
अमेरिकन दूतावासाने 9 कुस्तीपटूंचा व्हिसा नाकारला
अमेरिकन दूतावासाने 9 कुस्तीपटूंचा व्हिसा नाकारला आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारताचे आव्हान खडतर झाल्याचे म्हटले जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतीय कुस्तीपटूनी नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासात व्हिसासाठी अर्ज केला होता. 7 ऑक्टोबर रोजी खेळाडूंना मुलाखतीसाठी बोलावले होते.
७ ऑक्टोबर रोजी खेळाडूंना मुलाखतीसाठी बोलावले गेले. मात्र मुलाखत झाल्यावर दूतावसाने कोणतेही कारण न देता व स्पष्ट कारण न देता अमेरिकन दूतावासाने 9 कुस्तीपटूंचा व्हिसा नाकारला आहे. तसेच त्यांचे पासपोर्ट देखील खेळाडूंना परत देण्यात आले आहेत. व्हिसा फेटाळण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये २०२४ ची U17 वर्ल्ड चॅम्पियन ठरलेली स्टार महिला मल्ल नेहा सांगवान हिचाही समावेश आहे. देशासाठी जागतिक स्तरावर सुवर्णपदक पटकावणाऱ्या खेळाडूलाच व्हिसा नाकारल्याने क्रीडा जगतातून तीव्र आश्चर्य व संताप व्यक्त केला जात आहे.
स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ऐनवेळी कुस्तीपटूंचा व्हिसा नाकारला गेल्याने भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. आता या प्रकरणात क्रीडा मंत्रालय आणि भारतीय कुस्ती महासंघ अमेरिकन दूतावासाशी संपर्क साधून आपत्कालीन व्हिसा मिळवण्यासाठी काय प्रयत्न करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अमेरिकेतील लास वेगास येथे १२ ते १८ ऑक्टोबरदरम्यान रंगणाऱ्या ‘U23 जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप’ पूर्वी भारतीय कुस्तीपटूंना मोठा धक्का बसला आहे. अर्जदारांचे वय २० वर्षांपेक्षा कमी असणे आणि त्यांच्याकडे नियमित रोजगार नसणे, हे व्हिसा नाकारण्याचे मुख्य कारण असल्याचे म्हटले जात आहे. मात्र मुख्य आणि अधिकृत कारण अद्याप संजू शकलेले नाही.
या घडामोडीनंतर भारतीय कुस्ती महासंघाने तातडीने पावले उचलत नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासाशी संपर्क साधला आहे. महासंघाने दूतावासाला अधिकृत पत्र लिहून या निर्णयावर फेरविचार करण्याची नम्र विनंती केली आहे. तसेच ज्या कुस्तीपटूंची व्हिसा मुलाखत ८ ऑक्टोबर रोजी नियोजित आहे, त्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन व्हिसा मंजूर करावा, असेही पत्रात नमूद करण्यात आली आहे.