आशिया कपसाथी टीम इंडियाची घोषणा(फोटो-सोशल मीडिया)
Asia cup 2025 : भारतीय चाहते ज्या क्षणाची वाट बघत होते अखेर तो क्षण आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून आशिया कप २०२५ साठी १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघात अनुभव आणि तरुणाईचा उत्साह यांचे मिश्रण बघायला मिळत आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव सांभाळणार आहे तर इंग्लंड दौरा गाजवणारा शुभमन गिल टी-२० संघात परतला असून उपकर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच बीसीसीआयने अशा ५ खेळाडूंची देखील निवड केली आहे ज्यांना या स्पर्धेत एक देखील सामना खेळण्याची शक्यता खूप कमी आहे.
हेही वाचा : Buchi Babu Trophy 2025 : पृथ्वी शॉने ठोकले दमदार शतक; भारतीय संघात परण्यासाठी ठोठावले दरवाजे
आशिया कप २०२५ या स्पर्धेसाठी बीसीसीआयकडून १५ सदस्यीय संघासह पाच खेळाडूंना स्टँडबाय म्हणून निवडण्यात आले आहे.यामध्ये प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग, ध्रुव जुरेल आणि यशस्वी जयस्वाल यांची वर्णी लागली आहे. स्टँडबाय खेळाडूंचा मुख्य संघात समावेश नसतो, त्यामुळे त्यांना सामने खेळण्याची संधी मिळण्याची कोणती शक्यता नसते. परंतु, जर संघाला गरज असेल तर यापैकी कोणत्याही एका खेळाडूला मुख्य संघात समाविष्ट करता येऊ शकते. तरच त्यांना प्लेइंग ११ चा भाग होता येते.
स्टँडबाय म्हणून निवडण्यात आलेले खेळाडू थेट स्पर्धेत सहभागी होत नाहीत. परंतु, ते संघासाठी एक मजबूत बॅकअप म्हणून हजर असतात. जर मुख्य संघातील कोणताही खेळाडूला दुखापतीमुळे किंवा इतर कारणांमुळे स्पर्धेतून बाहेर जावे लागले तर या स्टँडबाय खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत, बीसीसीआयने त्या ५ खेळाडूंना स्टँडबायवर ठेवले आहे, जे गरज पडल्यास संघासाठी सामना जिंकणारे देखील ठरू शकतात. प्रसिद्ध कृष्णा त्याच्या वेगवान गोलंदाजीसाथी प्रसिद्ध आहे. तर वॉशिंग्टन सुंदर एक अष्टपैलू म्हणून उत्तम पर्याय आहे. तसेच रियान पराग आणि यशस्वी जयस्वाल यांची आक्रमक फलंदाजी तर ध्रुव जुरेल त्याच्या विकेटकीपिंग आणि फलंदाजीने कधीही संघासाठी उपयोगी ठरू शकतो.
हेही वाचा : Duleep Trophy 2025 : पूर्व विभागाला झटका! कर्णधार इशान किशनसह आकाश दीप स्पर्धेबाहेर; ईश्वरनकडे संघाची धुरा
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार),टिळक वर्मा, अभिषेक शर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकिपर), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (विकेटकिपर), हर्षित राणा, रिंकु सिंह