Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेटमधील ‘हा’ एकमेव खेळाडू ज्याने बॅटसोबतच UPSC गाजवली; सचिन-गांगुलीसोबत ड्रेसिंग रूम शेअर केली; ओळखले का त्याला?

अमेय खुरासिया हे एकमेव असे भारतीय क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. सचिन, गांगुलीसोबत खेळलेल्या या खेळाडूची प्रेरणादायी कहाणी आणि त्याचे सध्याचे काम जाणून घ्या.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 11, 2025 | 06:42 PM
क्रिकेटमधील ‘हा’ एकमेव खेळाडू ज्याने बॅटसोबतच UPSC गाजवली; सचिन-गांगुलीसोबत ड्रेसिंग रूम शेअर केली; ओळखले का त्याला?
Follow Us
Close
Follow Us:
  • क्रिकेटमधील ‘हा’ एकमेव खेळाडू ज्याने बॅटसोबतच UPSC गाजवली
  • सचिन-गांगुलीसोबत ड्रेसिंग रूम शेअर केली
  • श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी पदार्पण

संघ लोकसेवा आयोगात (UPSC) यशस्वी होण्याचे स्वप्न प्रत्येकाच्या मनात असते. भारतातील सर्वात कठीण आणि आव्हानात्मक परीक्षांपैकी एक म्हणून UPSC ओळखली जाते, ज्यात दरवर्षी लाखो उमेदवार सहभागी होतात. पण तुम्हाला माहीत आहे का, एक असाही माजी भारतीय क्रिकेटपटू आहे, ज्याने भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच UPSC परीक्षा उत्तीर्ण केली होती? अमेय खुरासिया (Amay Khurasiya) हे असे एकमेव आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी हा दुर्मिळ पराक्रम केला आहे.

सचिन-गांगुलीसोबत ड्रेसिंग रूम शेअर केली

१९७२ मध्ये मध्य प्रदेशमध्ये जन्मलेल्या खुरासिया यांनी वयाच्या 17 व्या वर्षीच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यांनी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग आणि अजय जडेजा यांसारख्या क्रिकेटच्या दिग्गजांसोबत ड्रेसिंग रूम शेअर केली होती. 1999 मध्ये त्यांनी श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी पदार्पण केले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरून या डावखुऱ्या फलंदाजाने 45 चेंडूत 57 धावांची शानदार खेळी केली होती.

हे देखील वाचा: ICC Women’s World Cup : ICC आणि जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय, विश्वचषकात पहिल्यांदाच दिसणार हे दृश्य!

त्यांची निवड 1999 च्या विश्वचषकासाठी भारतीय संघातही झाली होती, मात्र संघाची फलंदाजी खूप मजबूत असल्याने त्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकले नाही. त्यांनी भारतासाठी फक्त 12 एकदिवसीय सामने खेळले आणि 149 धावा केल्या. त्यांनी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2001 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी 7,000 हून अधिक धावा केल्या.

क्रिकेटनंतर प्रशासकीय सेवेत आणि प्रशिक्षक म्हणून जबाबदारी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच अमेय खुरासिया यांनी UPSC परीक्षा पास केली होती, पण त्यांनी क्रिकेटमध्येच करिअर पुढे नेण्याचा निर्णय घेतला. खराब फॉर्ममुळे संघाबाहेर पडल्यानंतर अमेय खुरासिया यांनी भारतीय कस्टम्स आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात निरीक्षक (Inspector) म्हणून काम सुरू केले. त्यासोबतच, त्यांनी इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये युवा खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे कामही केले. त्यांनी रजत पाटीदार आणि वेगवान गोलंदाज आवेश खान यांसारख्या युवा खेळाडूंना कोचिंग दिली आहे.

Web Title: Amay khurasiya cricketer upsc success

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 06:42 PM

Topics:  

  • cricket news
  • Sports
  • Sports News
  • Team India

संबंधित बातम्या

भारताने फिरकीसाठी बनवली खेळपट्टी, पण ‘या’ कारणामुळे डाव आला अंगाशी! ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा खुलासा
1

भारताने फिरकीसाठी बनवली खेळपट्टी, पण ‘या’ कारणामुळे डाव आला अंगाशी! ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा खुलासा

महाराष्ट्राच्या ‘महा-देवा’ फुटबॉल उपक्रमाला बळ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टायगर श्रॉफसोबत सामंजस्य करार
2

महाराष्ट्राच्या ‘महा-देवा’ फुटबॉल उपक्रमाला बळ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टायगर श्रॉफसोबत सामंजस्य करार

WPL 2026: ‘या’ तारखेपासून महिला प्रीमियर लीग सुरू होण्याची शक्यता; केवळ मुंबई आणि बडोदा येथे सामने होणार!
3

WPL 2026: ‘या’ तारखेपासून महिला प्रीमियर लीग सुरू होण्याची शक्यता; केवळ मुंबई आणि बडोदा येथे सामने होणार!

बाॅल टाक ना बाॅल… वैभव सूर्यवंशीने पाकिस्तानी गोलंदाजाचा काढला माज! लहान समजून पाक खेळाडूने केला डिवचण्याचा प्रयत्न, पहा Video
4

बाॅल टाक ना बाॅल… वैभव सूर्यवंशीने पाकिस्तानी गोलंदाजाचा काढला माज! लहान समजून पाक खेळाडूने केला डिवचण्याचा प्रयत्न, पहा Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.