Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्राच्या ‘महा-देवा’ फुटबॉल उपक्रमाला बळ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टायगर श्रॉफसोबत सामंजस्य करार

Maha-Deva Football Initiative: ग्रामीण खेळाडूंना आंतरराष्ट्रीय संधी देण्यासाठी 'महा-देवा' फुटबॉल उपक्रमाला टायगर श्रॉफ ५ वर्षांसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून जोडले. मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 17, 2025 | 09:41 PM
महाराष्ट्राच्या ‘महा-देवा’ फुटबॉल उपक्रमाला बळ (Photo Credit -X)

महाराष्ट्राच्या ‘महा-देवा’ फुटबॉल उपक्रमाला बळ (Photo Credit -X)

Follow Us
Close
Follow Us:
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
  • मेस्सीलाही जोडण्याचे ‘मित्रा’चे प्रयत्न
  • ग्रामीण फुटबॉल संस्कृतीला नवी दिशा
मुंबई: राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतः ला सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यशासन ‘महा-देवा’ फुटबॉल उपक्रम राबवित आहे. यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी सुखराज नाहर यांनी व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन (व्हिएसटीएफ) ला एक कोटींचे अनुदान दिले.

🤝CM Devendra Fadnavis presided over the MoU signing and exchange between School Education & Sports Department of Maharashtra, the Maharashtra Institution for Transformation (MITRA) and actor Tiger Shroff to give a boost to Maharashtra’s ‘Maha-Deva’ Football initiative.… pic.twitter.com/7jMqLr10he — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 17, 2025


यावेळी क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील पांढरे, अभिनेता टायगर श्रॉफ, नाहर ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष सुखराज नाहर आदी उपस्थित होते.

‘परीक्षा निकालानंतर ४ दिवसांत नियुक्तीपत्रे द्या; तर जानेवारीपर्यंत…; शासकीय सेवेत सुधारणांसाठी मुख्यमंत्र्यांचे मोठे निर्देश

महत्त्वाकांक्षी ‘महा-देवा’ फुटबॉल प्रतिभा विकास उपक्रमाला मोठी चालना मिळाली असून बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ यांनी या प्रकल्पासाठी पाच वर्षांसाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून काम करण्यास सहमती दर्शविली आहे. ‘महा-देवा’ हा राज्यातील मुला-मुलींमधील फुटबॉल प्रतिभा ओळखून त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा उपक्रम आहे. डब्लूआयएफएच्या स्काऊटिंग नेटवर्कद्वारे राज्यातील 30 मुले आणि 30 मुलींची निवड करून त्यांना तांत्रिक प्रशिक्षण, शैक्षणिक मदत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

‘मित्रा’ या उपक्रमात जागतिक फुटबॉल सुपरस्टार लिओनेल मेस्सी यांनाही जोडण्याचे काम करणार आहे. त्यामुळे महा-देवा उपक्रमाला आंतरराष्ट्रीय पातळीवरही मोठा दर्जा मिळणार आहे.

कार्यक्रमासंदर्भात जनजागृती, प्रचार साहित्य, सार्वजनिक कार्यक्रम, डिजिटल मोहिमा यामध्ये टायगर श्रॉफ यांचा सहभाग असेल. सर्व प्रचारात्मक साहित्य त्यांच्या पूर्व-मंजुरीनंतरच प्रसारित केले जाणार आहे.

राज्यातील फुटबॉल संस्कृतीला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने शासन, मित्रा आणि अभिनेता टायगर श्रॉफ एकत्र येत असल्याने महाराष्ट्रातील तरुण फुटबॉलपटूंना नवी संधी, मदत आणि प्रेरणा मिळणार आहे.

Ladki Bahin KYC: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ; आता ‘या’ तारखेपर्यंत असणार अंतिम मुदत

Web Title: Mou signed with tiger shroff in the presence of chief minister devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2025 | 09:39 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Football
  • Sports
  • Sports News
  • tiger shroff

संबंधित बातम्या

IND vs BAN Series Schedule 2026: भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार! वनडे आणि टी-२० मालिकेचे वेळापत्रक समोर
1

IND vs BAN Series Schedule 2026: भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार! वनडे आणि टी-२० मालिकेचे वेळापत्रक समोर

ICC T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषक २०२६ साठी दक्षिण आफ्रिकेने तगडा संघ जाहीर, ‘या’ खेळाडूंना मिळाले स्थान
2

ICC T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषक २०२६ साठी दक्षिण आफ्रिकेने तगडा संघ जाहीर, ‘या’ खेळाडूंना मिळाले स्थान

“महाराष्ट्रात मराठीच सक्तीची…”; साहित्यरसिकांनी CM फडणवीसांकडे केली महत्वाची मागणी
3

“महाराष्ट्रात मराठीच सक्तीची…”; साहित्यरसिकांनी CM फडणवीसांकडे केली महत्वाची मागणी

Ashes Series : नवीन वर्षाच्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, या ऑफस्पिनरचा समावेश! वाचा सविस्तर
4

Ashes Series : नवीन वर्षाच्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, या ऑफस्पिनरचा समावेश! वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.