Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket News: चौकार-षटकारांचा पाऊस अन् प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण; ‘हे’ दोन संघ खेळणार फायनल

Cricket News: अथर्व भोसले याने केलेल्या नाबाद ९९ धावांच्या जोरावर बजरंग दल संघाने लक्ष क्रिकेट ॲकॅडमीचा ७३ धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली. प्रथम फलंदाजी करताना बजरंग दल संघाने २०७ धावांचा डोंगर उभा केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 19, 2026 | 04:19 PM
विन टेंपल क्लब, बजरंग दल विजेतेपदासाठी लढणार

विन टेंपल क्लब, बजरंग दल विजेतेपदासाठी लढणार

Follow Us
Follow Us:
  • ‘पिंपरी चिंचवड करंडक‌’ टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 
  • विन टेंपल क्लब, बजरंग दल विजेतेपदासाठी लढणार
  • हिंजवडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर सुरू आहेत सामने 
Cricket News: पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित ‘पिंपरी चिंचवड करंडक‌’ आंतरक्लब खुल्या गटाच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत विन टेंपल क्लब आणि बजरंग दल या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. हिंजवडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत अथर्व वानवे याने फटकावलेल्या ६१ धावांच्या जोरावर विन टेंपल क्लबने सह्यांद्री किंग्ज्‌ संघाचा ४५ धावांनी पराभव केला.

पहिल्यांदा खेळताना विन टेंपल क्लबने १३८ धावा धावफलकावर लावल्या. अथर्व वानवे याने २५ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकारांसह ६१ धावांची खेळी केली. अनिश गायकवाड याने २२ धावांची खेळी केली. सह्यांद्री संघाच्या रोहीत पाटील याने चार गडी टिपले. याला उत्तर देताना सह्यांद्री किंग्ज्‌ संघाचा डाव ९३ धावांवर संपुष्टात आला. विन टेंपल संघाच्या हरी सावंत याने तीन गडी तर, वेरूण चोदरी आणि राकेश जे. यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

Cricket News: MPL मध्ये दोन वेळा चॅम्पियन, आता क्रिकेटपटू घडवणार! ‘रत्नागिरी जेट्स’ संघाने थेट…

अथर्व भोसलेच्या नाबाद ९९

अथर्व भोसले याने केलेल्या नाबाद ९९ धावांच्या जोरावर बजरंग दल संघाने लक्ष क्रिकेट ॲकॅडमीचा ७३ धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली. प्रथम फलंदाजी करताना बजरंग दल संघाने २०७ धावांचा डोंगर उभा केला. अथर्व भोसले ६२ चेंडूत ४ चौकार आणि ९ षटकारांसह नाबाद ९९ धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजुने मानस कुमार याने ५६ धावांची खेळी केली. या आव्हानाला उत्तर देताना लक्ष क्रिकेट ॲकॅडमीचा डाव १३४ धावांवर संपुष्टात आला. अमेय जाधव (४६ धावा) आणि प्रफुल्ल एम. (२९ धावा) यांनी धावा करून प्रतिकार केला. निखील बापू याने २३ धावांत चार गडी बाद केले. मनु कसबे याने ९ धावांत दोन गडी बाद करून संघाचा विजय सोपा केला.

सामन्यांचा संक्षिप्त निकाल : उपांत्य फेरी 

विन टेंपल क्लब : २० षटकात १० गडी बाद १३८ धावा (अथर्व वानवे ६१, अनिश गायकवाड २२, रोहीत पाटील ४-८, निपुण गायकवाड २-२४) वि. वि. सह्यांद्री किंग्ज : १९ षटकात १० गडी बाद ९३ धावा (सुशांत अभंग १६, सईश शिंदे १९, हरी सावंत ३-२२, वेरूण चोदरी २-१४, राकेश जे. २-२२); सामनावीर : अथर्व वानवे;

Cricket News: पुण्यात क्रिकेटचा थरार! मेहक मुल्ला अन् आर्या चिखलीकर यांची तूफान खेळी; पहिल्याच दिवशी…

बजरंग दल : २० षटकात ७ गडी बाद २०७ धावा (अथर्व भोसले नाबाद ९९, मानस कुमार ५६, कुंदन कुमार ३-२३, विशाल निशाद २-३५) वि. वि. लक्ष क्रिकेट ॲकॅडमी : १८ षटकात १० गडी बाद १३४ धावा (अमेय जाधव ४६, प्रफुल्ल २९, निखील बापू ४-२३, मनु कसबे २-९); सामनावीर : अथर्व भोसले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पिंपरी चिंचवड करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोणत्या संघांनी प्रवेश केला?

    Ans: पिंपरी चिंचवड करंडक आंतरक्लब टी-२० क्रिकेट स्पर्धेत विन टेंपल क्लब आणि बजरंग दल या संघांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

  • Que: विन टेंपल क्लबच्या विजयात अथर्व वानवेचे योगदान काय होते?

    Ans: अथर्व वानवेने अवघ्या २५ चेंडूंमध्ये ५ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ६१ धावांची आक्रमक खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे विन टेंपल क्लबने सह्यांद्री किंग्जवर ४५ धावांनी विजय मिळवला.

Web Title: Win temple club bajrang dal playing final in pcmc cricket 2026 news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 04:19 PM

Topics:  

  • cricket news
  • PCMC News
  • Pune Sports News

संबंधित बातम्या

‘.. बॉटलच्या झाकणाचा वापर करायचो’; बॉल टेंपरिंगवरून Shoaib Akhtar ने उडवली क्रिकेटविश्वात खळबळ
1

‘.. बॉटलच्या झाकणाचा वापर करायचो’; बॉल टेंपरिंगवरून Shoaib Akhtar ने उडवली क्रिकेटविश्वात खळबळ

Ben Duckett: बदला! काही तासांपूर्वीच IPL मधून काढलं, पठ्ठ्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकले शतक
2

Ben Duckett: बदला! काही तासांपूर्वीच IPL मधून काढलं, पठ्ठ्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकले शतक

Table Tennis: खेळण्याच्या जिद्दीपुढे वय केवळ आकडा! जागतिक मास्टर्स टेनिस स्पर्धेत ‘या’ खेळाडूंचा विजय
3

Table Tennis: खेळण्याच्या जिद्दीपुढे वय केवळ आकडा! जागतिक मास्टर्स टेनिस स्पर्धेत ‘या’ खेळाडूंचा विजय

Chess: वय अवघे ११ वर्षे, पण बुद्धीबळाच्या पटावर ठरला ‘राजा’; ‘या’ स्पर्धेत अद्विक अग्रवालने पटकावले विजेतेपद
4

Chess: वय अवघे ११ वर्षे, पण बुद्धीबळाच्या पटावर ठरला ‘राजा’; ‘या’ स्पर्धेत अद्विक अग्रवालने पटकावले विजेतेपद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.