Asia Cup 2025: 'It's his fault, not ours..', Chief Selectors' big reaction after Shreyas Iyer was dropped from Asia Cup
Asia cup 2025 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आशिया कप २०२५ साठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या स्पर्धेत भारतीय संघाची धुरा सूर्यकुमार यादव सांभाळणार आहे. तर इंग्लंड दौरा गाजवणारा शुभमन गिल टी-२० संघात परतला असून त्याच्याकडे उपकर्णधाराची जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु, यावेळी देखील भारताचा स्टार अनुभवी खेळाडू श्रेयस अय्यरकडे कानाडोळा करण्यात आला आहे. त्याने मागील काही स्पर्धांमध्ये शानदार कामगिरी करून देखील त्याचा विचार करण्यात आला नाही. त्याला स्टँडबाय खेळाडूम्हणून देखील संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे चाहत्यांना प्रश्न पडला आहे, की श्रेयस अय्यरल डावलण्यामागे नेमकं के कारण असावं? यावर आता टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत श्रेयस अय्यरची निवड न करण्यामागील कारणाचा खुलासा केला आहे.
हेही वाचा : Asia cup 2025 साठी ‘या’ 5 खेळाडूंची निवड, मात्र मैदानात उतरण्याची आशा धूसर; कारण आले समोर.
श्रेयस अय्यरने अलीकडेच झालेल्या आयपीएल २०२५ मध्ये शानदार कामगिरी केली आहे. त्याने आयपीएलच्या १८ व्या हंगामात पंजाब किंग्जचे नेतृत्व करताना त्याच्या संघाला अंतिम फेरीत पोहचवले होते. या हंगामात, त्याने फलंदाजीसह आपल्या नेतृत्वाने देखील छाप पडली होती. अय्यर हा त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. श्रेयस अय्यरने १७ सामन्यांमध्ये ५०.३३ च्या सरासरीने ६०४ धावा फटकावल्या होत्या.
श्रेयस अय्यरने अय्यरने २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाकडून महत्त्वाची भूमिका वठवली होती. ही स्पर्धा दुबईमध्ये खेळवण्यात आली होती. जिथे आता आशिया कप खेळला जाणार आहे. या स्पर्धेत तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता आणि संघाला जेतेपद मिळवून देण्यात त्याने योगदान दिले होते. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीकडे दुर्लक्ष करत आशिया कप २०२५ साठी त्याला संघात स्थान दिले गेले नाही. यामुळे आता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.
अशा परिस्थितीत, टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी श्रेयस अय्यरला संघात स्थान न देण्याच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. आगरकर म्हणाले की, ‘श्रेयस अय्यरने संघातील स्थान गमावले हे दुर्दैवी आहे. यामध्ये त्याची चूक नाही, ना आमची. श्रेयसला त्याच्या संधीची वाट पहावी लागणार आहे.’ आगरकरच्या विधानावरून हे स्पष्ट होते की निवड समितीकडून धोरणात्मक कारणांसाठी हा कठीण निर्णय घेण्यात आला आहे. परंतु अय्यरच्या प्रतिभेवर आणि योगदानावर कोणतेही प्रश्न उपस्थित करण्यात आलेले नाही.
हेही वाचा : Buchi Babu Trophy 2025 : पृथ्वी शॉने ठोकले दमदार शतक; भारतीय संघात परण्यासाठी ठोठावले दरवाजे