
Syed Mushtaq Ali Trophy : Dutch from the Indian team! Now the bat of the same player is on fire! A storming innings with a strike rate of 240
Rinku Singh’s innings in the Syed Mushtaq Ali Trophy : भारत सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर, भारतीय संघ ९ डिसेंबरपासून पाच सामन्यांची टी-२० मालिका देखील खेळणार आहे. यासाठी बीसीसीआयने ३ डिसेंबर रोजी यासाठी संघ जाहीर केला असून या संघात हार्दिक पंड्या परतला असला तरी रिंकू सिंगला संधि नाकारण्यात आली आहे.
रिंकू सिंगला २०२५ च्या आशिया कप आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान खेळवण्यात आलेल्या टी-२० मालिकेत फक्त एक सामना खेळण्याची संधी मिळाली होती. भारतीय संघातून वगळल्यानंतर रिंकू सिंगने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष्य वेधले आहे.
४ डिसेंबर रोजी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या ग्रुप बी मध्ये उत्तर प्रदेश आणि चंदीगड संघ आमनेसामने आले होते. उत्तर प्रदेशने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ गडी गमावून २१२ धावा उभ्या केल्या. रिंकू सिंगने फक्त १० चेंडूत २४ धावांची धमाकेदार खेळी साकारली होती. त्याचा स्ट्राईक रेट २४० होता. या खेळीत त्याने २ चौकार आणि २ षटकार खेचले. या खेळीने संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडण्यास चांगलीच मदत झाली. तसेच, समीर रिझवीने ४२ चेंडूत ७० धावांची खेळी केली.
उत्तर प्रदेशने दिलेल्या २१२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, चंदीगडला २० षटकात १७२ धावांच करता आल्या. ४ षटकात फक्त २३ धावा देत ३ बळी घेणाऱ्या भुवनेश्वर कुमारने संघाच्या विजयात मोठी भूमिका बाजवली. विप्राज निगमने देखील २ बळी घेतले, तर शिवम मावी, कार्तिक त्यागी आणि प्रशांत वीर यांना प्रत्येकी १ बळी घेण्यात यश आले.
उत्तर प्रदेशने मिळवलेल्या या विजयासह, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ मध्ये पाचव्या सामन्यात तिसरा विजय संपादित केला. हा संघ आता गट ब पॉइंट टेबलमध्ये १२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. रिंकू सिंगने केलेल्या स्फोटक कामगिरीने हे सिद्ध केले की तो मोठ्या सामन्यांमध्ये देखील भारतीय संघासाठी मोठा प्रभाव पाडू शकतो.