ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दुसरी टेस्ट मॅच(फोटो-सोशल मीडिया)
AUS vs ENG TEST, 1 st Day : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची अॅशेस कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळवण्यात येत आहे. या सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला असून इंग्लंडने जो रूटच्या शतकाच्या जोरावर ९ बाद ३२५ धावा केल्या आहेत. दिवस-रात्र कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात जो रूटने शानदार शतक लगावून संघाला तारळे आहे. तर ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने ६ विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा : IND vs SA: ‘तो शतक करणार नाही असं कधीच…’ विराट कोहलीच्या सलग दुसऱ्या शतकावर सुनील गावस्कर हे काय बोलून गेले?
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात दूसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, स्टोक्सचा हा निर्णय चांगळचा अंगलट आला. कारण मिचेल स्टार्कने पहिल्याच षटकात इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटला भोपळाही न फोडता माघारी पाठवले. त्यानंतर आलेला ऑली पोपला देखील तिसऱ्या षटकात शून्यावर माघारी पाठवले. ३ षटकात ५ धावांवर इंग्लंडच्या २ विकेट्स गेल्या होत्या. त्यानंतर आलेला जो रूट आणि सलामीवीर झॅक क्रॉली या जोडीने ११७ धावांची भागीदारी रचून इंग्लंडचा डाव सांभाळला. झॅक क्रॉली ९३ चेंडूत ७६ धावा करून माघारी परतला. त्याला मायकेल नेसरने बाद केले.
एका बाजूने जो रूटने बाजू लावून धरली होती. परंतु, दुसऱ्या बाजूने इंग्लंडच्या विकेट जात होत्या. हॅरी ब्रूक ३१ धावा, कर्णधार बेन स्टोक्स १९ धावा, जेमी स्मिथ ० धावा, विल जॅक्स १९ धावा, ब्रायडन कार्स ० धावा, गस अॅटकिन्सन ४ धावा करून बाद झाले तर जो रूटने या दरम्यान शानदार शतक ठोकले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जो रूट १३५ धावांवर तर जोफ्रा आर्चर ३२ धावांवर नाबाद होते. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या दिवशी मिचेल स्टार्कने आपला पहिल्या अकसोटीतील फॉर्म कायम राखत ६ विकेट्स घेतल्या. तर मायकेल नेसर आणि स्कॉट बोलँड यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
ऑस्ट्रेलिया : ट्रॅव्हिस हेड, जेक वेदरॉल्ड, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स केरी, जोश इंग्लिस, मायकेल नेसर, मिचेल स्टार्क, स्कॉट बोलँड, ब्रेंडन डॉगेट
इंग्लंड : झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ, विल जॅक्स, ब्रायडन कार्स, गस अॅटकिन्सन, जोफ्रा आर्चर






