Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajinkya Rahane आता नव्या भूमिकेत! २६ ऑगस्टपासून युरोपच्या ‘या’ लीगमध्ये खेळताना दिसणार

अजिंक्य रहाणे हा कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक फलंदाज समजला जातो. तसेच त्याच्याकडे टी 20 क्रिकेटचा मोठ्या प्रमाणात अनुभव आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 07, 2026 | 05:18 PM
Ajinkya Rahane आता नव्या भूमिकेत! २६ ऑगस्टपासून युरोपच्या ‘या’ लीगमध्ये खेळताना दिसणार
Follow Us
Follow Us:
  • अजिंक्य रहाणे विदेशात टी 20 क्रिकेट खेळणार
  • 30 जुलै रोजी रहाणेने जाहीर केली निवृत्ती 
  • युरोपियन टी 20 प्रीमियर लीगमध्ये खेळणार 
Ajinkya Rahane T20 Cricket League: भारतीय क्रिकेट संघाचा माजी उपकर्णधार आणि अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने नुकतीच ३० जुलै रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले होते. निवृत्तीच्या अवघ्या काही दिवसांनंतर रहाणेच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदवार्ता समोर आली आहे. आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच अजिंक्य रहाणे एका परदेशी T20 लीगमध्ये खेळताना दिसणार आहे.

26 ऑगस्ट 2026 पासून अजिंक्य रहाणे युरोपियन टी 20 प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. युरोपियन टी 20 प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात ॲमस्टरडॅम फ्लेम्स या संघाने अजिंक्य रहाणेची मार्की खेळाडू म्हणून निवड केली आहे. ॲमस्टरडॅम फ्लेम्स संघाने अजिंक्य रहाणे बाबत शिक्कामोर्तब केले आहे.

अजिंक्य रहाणे हा कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक फलंदाज समजला जातो. तसेच त्याच्याकडे टी 20 क्रिकेटचा मोठ्या प्रमाणात अनुभव आहे. अजिंक्य रहाणेने 308 टी 20 सामन्यांमध्ये 7968 रन्स केले आहेत. तसेच त्याने टी 20 फॉर्मटमध्ये 56 अर्धशतके आणि 2 शतके लगावली आहेत.

Vaibhav Sooryavanshi: निवृत्ती घेताच अजिंक्य रहाणने दाखवला वैभव सूर्यवंशीला आरसा, ‘आंतरराष्ट्रीय आणि IPL आकाशपाताळाचा फरक…’

अजिंक्य रहाणेने नुकतीच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपली निवृत्ती जाहीर केली आहे. ‘क्रिकेटने मला खूप काही दिले आहे. हा खेळ युरोपमध्ये प्रसिद्ध असलेली एक रोमांचक टप्प्यात प्रवेश करत आहे. मैदानावर आणि मैदानाबाहेर नवनवीन प्रयोग करण्याची ॲमस्टरडॅम फ्लेम्स यांची इच्छा मला जास्त प्रभावित करते. युरोपमधील क्रिकेटचे भविष्य अधिक मजबूत करण्यासाठी व्यवस्थापनासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे,’ असे अजिंक्य रहाणे याने म्हटल्याचे समोर येत आहे.

Ajinkya Rahane: ‘आई म्हणायची, बघ तो कुठे पोहोचला अन् तू…’; अजिंक्य रहाणेबरोबर क्रिकेट खेळायचा ‘हा’ मराठी अभिनेता, फोटो पाहा

अजिंक्य रहाणे ज्या ॲमस्टरडॅम फ्लेम्स संघाकडून खेळणार आहे, त्या संघात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, टिम डेव्हिड आणि न्यूझीलंडचा मायकेल ब्रेसवेल यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. युरोपियन T20 प्रीमियर लीग ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) मान्यतेने सुरू होणारी युरोपमधील पहिली अधिकृत T20 लीग आहे.

स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच २६ ऑगस्ट रोजी अजिंक्य रहाणेचा ॲमस्टरडॅम फ्लेम्स संघ आपला पहिला सामना खेळणार आहे. 

तारीख: २६ ऑगस्ट २०२६

सामना: ॲमस्टरडॅम फ्लेम्स विरुद्ध रॉटरडॅम डॉकर्स

वेळ: भारतीय वेळेनुसार (IST) संध्याकाळी ६:४५ वाजता

मैदान: स्पोर्टपार्क डुइवेस्टीन स्टेडियम, वूरबर्ग.

Web Title: After retirement ajinkya rahane play european t20 premier league sprots news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 05:12 PM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • cricket league
  • T20 cricket

संबंधित बातम्या

IND Vs JPN: पावसाचा व्यत्यय अन् शेवटच्या बॉलपर्यंत थरार! जपानवर भारताचा 2 रन्सने सनसनाटी विजय
1

IND Vs JPN: पावसाचा व्यत्यय अन् शेवटच्या बॉलपर्यंत थरार! जपानवर भारताचा 2 रन्सने सनसनाटी विजय

T20 क्रिकेटमध्ये Jos Buttler ची ‘दादागिरी’; असा विक्रम करणारा पहिलाच फलंदाज, पोलार्डला दिला ‘झटका’
2

T20 क्रिकेटमध्ये Jos Buttler ची ‘दादागिरी’; असा विक्रम करणारा पहिलाच फलंदाज, पोलार्डला दिला ‘झटका’

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय
3

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.