj, cricketing fraternity lavishes praise as India seal the #U19WorldCup 2025 title 👏https://t.co/znRxYzQZH2
— ICC (@ICC) February 2, 2025
बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी हे म्हणाले की, “अंडर १९ महिला विश्वचषक राखल्याबद्दल आमच्या मुलींचे अभिनंदन. ही एक अनुकरणीय मोहीम आहे ज्यामध्ये त्या संपूर्णपणे अपराजित राहिल्या. आम्ही काल रात्री नमन पुरस्कार सोहळ्यात त्यांच्या कामगिरीबद्दल बोललो आणि आज त्यांनी आम्हा सर्वांना अभिमान वाटला. ही ट्रॉफी दाखवते. भारतातील महिला क्रिकेटचा विकास आणि प्रत्येक सदस्याला या स्पर्धेत चमकताना पाहून मला खूप आनंद झाला आहे.
भारतीय महिला संघ हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली आगामी T२० मालिका इंग्लंडविरुद्ध जून महिन्यामध्ये खेळवली जाणार आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर असणार आहे. या दोन्ही संघामध्ये तीन सामान्यांची मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याआधी भारतामध्ये वूमेन्स प्रीमियर लीगचे सामने होणार आहे.