
photo- social media
पाकिस्तान टीमचा ‘फुल टू गोंधळ’! सगळ्यांना चकवा देत खेळाडू हॉटेलमधून गायब; अधिकाऱ्यांची उडाली झोप
फ्रँचायझीने बुधवारी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की, ‘मँचेस्टर सुपर जायंट्सने पुष्टी करत आहे की, पुरुष संघाचा कर्णधार एडन मार्करम वैयक्तिक कारणास्तव दक्षिण आफ्रिकेत परतला आहे. क्लबच्या वतीने, आम्ही त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि या हंगामात संघासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्याचे आभार मानतो.’ ५ ऑगस्ट रोजी एमरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड येथे वेल्श फायरविरुद्धच्या सामन्यापासून जोस बटलर कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारेल. या सामन्यात बटलरला इतिहास रचण्याची संधी मिळेल .
बटलरने यापूर्वी ‘द हंड्रेड’च्या पहिल्या तीन हंगामांमध्ये मँचेस्टर संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. परंतु, २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाल्यापासून तो पहिल्यांदाच एखाद्या संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे. मार्करमच्या जाण्यामुळे ‘सुपर जायंट्स’ला या हंगामात पहिल्यांदाच आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करावे लागतील, कारण यापूर्वी त्यांनी सर्व पाच सामन्यांमध्ये एकच संघ मैदानात उतरवला होता. मँचेस्टर संघ सध्या दोन विजय आणि तीन पराभवांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे.
एडन मार्करम हा आयपीएल, एसए२० आणि द हंड्रेड या स्पर्धांमध्ये सुपर जायंट्स फ्रँचायझीच्या तीन संघांचा भाग आहे. त्याने या हंगामात पाच सामने खेळून ११७ धावा केल्या आहेत. आपल्या शेवटच्या सामन्यात, त्याने ओव्हलवर एमआय लंडनविरुद्ध एक शानदार अर्धशतक झळकावले. मार्चमध्ये झालेल्या लिलावानंतर, ‘द हंड्रेड’ स्पर्धेसाठी त्याची मँचेस्टरच्या पुरुष संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली. त्याच्या संघाने हंगामाची सुरुवात दोन विजयांनी केली, पण त्यानंतर सलग तीन सामने गमावले आहेत.
न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू मायकल ब्रेसवेलला मार्करमच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे. ब्रेसवेलकडून अष्टपैलू खेळाडू असल्याने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात संघाला फायद होऊ शकतो.