Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026: इंडियन आर्मीचा नाद करायचा नाही! पुण्यातील खेळाडूंनी जिंकली तब्बल…,

Asian Games 2026: सावन बरवालने मॅरेथॉनमध्ये रौप्यपदक मिळवत ४४ वर्षांनंतर भारताला या प्रकारात पदक मिळवून दिले. तसेच त्याने राष्ट्रीय विक्रमही नोंदविला.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 08, 2026 | 03:36 PM
Asian Games 2026

Asian Games 2026

Follow Us
Follow Us:
  • एएसआयच्या खेळाडूंची आशियाई स्पर्धेत दमदार कामगिरी
  • २० पैकी १२ पदकांवर पुण्यातील खेळाडूंची मोहोर
  • बॉक्सिंगमध्ये सुभेदार अंकुशने जिंकले गोल्ड मेडल 
पुणे/Asian Games 2026: भारतीय लष्कराच्या क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण प्रयत्नांना आशियाई क्रीडा स्पर्धेत मोठे यश मिळाले आहे. पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या (एएसआय) २५ खेळाडूंनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यापैकी खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांत १२ पदके पटकावली. भारतीय लष्कराच्या खेळाडूंनी मिळविलेल्या एकूण २० पदकांपैकी १२ पदके एएसआयच्या खेळाडूंनी मिळविली आहेत.

एएसआयच्या खेळाडूंनी ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, तिरंदाजी आणि कुस्ती या प्रकारांत पदकांची कमाई केली. ॲथलेटिक्समध्ये गुलवीर सिंहने १,५०० आणि १० हजार मीटरमध्ये रौप्य, तर पाच हजार मीटरमध्ये कांस्यपदक मिळवत तीन पदके पटकावली. सावन बरवालने मॅरेथॉनमध्ये रौप्यपदक मिळवत ४४ वर्षांनंतर भारताला या प्रकारात पदक मिळवून दिले. तसेच त्याने राष्ट्रीय विक्रमही नोंदविला. सरवेश कुशारेने उंच उडीत रौप्यपदक मिळविले. धर्मवीर हा कांस्यपदक मिळविणाऱ्या चार बाय ४०० मीटर धावण्याच्या संघाचा सदस्य होता.

सुभेदार अंकुशचा गोल्डन पंच 

बॉक्सिंगमध्ये सुभेदार अंकुशने सुवर्णपदक, तर सुभेदार नरेंद्र आणि हवालदार कपिल यांनी कांस्यपदक मिळविले. तिरंदाजीत सुभेदार धीरजने सांघिक आणि मिश्र सांघिक प्रकारात दोन रौप्यपदके मिळविली. त्याने ७२० पैकी ६९८ गुण मिळवत आशियाई विक्रमही नोंदविला. कुस्तीमध्ये सुभेदार दीपक पुनियाने ९७ किलो वजनी गटात कांस्यपदक मिळविले. लष्कराच्या ‘मिशन ऑलिम्पिक’ उपक्रमांतर्गत प्रतिभावान खेळाडूंची निवड, तज्ज्ञ मार्गदर्शन, शास्त्रोक्त प्रशिक्षण आणि अत्याधुनिक सुविधा यामुळे एएसआयच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने चांगली कामगिरी करता येत असल्याचे या यशातून अधोरेखित झाले आहे.

साताऱ्याच्या शिलेदारांचा सन्मान! आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांची भव्य गौरव रॅली; साहिल, ऋतुजा अन् सुदेष्णाचा भव्य सत्कार

नागोया, जपान येथे पार पडलेल्या २० व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील खेळाडूंनी ऐतिहासिक व अभूतपूर्व यश संपादन करून साताऱ्याच्या क्रीडा विश्वात अभिमानास्पद कामगिरी केली आहे. या स्पर्धेत साहील जाधव याने आर्चरीतील कंपाऊंड क्रीडा प्रकारात दोन सुवर्ण पदके, ऋतुजा पिसाळ हिने हॉकी खेळात सुवर्ण पदक आणि सुदेष्णा शिवणकर हिने ४×१०० मीटर रिले या मैदानी प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत चौथा क्रमांक पटकावला आहे. या सर्व गुणवंत खेळाडूंचा, त्यांच्या क्रीडा मार्गदर्शकांचा तसेच पालकांचा गौरव करण्यासाठी जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने भव्य गौरव रॅली व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

Asian Games 2026 : हर कर मैदान फतेह ; ‘या’ पाच कारणांमुळे भारतासाठी खास राहिली ही स्पर्धा

Web Title: Army sports institute players wins the silver gold medal at asian games 2026 at japan tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • asian games 2026
  • indian army
  • Pune Sports News

संबंधित बातम्या

Cricket: ८० रन्सची तुफानी खेळी अन् सलग दुसरा विजय! ‘रायझिंग स्टार ब्ल्यू’ चा दणदणीत पराक्रम
1

Cricket: ८० रन्सची तुफानी खेळी अन् सलग दुसरा विजय! ‘रायझिंग स्टार ब्ल्यू’ चा दणदणीत पराक्रम

Loyola Football Cup: आर्हतवा डोंगरेचा ‘पंच’! पेनल्टी शूटआऊटमध्ये तीन बचाव, बिशप्स कॅम्प उपांत्य फेरीत
2

Loyola Football Cup: आर्हतवा डोंगरेचा ‘पंच’! पेनल्टी शूटआऊटमध्ये तीन बचाव, बिशप्स कॅम्प उपांत्य फेरीत

Puna Club Magicians ठरले चॅम्पियन! डेक्कन जिमखाना करंडकावर मिळवला कब्जा
3

Puna Club Magicians ठरले चॅम्पियन! डेक्कन जिमखाना करंडकावर मिळवला कब्जा

Kho-Kho: देहूच्या लेकींचा खो-खोमध्ये ‘डबल धमाका’; १४ अन् १७ वर्षांखालील दोन्ही गटांत विजेतेपद!
4

Kho-Kho: देहूच्या लेकींचा खो-खोमध्ये ‘डबल धमाका’; १४ अन् १७ वर्षांखालील दोन्ही गटांत विजेतेपद!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.