अजिंक्यने दाखवला वैभवला वास्तवतेचा आरसा (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
नुकताच निवृत्त झालेला भारताचे माजी दिग्गज खेळाडू अजिंक्य रहाणे यांनी Vaibhav Sooryavanshi च्या कसोटी क्रिकेट खेळण्याच्या संधींवर भाष्य केले आणि त्याला वास्तवाची जाणीव करून दिली. एका पॉडकास्टवर बोलताना रहाणे म्हणाला की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमध्ये खूप मोठा फरक असल्याने, सध्या वैभववर अतिरिक्त दबाव टाकणे अन्यायकारक ठरेल.
अजिंक्य पुढे म्हणाला की, “सध्या काहीही सांगणे कठीण आहे.” मला असं काहीही बोलायचं नाही ज्यामुळे या मुलावरचा दबाव वाढेल, कारण लोक आधीच त्याच्याबद्दल खूप बोलत आहेत. तो फक्त दोन आयपीएल हंगाम खेळला आहे. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप फरक आहे. देशासाठी खेळताना दबाव खूप जास्त असतो. आयपीएलमध्ये ४-५ षटकांत ७० धावा करणे सोपे आहे, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर तेच लक्ष्य गाठणे ही एक वेगळीच बाब आहे. त्यामुळे, त्याला त्याचा खेळ खेळू द्या आणि पुढे जाऊ द्या.
दुसरीकडे, भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने आयर्लंड दौऱ्यात वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी न देण्याच्या भारतीय संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कैफच्या मते, आयपीएल २०२६ मध्ये ऑरेंज कॅप जिंकलेल्या या स्फोटक फलंदाजाला आयर्लंडविरुद्धच संधी द्यायला हवी होती, जेणेकरून इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वीचा त्याचा संकोच दूर झाला असता.
आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना, मोहम्मद कैफने संघ व्यवस्थापनावर निशाणा साधत म्हटले की, अशा ‘एक्स-फॅक्टर’ खेळाडूला संघात संधी देण्याऐवजी त्याला पाणी द्यायला लावले.
‘तू तुझ्या नावाप्रमाणेच अजिंक्य’…Ajinkya Rahane च्या निवृत्तीवर पत्नी राधिकाची भावनिक पोस्ट
वैभवबद्दल कैफ म्हणाला, “वैभव एक ‘एक्स-फॅक्टर’ खेळाडू आहे. त्याने आयपीएलमध्ये केवळ एक-दोन सामन्यांमध्येच नव्हे, तर संपूर्ण हंगामात ऑरेंज कॅप जिंकून आपली क्षमता सिद्ध केली आहे. तो आयर्लंडमध्ये खेळायला हवा होता, ज्यामुळे त्याची चिंता कमी झाली असती. तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता, पण तुम्ही त्याला आधी पाणी प्यायला लावले. तो एक विशेष खेळाडू आहे आणि त्याला विशेष वागणूक मिळायला हवी होती. जर तो आयर्लंडमध्ये खेळला असता, तर त्याला UK मध्ये कोणतीही चिंता वाटली नसती.”






