वृत्तानुसार, रोहित शर्माला संघातून वगळण्याची योजना केल्यामुळे अजित आगरकर यांना पदावरुन हटवले जाऊ शकते. एका मीडिया रिपोर्टनुसार, नवीन मुख्य निवडकर्ता होण्यासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण हे आघाडीवर आहेत. २०२१ च्या अखेरीस व्हीव्हीएस लक्ष्मण यांची बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) चे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. गेल्या पाच वर्षांपासून ते या पदावर आहेत. त्यांनी वेळोवेळी टीम इंडियाला प्रशिक्षणही दिले आहे. उदाहरणार्थ, नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात लक्ष्मण टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होते आणि आशियाई खेळांसाठीही ते मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम राहतील.
🚨 BCCI SELECTION COMMITTEE UPDATE 🚨 ▫️ Ajit Agarkar’s tenure is unlikely to be extended until the 2027 ODI World Cup. ▫️ The BCCI is reportedly unhappy with the Rohit Sharma retirement rumours, recent team selections, and Team India’s performances against Ireland and England.… pic.twitter.com/ah9D72R9qI — Kanaiya ⚡☢️ (@PaceandPlans) August 5, 2026
बीसीसीआय लवकरच आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांसंदर्भात एक आढावा बैठक घेणार आहे. या बैठकीत अजित आगरकर यांच्या भवितव्याबाबतही निर्णय घेतला जाऊ शकतो. आगरकर यांचा कार्यकाळ जून २०२६ मध्ये संपणार होता, परंतु त्यांचा कार्यकाळ तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आला होता. ते २०२७ च्या विश्वचषकाच्या अखेरपर्यंत मुख्य निवडकर्ता म्हणून कायम राहतील अशी अपेक्षा होती, परंतु आता नवीन पर्यायांवरील चर्चा तीव्र झाली आहे.
नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी रोहित शर्मा्च्या निवृत्तीच्या चर्चांनी जोर धरला होता. वृत्तानुसार, अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने रोहित शर्माला भविष्यातील योजनांमधून वगळण्याचा प्रस्ताव दिला होता. दरम्यान, लॉर्ड्सवर एकदिवसीय सामना झाला, ज्यात रोहितने ११० चेंडूंमध्ये १३८ धावा ठोकल्या. त्यानंतर, बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी मुख्य निवडकर्त्याशी चर्चा न करता जाहीर केले की,जोपर्यंत रोहित शर्मा संघात आहे, तोपर्यंत तो खेळत राहील. ते म्हणाले होते की. ‘रोहित शर्मा एकदिवसीय संघाचा नियमित सदस्य आहे. जोपर्यंत संघाच्या योजनांमध्ये त्याचा समावेश असेल, तोपर्यंत तो भारतीय संघाकडून खेळत राहील. लॉर्ड्सवरील एकदिवसीय सामना हा त्याचा शेवटचा सामना नसेल.’ या सर्व घटनांमुळे बीसीसीआय आणि अजित आगरकर यांच्यात बिनसल्याची माहिती आहे.






